Home » हिटलरसोबत मिळून हजारो लोकांना केले ठार, वयाच्या ९७ व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा

हिटलरसोबत मिळून हजारो लोकांना केले ठार, वयाच्या ९७ व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा

by Team Gajawaja
0 comment
Guilty of Genocide
Share

नाजी कॅम्पची माजी सेक्रेटरी ९७ वर्षीय महिलेने नाजीद्वारे करण्यात आलेल्या यहूदी नरसंहारासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. इर्मगार्ड फुर्चनरल नावाच्या या महिलेवर हिटलरसोबत मिळून कॅम्पमध्य कैद असलेल्या १०५०० लोकांची हत्या केल्याचा आरोप होता. उत्तर जर्मनीच्या इत्जेहोच्या कोर्टाला तिला दोन वर्षाची निलंबित शिक्षा सुनावली आहे. इर्मगार्ड फुर्चनर जर्मनीतील पहिलीच अशी महिला आहे जिला नाजी गुन्हाअंतर्गत दोषी ठरवले गेले गेले आहे. तिच्यावर या खटल्याची सुरुवात सप्टेंबर २०२१ मध्ये सुरु झाली होती. गेल्या एका वर्षापासून हा खटला सुरु होता. या महिन्याच्या सुरुवातीलाच इर्मगार्डने कोर्टाला असे म्हटले होते की, जे काही त्यावेळी झाले त्यासाठी वाईट वाटते पण तिने आपला गुन्हा स्विकार केला नव्हता.(Guilty of Genocide)

ट्रायलसाठी उशिर झाला
नाजी युगात यहूदींवर करण्यात आलेल्या नरसंहारातील दोषी ठरवण्यात आलेल्या इर्मगार्डवर चालत असलेली ट्रायल सप्टेंबर २०२१ रोजी सुरु झाली होती. त्या वेळी तिने कथित रुपात पळ काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला गेला होता. मात्र काही तासांनंतर हॅमबर्ग पोलिसांनी तिला अटक केली होती. पाच दिवसांची पोलीस कस्टडीत राहिल्यानंतर पोलिसांनी तिच्या मनगटावर एक इलेक्ट्रिक टॅग लावला होता. जेणेकरुन तिचे लोकेशन कुठे आहे हे कळेल.

कोण आहे हर्मगार्ड फुर्चनर
इर्मगार्ड १९४३ ते १९४५ दरम्यान स्टेथॉफ कॅम्पमध्ये कॅम्प कमांडेट पॉल वर्नरची सेक्रेटरी होती. त्यावेळी तिचे वय १८-१९ वर्ष होते. तेव्हाच यहूदी नरसंहार झाला होता. इर्मगार्डला कमी वयाच्या कारणास्तव जुवेनाइल कोर्टात हजर करण्यात आले होते. नाजी एकाग्रता शिविरमध्ये झालेल्या यहूद्यांच्या नरसंहारसाठी दोषी ठरवण्यात आलेली ती पहिलीच महिला आहे.

Guilty of Genocide
Guilty of Genocide

नाजी युगासंबंधित अंतिम खटला
नाजी युगात यहूदी नरसंहार संबंधित हा अखेरचा खटला होता. न्यायाधीश डोमिनिक ग्रोस यांनी सुनावणी दरम्यान असे म्हटले की, नाजी युगात झालेल्या गुन्हांपैकी हा अखेरचा खटला आहे. यापूर्वी ऐतिसाहिक उद्देशाच्या कारणास्तव त्यांना खटल्याची कारवाई रेकॉर्ड करण्याचा आदेश दिला होता. हे ट्रायल ४० दिवस चालले पण अभियुक्तच्या (गुन्हेगार) अधिक कारणास्तव फक्त दोन तासांत सुनावणी झाली. याच दरम्यान यहूदी नरसंहार दरम्यान जीवंत राहिलेल्या ३० लोकांनी साक्ष दिली जे अमेरिका, फ्रांन्स, ऑस्ट्रिया आणि बाल्टिक राज्यात राहतात. या व्यतिरिक्त अशा तज्ञांचे सुद्धा ऐकून घेतले ज्यांनी कॅम्पमध्ये फुर्चनरचे कामकाज, कैद्यांना दिलेल्या यातना, हजारो लोकांची हत्या यांच्याबद्दल माहिती दिली होती. सर्वात खास साक्ष ८४ वर्षाच्या जोसेफ सालोमोनोविक यांची होती. जे स्टेथॉफ कॅम्प मधून सुखरुप बचावले होते. त्यांनी चेक गणराज्यात डिसेंबर २०२१ मध्ये साक्ष दिली होती. कॅम्पमध्ये त्यांचे वडिल एरिच यांना ठार करण्यात आले होते. त्यांनी असे म्हटले होते की, खरोखर फुर्चनर आपल्या ऑफिस मध्ये बसायची पण ती या हत्याकांडात दोषी आहे आणि तिला शिक्षा मिळाली पाहिजे.(Guilty of Genocide)

स्टेथॉफ कॅम्पमध्ये ६५ हजार लोकांचा घेतला गेला जीव
स्टेथॉप कॅम्पमध्ये नाजींच्या द्वारे ६५ हजार लोकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. यामध्ये बहुतांशजण असे होते जे भूक आणि थंडीमुळे मृत्यू पावले. २८ हजारांहून अधिक लोक यहूदी होते. कॅम्पमध्ये विषारी गॅस आणि गोळ्या देऊन त्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्यात आले होते. खटल्यादरम्यान, कोर्टाच्या अधिकारी न्यायाधीशांसोबत पोलंडमध्ये त्या ठिकाणी गेले होते जेथे स्टेथॉफ कॅम्प लावण्यात आला होता. त्यांनी फर्चुरनर हिचा डेस्क ही पाहिला. तेथे कशा पद्धतीने डेथ मशीनरी काम करायची, गॅस चेंबर कुठे होता आणि मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कार कसे व्हायचे हे सुद्धा जाणून घेतले.

का ठरवण्यात आले दोषी?
स्टेथॉफ कॅम्पच्या ठिकाणी गेल्यानंतर न्यायाधीश या निर्णयावर पोहचले की, फर्चुनर यांचा जो डेस्क होता तेथून ते ठिकाण अधिक लांब नव्हते जेथे यहूदींना मृत्यूच्या दारात ढकलले गेले होते. या कॅम्पमध्ये टाइपिस्ट होती जी बहुतांश वेळा फोनवरुन काही कामे करायची. तरीही असे मानले जाऊ शकत नाही कॅम्पमध्ये जे काही सुरु होतो ते तिला माहिती नसेल. फर्चुनरने वकिलांच्या माध्यमातून नेहमीच न्यायाधीशांसोबत बातचीच केली. पण स्वत:हून कधीच काही बोलली नाही. प्रत्येक वेळी कोर्टात रुग्णवाहिका यायची. दोषी ठरवल्यानंतर उन्हाचा चष्मा आणि फेस मास्क लावून व्हिलचेअरवरुन कोर्टाच्या रुममध्ये यायची.

हे देखील वाचा- परदेशातील तुरुंगात कोणत्या गुन्ह्याची शिक्षा भोगतायत ११ हजारांहून अधिक भारतीय नागरिक?

यहूदी नरसंहार काय होता?
1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटरच्या आदेशावरुन यहुदींना मुळापासून संपवण्यासाठी त्यांना मारण्याची योजना बनवण्यात आली होती. त्यासाठी कॅम्प लावले गेले. त्यामध्ये यहूद्यांना पकडून पकडून आणले जात होते. त्यानंतर त्यांना अशा यातना दिल्या जायच्या की ते कामच करु शकत नाही, जे काम करण्यालायक नाहीत त्यांना ठार केले जायचे. यामध्ये बहुतांश लोक भूक, आजार आणि थंडीमुळेच मृत्यू पावले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.