एक असा देश ज्याला आजपर्यंत कोणीच शोधू शकलं नाहीये. पण १९ व्या शतकात ग्रेगोर मॅकग्रेगोर या ब्रिटिश सैनिकाने हा देश शोधला होता. हा देश म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आहे. या देशाच्या जमिनीत वर्षभर पीक येतं, नेहमी झाडं हिरवीगार असतात आणि वातावरण थंडगार असतं. एवढचं नाही तर या देशातल्या नद्यांमध्ये स्वच्छ पाण्याबरोबर सोन्याचे दगड तरंगत असतात. या देशाचं असं वर्णन ग्रेगोर मॅकग्रेगोर या ब्रिटिश सैनिकांनेच केलेलं आहे. पण असा देश खरंच अस्तित्वात असेल तर मग आजही त्याचा शोध का घेतला गेला नाही? त्याचं कारण म्हणजे ग्रेगोर मॅकग्रेगोर हा एक नंबरचा शातिर आणि हुशार माणूस होता. जसं भारतात नटवरलाल या चोराने लोकांना ताजमहाल विकला होता, तसं या ब्रिटिश सैनिक ग्रेगोर मॅकग्रेगोर ने लोकांना संपूर्ण एक देश विकला होता, जो देश अस्तीवातच नाहीये. पण लोकांनी ग्रेगोर मॅकग्रेगोर याच्यावर विश्वास कसा ठेवला, आणि त्याने काल्पनिक देश कसा विकला? हे जाणून घेऊया. (Gregor MacGregor)
ग्रेगोर मॅकग्रेगोरच्या कारनाम्यांची गोष्ट सुरू होते १८२० च्या आसपास, जेव्हा ब्रिटिश सैनिक दक्षिण अमेरिकेत युद्ध करून आपल्या मायदेशी म्हणजेच ब्रिटनमध्ये परतत होते. ग्रेगोरही तेव्हा त्या सैनिकांमध्ये होता. सैनिक घरी परतत होते म्हणून खुश होते. मात्र, ग्रेगोरच्या डोक्यात काहीतरी वेगळचं शिजत होतं. त्याने दक्षिण अमेरिका ते ब्रिटन या प्रवासात एक गोष्ट तयार केली. मायदेशी परतल्यावर त्याने लोकांना युद्धाची आणि स्वत:च्या शौर्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यासोबत त्याने लोकांना एका अशा देशाबद्दल सांगायला सुरुवात केली, जो देश त्याने प्रवासात स्वत:च्या डोक्यात तयार केला होता. (International News)
जो देश पृथ्वीवरील स्वर्ग आहे. या देशाच्या जमिनीत वर्षभर पीक येतं, नेहमी झाडं हिरवीगार असतात आणि वातावरण थंडगार असतं. एवढचं नाही तर या देशातल्या नद्यांमध्ये स्वच्छ पाण्याबरोबर सोन्याचे दगड तरंगत आणि वाहत असतात. आताच्या काळात हे ऐकताना लहान मुलांच्या ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ या गाण्यासारखं वाटत असेल. पण तेव्हा ग्रेगोर मॅकग्रेगोर याच्या तोंडून जेव्हा या देशाचं वर्णन बाहेर पडायचं, तेव्हा सगळे लोक त्याच्या बोलण्याला भुलून जात होते. याचाच फायदा ग्रेगोर मॅकग्रेगोर याला घ्यायचा होता, आणि त्याने घेतला सुद्धा. (Gregor MacGregor)
ग्रेगोरने लोकांना सांगितलं की, या देशाच नाव पोएस असं सांगितलं होतं. या देशात आपल्याला हवे ते सर्व आहे, आपण फक्त तेथे जाऊन त्याचा विकास करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी लोकांना तेथे गुंतवणुकीसाठी राजीही केले. लोकांना या अनोख्या देशात गुंतवणुकीसाठी तयार करण्यासाठी ग्रेगोरने ब्रोशर पासून न्यूज पेपरपर्यंत सगळीकडे या काल्पनिक देशाबद्दल छापलं. त्यासोबत त्याने नकली नोटा सुद्धा छापल्या आणि लोकांना त्या देशात नेण्यासाठी ७ जहाजं सुद्धा तयार केली होती. त्याने संपूर्ण लंडनमधून हजारों लोकांना आपल्या या काल्पनिक देशात जाण्यासाठी तयार केलं आणि त्यांच्याकडून पैसे गोळा केले. आपल्या देशाच्या सेवेत असलेल्या सैनिकाच्या गोष्टींवर इंग्लंड सरकार आणि त्यांच्या सरकारी बँकांंनी सुद्धा विश्वास ठेवला आणि त्यांनी या काल्पनिक देशाचे बॉंड्स विकत घेतले. या सर्व लोकांना तिथे त्या देशात नेण्याआधी काही लोकांना त्याने त्या काल्पनिक देशाची प्रॉपर्टी विकली आणि त्याने दोन लाख डॉलर्स मिळवले. (International News)
जेव्हा ही सर्व लोकं जहाजामध्ये बसून ग्रेगोर मॅकग्रेगोरने शोधलेल्या काल्पनिक देश पोएसकडे निघाले, तेव्हा त्यांना टाटा करून ग्रेगोर मॅकग्रेगोर फ्रान्सला पळून गेला. हा काल्पनिक देश विकून इतके पैसे मिळवून सुद्धा तो समाधानी नव्हता. त्याने फ्रान्समधील लोकांना सुद्धा या काल्पनिक देशाची स्कीम विकायला सुरुवात केली. पण इथे फ्रान्सचे लोक हुशार ठरले. गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांनी या देशाबद्दल माहिती मिळवण्याचा निर्णय घेतला. या तपासातच त्यांना ग्रेगोरच्या कारनाम्याचं सत्य कळलं. (Gregor MacGregor)
======
हे देखील वाचा : गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची स्टोरी !
======
त्यानंतर ग्रेगोरवर खटला दाखल झाला आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं, पण ग्रेगोर ची गोष्ट इथेच संपत नाही. त्याने खटल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केली, जिथे त्याला सर्व आरोपांपासून मुक्त करण्यात आलं. ज्या देशासाठी लढला, त्याच देशातील लोकांना मूर्ख बनवणारा ग्रेगोर एक सच्चा सैनिक होता. त्याने त्याच्या सैन्याच्या मदतीने अनेक देशांना स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. त्यातलाच एक देश होता वेनेझुएला. वेनेझुएलाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्याने सुद्धा सहभाग घेतला होता. वेनेझुएलाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रेगोरचं या देशात एका हीरोसारखं स्वागत करण्यात आलं होतं, १८४५ साली ग्रेगोर मॅकग्रेगोर या चतुर चोर आणि सैनिकाचं ५८ व्या वर्षी निधन झालं. ग्रेगोरच्या निधनानंतर वेनेझुएलाच्या सैन्याने त्याला राजकीय सन्मान दिला. (International News)