Home » गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची स्टोरी !

गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची स्टोरी !

by Team Gajawaja
0 comment
Guinness Book of Record
Share

१९५१ ची गोष्ट आहे. एके दिवशी ह्यू बीव्हर आपल्या मित्रांसोबत पक्ष्यांची शिकार करण्यासाठी बाहेर पडले या शिकारीला ते शूटिंग पार्टी म्हणायचे. ही पार्टी आयर्लंडमधील काउंटी वेक्सफोर्ड मधील स्लेनी नदीच्या काठावर आयोजित केली होती. हयू बीव्हर हे गिनीज ब्रुअरीज कंपनीचे संचालक होते. या शूटिंग पार्टी दरम्यान त्यांच्या समोरून एक पक्षी खूप स्पीडमध्ये उडत गेला. एवढ्या वेगाने हा उडणारा पक्षी कोणता, हा प्रश्न तेव्हा सगळ्यांच्याच मनात आला. सर्व वेगवेगळ्या पक्षांची नाव घेऊन एकमेकांशी वादविवाद करू लागले की, सर्वात वेगाने उडणारा पक्षी हा असेल किंवा तो नसेल. तेव्हा ह्यू बीव्हर यांनी हे शोधण्याचा निर्णय घेतला की, सर्वात वेगाने उडणारा पक्षी कोणता. पण त्याचं उत्तर त्यांना कोणत्याही पुस्तकात सापडलं नाही. (Guinness Book of World Record)

त्यामुळे ह्यू बीव्हर यांच्या मनात एक गोष्ट आली की, आपल्याला पडलेल्या प्रश्नांप्रमाणे लोकांना सुद्धा असे प्रश्न पडत असतील आणि ज्याची उत्तर त्यांना न मिळाल्यामूळे ते सुद्धा निराश होतं असतील. मग याबाबत बीव्हर यांनी त्यांच्या मित्रांशी चर्चा केली. त्यांना आयडिया आली, एक असं पुस्तक बनवण्याची ज्यामध्ये लोकांच्या अशा प्रश्नांची उत्तरं असतील. मग माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या दोन विद्यापीठ मित्रांना निवडलं. त्यांचे दोन्ही मित्र त्यावेळी लंडनमध्ये ‘फॅक्ट फाइंडींग’ Agency चालवत होते. त्यांचे हे दोन मित्र म्हणजे सख्खे जुळे भाऊ नॉरिस आणि रॉस मॅकव्हर्टर. या दोन्ही भावांनी वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करून १९८ पानांच पहिलं पुस्तक बनवलं आणि २७ ऑगस्ट १९५५ ला ते प्रकाशित केलं गेलं. ह्यू बीव्हर यांच्या या भन्नाट आयडियामुळे आणि नॉरिस व रॉस या जुळ्या भावांच्या मेहनतीमुळे प्रकाशित झाल्यानंतर हे पुस्तक त्यावर्षी ब्रिटिश बेस्टसेलर ठरलं. त्यानंतर ते अमेरिकेत सुद्धा प्रकाशित झालं, तिथे सुद्धा पुस्तकाच्या ७० हजारापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या. (International News)

पुढे गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इतकं लोकप्रिय झालं की ते ४० हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागलं. ब्रिटन, नुयॉर्क, बीजिंग, टोकियो आणि दुबई या सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये त्यांचे ऑफिसेस सुरू झाले. सध्या गिनीज बूकमध्ये ६२ हजारांहून अधिक विक्रमांची नोंद झाली आहे. लोकं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जगा वेगळे रेकॉर्ड बनवण्यासाठी गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अर्ज करत असतात. एखादा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केल्यानंतर गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून त्यांना काही पैसे दिले जात नाही. फक्त एक प्रमाणपत्र मिळतं, ज्यामध्ये त्यांनी केलेल्या किंवा मोडलेल्या रेकॉर्डचा उल्लेख असतो. तुम्ही म्हणालं, पैसे मिळत नाहीत तरी सुद्धा एवढी क्रेझ आहे. या रेकॉर्डसमुळे लोकांना जगभरात नावलौकिक मिळतं. (Guinness Book of World Record)

======

हे देखील वाचा :  उमर बिन लादेनला फ्रान्सने केले गेट आऊट

======

काही काही इतके अतरंगी रेकॉर्डस असतात, जसे दाढींच्या केसांनी सर्वात जास्त वजन उचलण्याचा रेकॉर्ड, सर्वात जास्त वर्ष आंघोळ न करण्याचा रेकॉर्ड, आणि शरीरावर सर्वात जास्त Piercing करण्याचा रेकॉर्ड असे अनेक आहेत. पूर्वी या गिनीज बूकमध्ये कोलंबियाच्या पेड्रो लोपेज या सीरियल किलरने केलेला एक रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड म्हणजे ३०० लोकांची हत्या करण्याचा. या रेकॉर्डमुळे चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहचेल म्हणून नंतर तो काढून टाकण्यात आला. नदीकाठी झालेल्या मित्रांच्या वादविवादामुळे हे भन्नाट पुस्तक निर्माण झालं. या पुस्तकावर आधारित एक टीव्ही शो सुद्धा आला होता. ज्याचं नाव रेकॉर्डब्रेकर असं होतं, हा टीव्ही शो सुद्धा खूप लोकप्रिय झाला. जगात आपली वेगळीच ओळख निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी गिनीज बूक हे एक महत्त्वाच माध्यम आहे. याच गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नावावर सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हा रेकॉर्ड म्हणजे १०० देशांमध्ये ३७ भाषांमध्ये १०० दशलक्ष गिनीज बूकच्या प्रती विकण्याचा. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.