Home » भारतीय महिलेच्या दातांचा बनला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

भारतीय महिलेच्या दातांचा बनला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

एखाद्या व्यक्तीच्या तोंडात किती दात असतात? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे. खरंतर ३२ दात असतात असे उत्तर दिले जाते. परंतु एका २६ वर्षीय भारतीय महिलेचे दात पाहून गिनीज बुकवाले सुद्धा चक्रावले आहेत.

by Team Gajawaja
0 comment
world Guinness record
Share

एखाद्या व्यक्तीच्या तोंडात किती दात असतात? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे. खरंतर ३२ दात असतात असे उत्तर दिले जाते. परंतु एका २६ वर्षीय भारतीय महिलेचे दात पाहून गिनीज बुकवाले सुद्धा चक्रावले आहेत. ऐवढेच नव्हे तर त्या महिलेच्या दातांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. कल्पना बालन असे महिलेचे नाव असून तिच्या तोंडात ३२ नव्हे तर ३८ दात आहेत. (Guinness World Records)

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या मते, कल्पनाला नैर्सगिकरित्या सहा दात अधिक दिले आहेत. तिला एकूण ३८ दात आहेत. खालच्या जबड्याजवळ ४ अधिक दात आहेत. तर वरती दोन दात अधिक आहेत. त्याचसोबत कल्पनाने तोंडात अधिक दात असल्याचा पुरस्कार ही आपल्या नावे केला आहे. तर पुरुष कॅटेगरीत हा रेकॉर्ड कॅनडा मधील इवानो मेलोनच्या नावाने दाखल आहे. त्याला एकूण ४१ दात आहेत.

Indian mother sets world record for having the most teeth | Guinness World  Records

 

३८ दातांची महिला
कल्पनाने असे म्हटले की, जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला सर्वसामान्यपणे अधिक दात येऊ लागले होते. यामुळे घरातील मंडळी सुद्धा चिंतेत होती. त्यानंतर कलपनाने अतिरिक्त दात काढण्याचा निर्णय घेतला होता. पण डॉक्टरांनी सांगितले की, दात काढण्यासाठी आता ही योग्य वेळ नाही. त्यामुळे थोडी वाट पहावी लागेल.

वाढत्या वयासह कल्पनाना अतिरिक्त दातांमुळे कोणताच त्रास झाला नाही. तिने आपले मन बदलले. आजच्या तारखेला ती जगातील अशी एक महिला बनली आहे जिच्याकडे सर्वाधिक दात असलेला अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कल्पनाने म्हटले की, तिला या पुरस्कारामुळे आनंद होत आहे.(Guinness World Records)

कल्पनाने असे म्हटले की, मी माझे दात काढले नाही यामुळे अत्यंत खुश आहे. माझा पुरस्कार हा लाइफटाइम अचीवमेंट आहे. खास गोष्ट अशी की, महिला डॉक्टरने असे म्हटले भविष्यात हा रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो. कारण कल्पनाच्या तोंडात दोन आणखी दात आहेत जे अद्याप आलेले नाहीत.


हेही वाचा- Miss Universe 2023: नेपाळची Jane Dipika ‘या’ कारणास्तव आहे चर्चेत


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.