वातावरणात दिवसेंदिवस बदल होत आहेत, त्याचा परिणाम हवेवर होत असून हवेची गुणवत्ता खालावत आहे. या सर्वांचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या सर्वातला मोठा धोका म्हणजे, आरोग्यावर होणारा हा परिणाम लगेच लक्षातही येत नाही. परिणामी दमा, सर्दी, खोकला यासह अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासर्वात दिलासा देण्यासाठी घरात एअर प्युरिफायर लावण्याचा सल्ला देण्यात येतो पण, प्रत्येकाला एअर प्युरिफायर लावणे शक्य नसते त्याची किंमतही जास्त असते. पण या एअर प्युरिफायर पेक्षाही फायदेशीर अशी छोटी झाडं कुंडीत लावता येतात. घरात लावण्यात येणा-या या झाडांमुळे हवा शुद्ध होतेच शिवाय ही झाडे अत्यंत कमी किंमतीमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे सर्वांना ती घरात लावणं सहज शक्य होतं.(Plants Benefit)
आपल्या सर्वांच्या घरात तुळशीचे रोप हमखास असतेच. तुळशीची पुजा केली जाते. ही तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीचे रोप फार मोठे नसले तरी त्याची पाने व्हिटॅमिन ए, सी आणि के तसेच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजांची उत्तम स्रोत आहेत. तुळशीचे रोप घरात असल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते. शिवाय तुळशीची ताजी पानंही त्यामुळे मिळतात. तुळशीची एक-दोन पानं रोज खाल्ली तरी त्याचा फायदा(Plants Benefit) आरोग्याला होतो.
घरातील हवा शुद्ध करण्यासाठी पीस लीली ही वनस्पती फायदेशीर आहे. पीस लिली हे घरात लावण्याचे छोटे झाड आहे. वनस्पती घरातच लावली जाते, कारण त्याला सूर्यप्रकाशाची गरज लागत नाही. पीस लीली घरातील ओलावा शोषून घेते. याशिवाय पीस लीली हवा शुद्ध करण्यासही मदत करते, वनस्पती आकाराने फार मोठी नसते. हवा शुद्ध करण्यासाठी घरांमध्ये लावण्यात येणा-या वनस्पतीमध्ये सर्वात लोकप्रिय घरगुती वनस्पतींच्या यादीमध्ये पीस लीलीचे नाव सर्वात वरच्या स्थानावर आहे. जगभरात 40 हून अधिक जाती आढळतात आणि सर्वच पीस लीलीच्या जाती घरात वातावरण शुद्धीसाठी लावल्या जातात. (Plants Benefit)
यानंतर जेड प्लांट या वनस्पतीचे नाव येते. जेड वनस्पतीचे अनेक औषधी फायदे आहेत. जेड प्लांट घरात असल्यास धुळीसारख्या ऍलर्जी निर्माण करणाऱ्या कणांशी लढून आपले संरक्षण करते. वनस्पती मूळ दक्षिण आफ्रिकेची आहे. वास्तुशास्त्रामध्येही जेड प्लांट वनस्पतीचे महत्त्व सांगितले आहे. जेड वनस्पती वर्षभर हिरवीगार राहते. या वनस्पतीची उंची सुमारे 5 ते 8 फूट असते. बोन्साय बनवण्यासाठी जेड प्लांटचाही वापर केला जातो. ज्या प्रकारे लोक मनी प्लांटला संपत्तीचे प्रतीक मानण्यात येते त्याचप्रमाणे जेड प्लांटला संपत्तीचे प्रतीक मानले जाते. याशिवाय आयुर्वेदिक औषधांमध्येही याचा उपयोग होतो. जेड प्लांट घरात असल्यास घरात सकारात्मक उर्जा वाढते. जेड प्लांट घरातील वातावरण निरोगी ठेवते, त्यामुळे रोगांचे प्रमाण कमी होते.
मनी प्लांट ही वेलही आरोग्यासाठी फायदेशीर (Plants Benefit) मानली जाते. मनी प्लांट घरात असल्यास संपत्तीची भरभराट होते, असे मानले जाते. पण ही वेल आरोग्यासही फायदेशीर ठरते. तसेच त्यामुळे, घरातील वातावरण शुदध होण्यास फायदा होतो. मनी प्लांट कार्बन मोनोऑक्साइड सारखे हानिकारक प्रदूषण शोषून हवा शुद्ध करते. स्नेक प्लांट देखील घरातील हवा शुद्ध करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. स्नेक प्लांटमुळे हवा शुद्ध होतेच पण बेंझिन आणि फॉर्मल्डिहाइड सारख्या कर्करोगास कारणीभूत घटकांना दूर ठेवण्यास मदतही होते. वनस्पती घरात असेल तर तणाव दूर होऊन मानसिक शांती मिळण्यासही मदत होते. लांब वाढणा-या या वनस्पतीला सूर्यप्रकाशाची फारशी गरज लागत नाही. तसेच पाण्याचे प्रमाणही कमी लागते. त्यामुळे स्नेक प्लांट लावण्यावर अनेकांचा भर असतो.
=========
हे देखील वाचा : महिलांनाच का होते अधिक थायरॉइडची समस्या? ‘या’ घरगुती उपायांनी करा उपचार
=========
दिसायला अत्यंत सुंदर असणारे अरेका पामच्या झाडाचे अनेक औषधी फायदे आहेत. हे झाड घरात असल्यास हवा शुद्ध करते. शिवाय हवेतील हानिकारक कणही शोषून घेते. अरेका पाम घरातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते आणि प्रदूषणमुक्त हवेचा अनुभव मिळतो. अरेका पाम ही वनस्पती ज्या घरात आहे, तिथे ऑस्कीजनचे प्रमाण जास्त प्रमाणात आठळत असल्याचे संशोधन झाले आहे.
घरातील हवा शुद्ध करण्यासाठी आणि आरोग्यासाठी आणखी एक वनस्पती सर्वाधिक गुणकारी मानली जाते, ती म्हणजे कोरफड. कोरफड ही महिलांसाठी संजीवनी मानली जाते. कोरफड वनस्पती हानिकारक वायू नष्ट करून वातावरण शुद्ध करते. तसेच या वनस्पतीला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफड सर्दी, खोकल्यापासून सुटका करते. डोळे-केस यांची निगा राखण्यासाठी कोरफडीचा उपयोग होतो. मोबाईल, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे चुरचुरत असतील, तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो. रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात. घरात लावलेली कोरफड असेल तर ती सहज उपलब्धही होते.
हवेला शुद्ध करण्यासाठी एअर प्युरिफायर ऐवजी या वनस्पती लावल्यास त्याचा दुहेरी फायदा होतो. त्यांनी हवा शुद्ध होतेच पण त्यासोबत आरोग्यालाही त्याचा तेवढाच फायदा होतो. शिवाय एअर प्युरिफायर पेक्षा अत्यंत कमी किंमतीत या वनस्पती उपलब्ध आहेत.
सई बने