Home » Grooming Gang : ग्रुमिंग गॅंगचा काळा चेहरा आणि स्टारमर यांची भूमिका

Grooming Gang : ग्रुमिंग गॅंगचा काळा चेहरा आणि स्टारमर यांची भूमिका

by Team Gajawaja
0 comment
Grooming Gang
Share

पाकिस्तानी स्थलांतरीतांचा ब्रिटनमधील काळा चेहरा आता उघड होऊ लागला आहे. ग्रुमिंग या गोंडस नावाखाली त्यांनी एक गॅंग चालू केली होती. या ग्रुमिंग गॅंगनं वय वर्ष 9 ते 20 वर्षाच्या हजारो तरुणींचे शारीरिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. यात फक्त मुलींचा समावेश नसून अनेक मुलांवरही अनैसर्गिक अत्याचार कऱण्यात आले आहेत. अंगावर काटा आणणा-या या घटनेनं फक्त ब्रिटनच नाही तर अवघं युरोप हादरलं आहे. कारण आता या ग्रुमिंग गॅंगच्या घृणास्पद कथा उघड करणा-या काही संघटनांनी अवघ्या युरोपमध्ये अशा त-हेच्या घटना होत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे अवघ्या जगात खळबळ उडाली आहे. गरीब घरातील मुलींना आणि ज्यांच्या कुटुंबात वाद आहेत, ज्या मुली मानसिकरित्या आघात सोसत आहेत, अशा मुलींना टार्गेट करुन ही ग्रुमिंग गॅंग आपला शिकार करत असे. या मुलींचे शारीरिक शोषण करण्यात येत असून काही मुलींना ड्रग्जही देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी या ग्रुमिंग गॅंग कशाप्रकारे मुलींना आपल्या जाळ्यात ओढते याचे व्हिडिओच जाहीर केल्यानं अवघं ब्रिटन हादरलं आहे. (Grooming Gang)

एक्सचे एलॉन मस्क यांनी सध्या ब्रिटनमधील सत्ताधा-यांविरोधात बंड पुकारले आहे. त्याला कारण ठरली आहे, ती ब्रिटनमधली ग्रुमिंग गॅंग. ब्रिटनच्या हजारो मुलींचे आयुष्य उद्धवस्त करणा-या ग्रुमिग गॅंगची चौकशी करण्याबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी काहीही स्पष्टीकरण न दिल्यामुळे मस्क यांच्या रागात भर पडली आहे. त्यामुळे त्यांनी अनेक गंभीर असे व्हिडिओ एक्सवरुन व्हायरल करायला सुरुवात केली आहे. या सर्वांमुळे ग्रुमिंग गॅंग कशाप्रकारे मुलींना फसवत आहे, हे स्पष्ट झाले. तसेच या ग्रुमिंग गॅंगनं अवघ्या 9 वर्षाच्या मुलींवरही लैगिंक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या ग्रुमिंग गॅंगचे उदिष्ट ब्रिटिश वंशाच्या अल्पवयीन मुलींना अडकवणे आणि त्यांच्यावर बलात्कार करणे हे होते. दशकापूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकरणासाठी ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. ब्रिटिश सरकारच्या अहवालानुसार, रोदरहॅम शहरात हजारो मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. (International News)

अहवालातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलींवर बलात्कार करणारे बहुतांशी पाकिस्तानी वंशाचे होते. हे सर्व ग्रुमिंग गॅंगमध्ये होते. या ग्रूमिंग गॅंग म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचा समावेश असलेल्या पुरुषांच्या टोळ्या आहेत. या टोळीतील सदस्य मुलींच्या शाळेबाहेर लक्ष ठेऊन असत. मुलींच्या अनाथालयावरही त्यांचे लक्ष असे. त्यांनी बहुतेकदा गरीब पार्श्वभूमीतील ब्रिटिश मुलींना लक्ष्य केले. सुरुवातीला ग्रुमिंग गॅंगमधील मुले या मुलींबरोबर मैत्री करायचे. या मुलींना महागड्या भेटवस्तू आणि मोबाईल फोन दिले जात. मग या मुलींना महागड्या ठिकाणी फिरायला नेण्यात येत असे. एकदा का त्या तरुणावर मुलींचा विश्वास बसला की मग त्या अल्पवयीन मुलींची ओळख मोठ्या पुरुषांशी करून देण्यात येत असे. हे पुरुष वयानं चाळीशीही ओलांडलेले असायचे. ते या अल्पवयीन मुलींना क्लबमध्ये घेऊन जायचे. तसेच त्यांना महागड्या गाड्यांमध्ये फिरवायचे. (Grooming Gang)

===============

हे देखील वाचा : America : कुठे आग, कुठे बर्फाचे वादळ अमेरिके त्राहिमाम

America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?

===============

ही ग्रुमिंग गॅंग या सर्व काळात या मुलींना त्यांच्या कुटुंबापासून दूर करत असे. त्यामुळे त्यांचे होणारे लैगिंक शोषण उघडकीस आले नाही. या मुलींना ड्रग्जही देण्यात येत असे. यातील ज्या मुलींना या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच त्यांचे फोटो दाखवून त्यांना ब्लॅकमेलिंगही करण्यात आले. या सर्वांचा खुलासा झाल्यावर ब्रिटनमध्ये मोठी खळबळ उडाली होती. 2010 मध्ये पाकिस्तानी वंशाच्या पाच लोकांना शिक्षा सुनावण्यात आली. पण यातील अनेक गुन्हेगार अद्यापही मोकळे असून अशाच प्रकारचे काम करत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. अशाच स्वरुपाच्या ग्रुमिंग गॅग (Grooming Gang) युरोपातील अन्य देशातही असल्याचा खुलासा काही सामाजिक संस्थांनी दिल्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य अधिक वाढले आहे. या सर्वातून आता ब्रिटनमधील राजकारणातही मोठे वादळ उठले आहे. ब्रिटिश खासदार रूपर्ट लोव यांनी पाकिस्तानला देण्यात येणारी परदेशी मदत थांबवण्याची मागणी केली. यानंतर एलॉन मस्क यांनीही याला पाठिंबा दिला आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.