Home » Plane Crash : कॅप्टन सुमित सभरवाल यांचा ८००० तासांचा अनुभव देखील ठरला कमी

Plane Crash : कॅप्टन सुमित सभरवाल यांचा ८००० तासांचा अनुभव देखील ठरला कमी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Plane Crash
Share

अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या ५ मिनिटांतच कोसळले. या मोठ्या दुर्घटनेमध्ये विमानातील २४२ प्रवासी मृत्युमुखी पडले आहे. एअर इंडियाच्या AI171 या लंडनला जाणाऱ्या फ्लाईटचा मोठा अपघात झाला आहे. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विमान अपघात होता. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादच्या मेघानीनगर आयजीपी परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते. (Plane Crash)

या फ्लाईटचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल हे होते. तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर होते. दोघानांही विमान उड्डाणाचा चांगला आणि मोठा अनुभव होता. कॅप्टन सुमित यांचा ८२०० तासांचा विमान उडवण्याचा अर्थात फ्लाईंग एक्सपीरियन्स होता. को पायलट असलेल्या क्लाइव कुंदर यांना ११०० तासांचा विमान उडवण्याचा अनुभव होता. अपघातग्रस्त विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते. (Marathi News)

सुमित हे मुंबईतील पवईच्या जलवायू विहारमध्ये राहत होते. सुमीत सभरवाल यांचे वडील ८८ वर्षाचे असून, या अपघाताची बातमीने ते पूर्णपणे कोसळले आहे. विमानाच्या टेक ऑफला थोडा वेळ बाकी असताना सुमित यांनी त्यांच्या वडिलांना फोन केला होता. फोनवर ते म्हणाले होते की, “लंडनला पोहोचल्यावर फोन करतो, तोवर काळजी घ्या” अविवाहित असलेल्या सुमित यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर वडिलांचा सांभाळ सुमीतच करत होते. या विमानाचे को पायलट क्लाईव्ह कुंदर हा अभिनेता विक्रांत मेस्सीचा चुलत भाऊ होता. (Marathi Latest News)

Plane Crash

कॅप्टन सुमित सभरवाल हे एअर इंडियाचे अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित पायलट होते. ही घटना घडताना जेव्हा विमान टेक ऑफ करत असताना अचानक विमानात तांत्रिक बिघाड आला आणि विमान चालवताना आलेल्या अडथळ्यांमुळे जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात होती, तेव्हा सुमित यांनी जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवला होता, पण त्यानंतर विमानाने एटीसीला कोणताही सिग्नल दिला नाही, ज्यामुळे विमानाशी संपर्क तुटला. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झाले. (Todays Top HEadline)

दरम्यान अहमदाबादच्या विमानतळावरुन उड्डाण केलेल्या विमानाला मेघानीनगर भागात अपघात झाला. मेघानीनगरमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं. बोईंग कंपनीचं ड्रीमलायनर ७८७ विमान केवळ ११ वर्ष जुनं होतं. Boieng Plane चं आयुष्य साधारणत: ३० ते ५० वर्षे असतं. पण बहुतांश व्यावसायिक विमानं इतकी वर्षे सेवेत ठेवली जात नाहीत. सुरक्षेच्या कारणामुळे ही विमानं आधीच निवृत्त केली जातात. (Marathi Top Headline)

===========

हे देखील वाचा :  Plane Crash : ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सच सांगतो अपघाताचे कारण

                            Plane Crash: विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा Mayday कॉल, मात्र Mayday म्हणजे काय?

===========

बोईंग ७८७ ड्रीमलायनर मध्यम आकाराचे विमान आहे. ते दीर्घकाळ उड्डाण करु शकते. त्याची प्रवासी क्षमता २१० ते २५० इतकी आहे. हे विमान ८५०० नॉटिकल मैल म्हणजेच ९८०० मैल अंतर प्रवास करू शकते. या विमानाला २० टक्के कमी इंधन लागते. अहमदाबाद ते लंडन हे अंतर ७००० किलोमीटर इतकं आहे. या विमानामध्ये जवळपास सव्वा लाख लिटर पेट्रोलचा साठा होतो. या अंतरासाठी ड्रीमलायनर विमान सुयोग्य मानले जाते. आजच्या घडीला अनेक विमान कंपन्या ड्रीमलायनर ७८७ चा वापर करतात. त्यात एअर इंडियासह ब्रिटिश एअरवेज, एतिहादचा समावेश आहे. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.