Home » China : कामगारांना जमिनीत गाडून त्यावर उभारलं जगाचं एक आश्चर्य!

China : कामगारांना जमिनीत गाडून त्यावर उभारलं जगाचं एक आश्चर्य!

by Team Gajawaja
0 comment
China
Share

ग्रेट वॉल ऑफ चायना हे जगातल्या सात आश्चर्यांमधलं एक आश्चर्य! पण हे जितकं दिसायला भारी आणि भव्य दिसतंय ना, तितकाच त्याचा इतिहास भयंकर आणि रहस्यमयी आहे. म्हणजे ज्या हातांनी हे द ग्रेट वॉल ऑफ चायना बांधलं, त्याच दहा लाख हातांंना म्हणजे दहा लाख कामगारांना तिथेच जमिनीत गाडलं आणि त्यांच्यावरती हे द ग्रेट वॉल ऑफ चायना बांधलं. ऐकून विक्षिप्त वाटेल, पण हे खरं आहे आणि असं म्हणतात, जमिनीत आणि त्या भिंतीत गाडलेल्या कामगारांचा आकडा कदाचित १० लाखपेक्षा जास्त असू शकतो. म्हणून तर हिला जगातली सर्वात लांब स्मशानभूमी असं सुद्धा म्हटलंय. पण त्या लाखो कामगारांना दफन करून जगातली ही भव्य भिंत बांधण्याचं कारण काय? आणि त्यामागचं भीषण वास्तव काय? जाणून घ्या. (China)

ग्रेट वॉल ऑफ चायनाचं बांधकाम जवळपास 2500 वर्षांपूर्वी सुरू झालं, जे पुढे तब्बल 2000 वर्ष चाललं. याची लांबी आहे तब्बल 21196 किमी.. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारीच्या जवळपास साडे पाच फेऱ्या होतील हे इतकं लांब आहे. आज जवळपास प्रत्येक वर्षी इथे 2 करोड पर्यटक येतात, पण तो पूर्ण पार करायला कोणालाच शक्य झाला नाही. इन मिन 10 -12 लोकांंनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. आता जर कॅलक्युलेशन केलं तर ग्रेट वॉल ऑफ चायनाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला १७६ दिवस लागतील तेसुद्धा एकही ब्रेक न घेता. म्हणजे विचार करा ना, 2000 वर्षात किती कामगार लागले असतील हे बांधायला. किन पासून मिंग डायनॅस्टीपर्यंत नऊपेक्षा जास्त राजघराण्यांनी थोडं थोडं करत हे बांधलं. सगळ्यात जुना हिस्सा इ.स.पू. सातव्या शतकात बांधला गेला, तर सगळ्यात नवीन मिंग राजवटीत म्हणजे चौदाव्या ते सतराव्या शतकात बांधला गेला.

China

इतिहासात असं सांगितलं आहे की, साधारण 20 ते 30 लाख कामगारांनी हे बांधलं. पण हा आकडा कदाचित करोडोंच्या आसपास असू शकतो. आता हे कामगार कोण? तर सैनिक, शेतकरी, कैदी आणि काही स्थानिक लोकं. तेव्हा मशीन्स नव्हत्या तर या कामगारांना अवजड दगड आणि मातीचे ढीग स्वतःच्या हाताने डोंगराळ भागात वाहून न्यावे लागत होते. हे काम १२-१६ तास सतत चालायचं. त्यामुळे कामगारांना जास्त आराम नाही आणि खायला पुरेसं अन्न नाही, त्यामुळे कामगार आजारी पडले आणि त्यातच काही कामगार मरण पावले. (China)

बरं, हे कामगारांच्या मृत्यूमागे हे एकच कारण नव्हतं तर हवामानही तितकंच कारणीभूत होतं. म्हणजे काही ठिकाणी गोठवणारी थंडी, जवळपास -२०°C, तर काही ठिकाणी हे एकदम उलट होतं, ते म्हणजे ४०°C. यामुळे आणि पावसाळ्यात भूस्खलन आणि पूरमुळे काही कामगार मरण पावले. उंच डोंगरांवर किंवा खड्ड्यांजवळ दगड वाहताना किंवा बांधकाम करताना खाली पडले आणि दगडाखाली चिरडले गेले. इतकंच नव्हे, तर काही कामगारांना जबरदस्तीने काम करायला लावलं होतं आणि त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला, तेव्हा त्या प्रयत्नात ते मारले गेले. (Top Stories)

==============

हे देखील वाचा : Arthritis : आर्थ्रायटिसची सुरुवातीची लक्षणे ओळखा! सांधेदुखीपासून बचाव कसा कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन

==============

पण इथे मोठा प्रॉब्लम हा होता की, ग्रेट वॉल डोंगराळ, दुर्गम भागात बांधलं गेलं आणि जेव्हा कामगारांचा मृत्यू व्हायचा तेव्हा मृतदेह गावी किंवा कुटुंबाकडे पाठवणं जवळजवळ अशक्य होतं, कारण तेव्हा ट्रान्सपोर्टेशन नव्हतं आणि घरापासून कामाचं अंतर भरपूर होतं. मग मृतदेह सडण्याआधीच त्यांना तिथेच कुठेतरी दफन करणं सोपं होतं. चीनमध्ये तर विशेष करून किन आणि हान राजवंशात, कामगारांना फारशी किंमत दिली जात नव्हती. त्यांचे मृतदेह रिसपेक्टफुली दफन करण्याची गरज मानली जात नव्हती. त्यामुळे मृतदेह भिंतीच्या बांधकामातच जमिनीखाली दफन केलं जायचं, ज्यामुळे बांधकामाचा वेळ वाचायचा. काही इतिहासकारांचं मत आहे की, किन राजवंशात मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह भिंतीत दफन करून भिंतीचं रक्षण करण्याचा प्रतीकात्मक असा विश्वास होता आणि त्यात बांधकामाचा वेग कमी होऊ नये ,म्हणून त्यांना तिथेच दफन करून पुन्हा कामाला सुरुवात व्हायची. (China)

यातच संपूर्ण बांधकामादरम्यान अंदाजे १० लाख ते १ कोटी कामगारांचा मृत्यू झाला असल्याच अंदाज आहे. “मृत्यू झालेल्या कामगारांचे हाडांचे ढीग” असं वर्णन सिमा कियानच्या Records of the Grand Historian मध्ये आहे. काही पुरातत्त्वीय उत्खननात भिंतीच्या आत मानवी अवशेष सापडले, जे कामगारांचे असावेत, असं सांगितलं जातं. म्हणजे हे ग्रेट वॉल ऑफ चायना जितकं भव्य दिसतं तितकाच त्याचा इतिहास भयंकर आहे. आता कधी तुम्ही या ठिकाणी जाल, त्या जागेवर उभे राहाल, तेव्हा तुम्हाला त्यामाच्या भीषण इतिहासाची जाणीव नक्कीच होईल.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.