Home » USA VS Greenland : अमेरिकन सैन्याला कुत्र्यांचे भय

USA VS Greenland : अमेरिकन सैन्याला कुत्र्यांचे भय

by Team Gajawaja
0 comment
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोज ग्रीनलॅंड कसे आणि कधी ताब्यात घेणार याचे बेत आखत आहेत. त्यासाठी ते डेन्मार्कला धमकीही देत आहेत. व्हेनेझुएलामध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे ट्रम्प यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र ग्रीनलॅंड आणि व्हेनेझुएलामध्ये खूप मोठा फरक आहे.

या सर्वात ग्रीनलॅंडमधील हवामान हा प्रमुख मुद्दा येतो. ग्रीनलँडचे हवामान प्रामुख्याने थंड आणि आर्क्टिक आहे. आजही तिथे -२ एवढे तापमान आहे. या तापमानात कायम घट होते. ग्रीनलॅंडचा मध्य भाग नेहमीच बर्फाने झाकलेला असतो. ( USA VS Greenland )

अशा भागात सैन्य कारवाई करण्यासाठी अमेरिकन सैन्यही तयारीचे पाठवावे लागणार आहे. या सैन्याला ग्रीनलॅंड आर्मीला तोंड द्यावे लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प या ग्रीनलॅंड आर्मीचा लप्पू म्हणून उल्लेख करतात. पण याच आर्मीनं एकेकाळी हिटलरच्या सैन्यालाही माघारी पाठवले होते.

हाडं गोठवणा-या थंडीमध्ये ग्रीनलॅंडचे रक्षण करणारे हे डेन्मार्क एलिट आर्क्टिक युनिट म्हणजे कुत्र्यांचे सैन्य आहे. ग्रीनलॅंडच्या बर्फात हे कुत्रे सहज फिरु शकतात. त्यांना साक्षात मृत्यूचे रुप मानले जाते. कारण या कुत्र्यांच्यामध्ये रानटी अस्वले आली तरी त्यांना हे आर्मीचे कुत्रे मारुन टाकतात. ( USA VS Greenland )

ग्रीनलॅंड ताब्यात घेण्याचे स्वप्न बघणा-या ट्रम्प यांच्या सैन्याला याच कुत्र्यांच्या आर्मीचा सामना करावा लागणार आहे. ट्रम्प या आर्मीची खिल्ली उडवत असले तरी, अमेरिकन सैनिक मात्र त्यांना कुठल्या आर्मीला तोंड द्यायचे आहे, याची कल्पना असल्यानं घाबरले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीही ग्रीनलॅंडवर ताबा घेणार असे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या संरक्षणासाठी त्यांना ग्रीनलॅंडचा ताबा हवा आहे. ग्रीनलॅंडचा ताबा सध्या डेन्मार्ककडे आहे. ट्रम्प रोज ग्रीनलॅंड काबीज करण्यासंदर्भात विधान करत असून त्यातून डेन्मार्कवर मानसिक दबाव टाकत आहेत. ( USA VS Greenland )

अशाच एका विधानात त्यांनी ग्रीनलँड आर्मीची खिल्ली उडवली. ही आर्मी जागात सर्वात कठीण परिस्थितीत तैनात असलेली आर्मी म्हणून ओळखली जाते. ग्रीनलॅंड हा कायम बर्फाच्या आवरणाखाली असतो. अशा भागात सैन्य तैनात करणे हे एक आव्हान असते.

मात्र या सैनिकांसोबत बर्फाळ भागात रहाणा-या कुत्र्यांची एक फळी असेल तर ती फायदेशीर ठरते. याच विचारानं डेन्मार्कनं ग्रीनलॅंडसाठी स्वतंत्र कुत्र्यांचे सैन्य दल स्थापन केले आहे. ज्या बर्फात सैनिक गस्त घालायला धजावत नाहीत, अशा बर्फाच्या थरांमध्ये हे कुत्र्यांचे सैन्य सराईतपणे गस्त घालते आणि समोर येणा-या शत्रूंचा मागोवा घेते. ( USA VS Greenland )

हिवाळ्याच्या महिन्यांत येथे सूर्य कधीच उगवत नाही. अशा भागात, तापमान उणे ५५ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. एखादा सैनिक -५५ अंश सेल्सिअसमध्ये लढण्यास असमर्थ ठरतो. तिथेच हे कुत्र्यांचे सैन्य सहजपणे शत्रूंबरोबर लढू शकते. ग्रीनलॅंडचा ताबा घेण्याचे स्वप्न बघणा-या अमेरिकन सैन्याला याच कुत्र्यांबरोबर लढा द्यावा लागणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या सैन्याची खिल्ली उडवली असली तरी, प्रत्यक्षात बर्फाळ वाळवंटात तैनात असलेले हे एक उच्चभ्रू लष्करी युनिट आहे. त्याला सिरियस डॉग स्लेज पेट्रोल म्हणतात. ही लष्करी तुकडी ग्रीनलँडच्या ईशान्य भागात तैनात आहे.

येथे रस्ते नाहीत. कारण बर्फाचा थर एवढा आहे, की तो दूर करता येत नाही. त्यामुळे या भागात मनुष्यवस्ती नसल्यासारखीच आहे. सुमारे १६०,००० चौरस किलोमीटर क्षेत्रात डॅनिश सैनिक येथे स्की, स्लेज आणि विशेष जातीच्या कुत्र्यांसह गस्त घालतात. ( USA VS Greenland )

या युनिटमध्ये १२-१४ कमांडो सैनिक असतात. या भागात ध्रुवीय अस्वलांचे प्रमाणही मोठे आहे. अनेकवेळा गस्त घातलांना या अस्वलांचाही सामना या दलाला करावा लागतो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान या युनिट स्थापना झाली. त्याला एलिट फोर्स असे नाव देण्यात आले.

या सैन्याशी लढणे सोपे नाही. कारण ग्रीनलँडमध्ये तैनात असलेल्या कुत्र्यांची ही फौज सिंहापेक्षाही जास्त प्राणघातक मानली जाते. या तुकडीसाठी जे सैनिक निवडले जातात, त्यांची निवड अनेक परीक्षांमधून केली जाते. ( USA VS Greenland )

=======

हे देखील वाचा : Greenland : आता डॅनिश राजकुमारीवर ज्युनिअर ट्रम्पची नजर

=======

या एलिट फोर्समधील निवडक सैनिक हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावे लागलात. त्यांना काही महिने एकटे राहून काम करावे लागते. या तुकडीमध्ये एका वेळी फक्त १२ सैनिक असतात. या सैनिकांना प्रथम आर्क्टिक भागात जिवंत रहाण्यासाठी काय करावे लागते, याचे प्रशिक्षण दिले जाते.

सोबत स्कीइंग, नेव्हिगेशन याचे अनेक महिने प्रशिक्षण मिळते. अशा खडतर प्रशिक्षणातून तयार झालेल्या सैनिकांसोबत डॅनिश कुत्र्यांचे एक घातकी दल दिले जाते. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सैन्याला ग्रीनलँड किनाऱ्यावर आक्रमण करण्यापासून रोखण्यासाठी रॉयल डॅनिश नेव्हीने ही फौज तयार केली.

कुत्र्यांच्या या फौजेने हिटलरच्या सैन्याला ग्रीनलँडमध्ये प्रवेश करण्यापासूनही रोखले होते. आता त्याच सैन्याची ट्रम्प खिल्ली उडवत आहेत. ( USA VS Greenland )

वास्तवात ग्रीनलँडमध्ये तैनात असलेली कुत्र्यांची सेना अत्यंत धोकादायक आहे. ग्रीनलँडच्या कठोर हवामानात हे कुत्रे जन्माला येतात, त्यामुळे त्यांचे शरीर त्या हवामानाबरोबर जुळवून घेते. फक्त वासावरुन हे कुत्रे शत्रूला ओळखतात आणि त्यांचा फडशा पाडतात.

मानवी सैन्य ज्याची कल्पनाही करू शकत नाहीत अशा मोहिमा या कुत्र्यांच्या सैन्यानं पार पाडल्या आहेत. त्यामुळेच अमेरिकन सैन्याने ग्रीनलँडवर कब्जा करण्यासाठी आक्रमण केले तर त्यांना आधी या कुत्र्यांच्या सैन्याचा सामना करावा लागणार आहे. ( USA VS Greenland )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.