गुढीपाडव्याचा सण म्हणजे हिंदू नवीन वर्ष. आता नवीन वर्षाचा पहिलाच सण असल्याने सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण असते. दारासमोर छानशी रंगबेरंगी रेखीव रांगोळी, झेंडूच्या फुलांचे तोरण, ढोल ताशाचा नाद अतिशय प्रसन्न असे वातावरण या दिवशी आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते. सणाचा दिवस असल्याने जेवणामध्ये देखील पक्वान्न बनवले जाते. गोडधोडाचा देवाला नैवेद्य होतो.(Gudhipadwa)
मात्र पाडवा इथेच वेगळा ठरतो. कारण पाडव्याच्या दिवशी गोडाचा नैवेद्य तर असतोच सोबतच प्रसाद म्हणून देण्यात येते ते कडुलिंब आणि गुळाचे मिश्रण. चवीला तसे कडू असणारा हा प्रसाद नववर्षाच्या पहिल्या दिवशी का दिला जातो? याचं उत्तर तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया याच प्रश्नाचे उत्तर. कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा पूर्वजांच्या काळापासून चालत आली आहे. उन्हाळा बाधू नये तसंच आरोग्य निरोगी राहावे, यासाठी कडुलिंबाची पाने आणि गूळ खाण्याचा सल्ला आपल्याला पूर्वजांकडून दिला गेला आहे.(Kadulimb and Gul)
चैत्र महिना लागल्यानंतर वातावरणातील थंडी जाऊन हळूहळू उष्णता वाढू लागते. उन्हाळा लागल्यानंतर अनेक त्वचेशी संबंधित आजार होण्याची शक्यता खूपच असते. शिवाय पोटाचे त्रास, सर्दी खोकला ताप आदी तरस देखील या ऋतूमध्ये होतात. त्यामुळे अशा वातावरणात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कडूलिंब आणि गुळाचे सेवन केले जाते. (Marathi Top Stories)
==============
हे देखील वाचा : Gudipadwa : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात ‘गुढीपाडवा’
===============
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची प्रथा खूप जुन्या काळापासून चालत आहे. यामागे काहीतरी कारण आहे, ते म्हणजे या काळात हवामान बदल होतो आणि हा बदल अनेक आजारसोबत घेऊन येतोय. कडुनिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे शरीराच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. कडुनिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवतात आणि मधुमेहाचा धोका टाळतात. (Marathi Latest News)
कडुलिंब ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी – फंगल, अँटी – ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल यासारखे गुणधर्म आहेत. तसंच यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, फायबर, फॉस्फरस, पोटॅशिअम यासारख्या पोषण तत्त्वांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
कडुलिंब उन्हाळ्यात शरीराला मौसमी आजारांपासून वाचवते, याशिवाय ते चरबी जाळते. चेहऱ्यावरील मुरुम आणि खाज यापासून आराम देते. आणि कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने खाज थांबते. कडुलिंबाची पेस्ट केसांच्या मुळांवर लावल्यास कोंड्याची समस्याही कमी होते. हे संधिवात आणि स्नायू दुखणे किंवा हवामानातील बदलामुळे वाढणारी सूज यापासून आराम देण्यास मदत करते. (Social News)
तर गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. गुळात अनेक चमत्कारिक गुणधर्म आहेत. गुळ हा साखरेला सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे. सोबतच ॲसिडिटीची शक्यता कमी होते. गुळातील खनिजे, कर्बोदके आणि इतर पोषक घटक हवामानात होणाऱ्या बदलामुळे श्वसनाच्या आजारांशी लढण्यास मदत करतात. गुळाचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच सौंदर्याच्या क्षेत्रातही अनेक फायदे होतात. गुळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते, जे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. यासाठी दुधात गुळ मिसळून प्यावे. यामुळे त्वचा सुधारते. त्यामुळे कडुलिंब – गूळ खा आणि निरोगी राहा.(Marathi News)
==============
हे देखील वाचा : Navratri : चैत्र नवरात्रीची तयारी !
===============
कडुनिंब आणि गुळ एकत्र खाल्ल्याने देखील आरोग्यासाठी मोठे आणि आवश्यक फायदे होतात. गुळातील लोहाचे पचन कडुनिंबाच्या पानांमुळे खूप सहज आणि चांगले होते. कडूनिंब हा थंड प्रवृत्तीचा पदार्थ आहे तर गुळ उष्ण प्रवृत्तीचा आहे, त्यामुळे संतुलन राखण्यास मदत होते. या दोघांच्या एकत्र सेवनामुळे शरीराला एकाच वेळी उर्जा आणि अँटी ऑक्सिटंड दोन्ही मिळते.