Home » कुटुंबासोबत पहावा असाच गुलमोहर…

कुटुंबासोबत पहावा असाच गुलमोहर…

by Team Gajawaja
0 comment
Gulmohar Movie
Share

अकरा वर्ष चित्रपट सृष्टीपासून दूर असलेल्या शर्मिला टागोर यांनी एका सुंदर कौटुंबिक चित्रपटाद्वारे आगमन केले आहे.  एकेकाळी  सिनेसृष्टीवर राज्य करणा-या शर्मिला टागोर यांनी पुनरागमन केलेला हा चित्रपट म्हणजे गुलमोहर (Gulmohar Movie) आहे.  मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात शर्मिला टागोर यांच्या अभिनयाची छान चांगलीच पडली आहे. अगदी RRR चे दिग्दर्शक एस. राजामौली यांनीही या चित्रपटातील भूमिकेबद्दल शर्मिला टागोर यांचे कौतुक केले आहे.  कुटुंबासोबत बघावा असा हा गुलमोहर चित्रपट (Gulmohar Movie) डिस्ने प्लस हॉटस्टार प्रदर्शित करण्यात आला आहे.  ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या या गुलमोहरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी गुलमोहर चित्रपटाद्वारे (Gulmohar Movie) 11 वर्षांनंतर मनोरंजन क्षेत्रात पुनरागमन केले आहे.  फॅमिली मॅन मनोज बाजपेयी यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंग शोसाठी अवघी चित्रपटसृष्टी जमा झाली होती.  ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. काही मोजके चित्रपट हे कुटुंबाला एकत्र बघावे असे आहेत,  आणि ते बघतांना कौटुंबिक एकी किती महत्त्वाची आहे, याची जाणीवही होते.  गुलमोहर हा असाच चित्रपट (Gulmohar Movie) आहे.  चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. अगदी आपल्या आसपासची घटना वाटावी अशीच. दिल्लीतील अती श्रीमंत भागात असलेल्या गुलमोहर (Gulmohar Movie) या घराची आणि पर्यायानं त्यातील कुटुंबाची कथा म्हणजे गुलमोहर (Gulmohar Movie) .  इथे बात्रा कुटुंबिय रहात आहेत, पण आता या तीन पिढ्यांची स्वतःची वेगळी विचारसरणी आहे. घराची मालकीण असेलेल्या कुसुम बत्रा म्हणजेच शर्मिला टागोरने यांनी हे  ‘गुलमोहर’ घर विकण्याचा निर्णय घेतला आहे.  घर विकण्यापूर्वी आपल्या कुटुंबाने एकत्र होळी साजरी करावी,  होळीनंतर चार दिवसांनी मुलांनी त्यांच्या स्वतंत्र घरी रहायला जावे, असे त्या जाहीर करतात. त्यांचा मुलगा अरुण म्हणजेच मनोज बाजपेयी याला सर्व कुटुंबानं वेगळे व्हावे असे वाटत नाही.  मात्र अरुणचा मुलगा आदित्य म्हणजेच सूरज शर्मा याला वेगळे राहायचे आहे.  घरातील तीन पिढ्यांमध्ये ही ओढाताण होत असतांना या कुटुंबाच्या घरी काम करणा-यांचीही वेगळी  व्यथा आहे.  अनेक वर्ष कुटुंबासोबत काम केल्यावर या वेगळ्या कुटुंबात आपले स्थान असेल का हा त्यांचा प्रश्न आहे.  अगदी घराला पेंट देणा-यापासून ते सफाई कर्मचा-यापर्यंत सर्वांचे प्रश्न आहेत.  हे कुटुंब वेगळे झाले तर आपण कोणाबरोबर जायचे, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे.  एकूण एक कुटुंब किती व्यापक असतं,  हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.  यासोबत फक्त नावासाठी एकत्र राहणा-या कुटुंबातील समस्यांनाही यातून  वाचा फोडली आहे. बात्रा कुटुंबात वारंवार होणा-या वादामुळे त्रस्त झालेली आजी साकारतांना शर्मिला टागोर यांच्या अभिनयाचा कस लागला आहे.   त्यांनी हे पात्र ज्या सहजतेने साकारले आहे, ते पाहता ही भूमिका त्यांच्यासाठीच लिहिली गेली आहे, याची जाणीव होते.  शर्मिला टागोर यांच्यापाठोपाठ या चित्रपटामध्ये  मनोज बाजपेयी यांच्या अभिनयाची छाप पडली आहे.  मनोजने अरुण बत्राची व्यक्तिरेखा खूप छान साकारली आहे.  सूरज शर्माने एका मुलाच्या व्यक्तिरेखेत उत्तम काम केले आहे. सिमरनने, मनोजच्या बायकोची व्यक्तिरेखा साकारली आहे.  सून, पत्नी आणि आई या तिन्ही भूमिकांमध्ये सिमरनने सुरेख अभिनय केला आहे. या गुलमोहरमध्ये (Gulmohar Movie) अजून एक सुखद धक्का म्हणजे अमोल पालेकर यांची उपस्थिती. अमोल पालेकर यांचे कामही उत्कृष्ट झाले आहे.  

=======

हे देखील वाचा : अँन्टेलिया विस्फोटक कांड आधारित लवकरच येणार वेबसीरिज

=======

राहूल व्ही चित्तेला दिग्दर्शित या चित्रपटाची कथाही राहूल यांचीच आहे. यात शर्मिला टागोर, मनोज बाजपेयी यांच्यासह सिमरन, सूरज शर्मा, कावेरी सेठ, उत्सवी झा, जतीन गोस्वामी, चंदन रॉय आणि अमोल पालेकर यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा अर्पिता मुखर्जी आणि राहुल व्ही चितेला यांची आहे.  तर विकेश भुतानी, शुजात सौदागर आणि राहुल चितेलाहे गेलमोहरचे निर्माते आहेत. ओटीटीवर गुलमोहर (Gulmohar Movie) असल्यामुळे तो अधिक कुटुंबापर्यंत पोहचेल असा चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा मानस आहे. तसे झाल्यास चित्रपटाचा हेतू सफल होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.