विमानाने प्रवास करायचा म्हणजे काही नियम आणि अटी पाळाव्या लागतातच. परंतु बोर्डिंगच्या काही तास आधीच तुम्हाला विमानतळावर पोहचावे लागते. तेथे तुमची तपासणी ते तिकिट चेकिंग पर्यंतची प्रोसेस ही तुम्हाला पार पाडावी लागते. मात्र अलीकडेच प्रवाशांना विनाकारण विमानात बसण्यास न देण्याच्या तक्रारींच्या घटनांमुळेच डीजीसीए (DGCA) कडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार जर एखाद्या विमान कंपनीने प्रवाशाकडे वैध तिकिट असून ही त्याला विमानात बसण्यासाठी परवानी न दिल्यास नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. हा नियम यापूर्वी लागू करण्यात आला नव्हता. डीजीसीए द्वारे बंगळुरु, हैदराबाद आणि नवी दिल्लीत करण्यात आलेल्या तपासात असे समोर आले होते की, एअर इंडियाने चुकीच्या पद्धतीने काही प्रवाशांना बोर्डिंगसाठी मनाई केली होती. मात्र प्रवाशांकडे वैध तिकिट होते आणि ते विमानतळावर ही पोहचले होते.(Guidelines for airlines)
एका रिपोर्ट्नुसार, डीजीसीएने वैध तिकिट असून जर प्रवाशाला बोर्डिंगसाठी मनाई केल्याने एअर इंडियावर १० लाखांची दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचसोबत कंपनीला बोर्डिंग संबंधित नियम स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. सातत्याने मिळत असलेल्या तक्रारीनंतर डीजीसीए कडून एअरलाइन्सच्या बोर्डिंग संबंधित नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. एका नोटीसीत डीसीजीएने असे म्हटले की, नव्या गाइडलाइन्सचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
हे देखील वाचा- परदेशात फिरायला जायचा प्लॅन करत असाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
नव्या गाइडलाइन्सनुसार, जर प्रवाशाकडे वैध तिकिट आणि तो बोर्डिंगच्या वेळी उपस्थितीत असेल आणि तरीही त्याला विमानात बसण्यास परवानगी दिली जात नसेल तर एअरलाइनला १० लाखांचा दंड भरावा लागणार आहे. त्याचसोबत ज्या व्यक्ती संबंधित दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्याच्यासाठी २४ तासात व्यवस्था सुद्धा करावी लागणार आहे. मात्र असे न केल्यास त्याला २० हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.(Guidelines for airlines)
डीजीसीएकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, एअर इंडियाकडे आतापर्यंत प्रवाशांना बोर्डिंग करण्यासंदर्भात कोणतेही नियम नाही आहेत. त्याचसोबत बोर्डिंगसाठी नकार दिलेल्या प्रवाशांना एअरलाइन्स कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देत. डीसीजीएने पुढे असे ही सांगितले, अशा असहाय्य प्रवाशांची संख्या अधिक वाढली आहे. एअर इंडियाच्या विरोधात दंडात्मक कारवाई करत डीजीसीएने असे ही म्हटले, या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने एक सिस्टिम तयार करण्यात यावी. परंतु एअरलाइन्स हे काम करण्यास अयशस्वी झाल्यास पुढे कंपनीच्या विरोधात अधिक कठोर पावले उचलली जातील.