2023 हे वर्ष सुरु होण्याचे आधीचे काही महिने आठवताहेत, त्या महिन्यात बाबा वेंगा हे नाव सतत वाचनात येत होते. बाबा वेंगा (Baba Venga) ही बल्गेरियन भविष्यकर्ती. 1996 साली मृत्यू पालवेल्या बाबा वेंगा यांनी अशी काही भविष्य सांगितली आहेत, जी खरी झाली आहेत. बाबा वेंगा यांनी 2023 या चालू वर्षाबाबतही अशीच अनेक धक्कादायक भविष्य सांगितली. त्यापैकी काही खरीही ठरली आहेत.
बाबा वेंगा यांनी 2023 हे वर्ष युद्धवर्ष असल्याचे सांगितले होते. त्यानुसार रशिया आणि युक्रेन युद्ध आणि आता इस्त्रायल गझापट्टीमध्ये सुरु असलेले युद्ध याबाबत बाबा वेंगाचा अंदाज खरा असल्याचे सांगितले गेले. आता याच बाबा वेंगा यांची 2024 बाबतची भविष्यवाणी पुढे आली आहे. 2024 हे वर्ष 2023 पेक्षाही अधिक धक्कादायक असल्याचे बाबा वेंगा यांनी सांगितले आहे. यात रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा खून, ते पृथ्वीची कक्षा बदलण्याची भविष्यवाणी असल्यानं सध्या सोशल मिडियात पुन्हा बाबा वेंगाची (Baba Venga) हवा आहे.
बल्गेरियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांना बाल्कनचा नॉस्ट्राडेमस म्हटले जाते. 1996 मध्ये अंध असलेल्या बाबा वेंगा यांचा मृत्यू झाला तरी त्यांनी पुढच्या अनेक वर्षात होणा-या धक्कादायक घटनांची नोंद करुन ठेवली आहे. 2023 च्या खळबळजनक भविष्यवाणीनंतर आता याच बाबा वेंगा यांच्या 2024 या आगामी वर्षाची भविष्यवाणी पुढे आली आहे.
यामध्ये युरोपवर मोठं संकट येणार असल्याचे बाबा वेंगा यांनी म्हटले आहे. शिवाय हवामानातही मोठे बदल होणार आहेत. बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला होण्याची भविष्यवाणी केली होती. त्यामुळेच आता 2024 बाबत त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या लहान असतानाच त्यांना अंधत्व आले. मात्र अंधत्व आल्यावर त्यांच्याकडे भविष्य सांगण्याची विलक्षण क्षमता आली. बाबा वेंगा यांचे 26 वर्षांपूर्वी, म्हणजे, वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. (Baba Venga)
परंतु त्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्यांमधून आजही त्यांची आठवण काढण्यात येते. बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेवर 9-11 चा हल्ला आणि ब्रिटनमधील ब्रेक्झिटची भविष्यवाणी केली होती. याच बाबा वेंगांनी 2024 साठी अनेक धक्कादायक भविष्ये सांगितली आहेत. त्यातील पहिले धक्कादायक भविष्य म्हणजे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या होणार. हो, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांच्याच एका देशवासीयाकडून हत्या होणार आहे.
आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी पूतिन यंना ह्दयविकाराचा धक्का आल्याची बातमी आली. नंतर ही बातमी खोटी असल्याची माहिती पुतिन यांच्या कार्यलयाकडून देण्यात आली. याशिवाय एका टेलिग्राम चॅनलने पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यानुसार पुतिन यांचा मृत्यू मॉस्कोच्या उत्तरेकडील वालदाई राजवाड्यात झाला आहे. त्यातच आता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. बाबा वेंगा यांनी 2024 साल हे मोठ्या आर्थिक संकटाचे असेल हेही सांगितले आहे. (Baba Venga)
या आर्थिक संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. आर्थिक शक्तींचे पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतर होईल, असेही भविष्य सांगितले आहे. त्याचे विश्लेषण करतांना अनेकांनी युरोपचे जगावर वर्चस्व कमी होईल, असे सांगितले आहे. याशिवाय बाबा वेंगा यांनी पुढील वर्षी नैसर्गिक आपत्ती आणि खराब हवामानाचे विपरीत परिणाम पाहायला मिळतील असे सांगितले आहे. पृथ्वीवर रेडिएशनचा धोका वाढेल, मुख्य म्हणजे, पृथ्वीची कक्षा बदलेल, असेही सांगितले आहे. पुढचेवर्ष पूर, हिमयुगाचे वर्ष असेल असेही भाकीत व्यक्त केले आहे.
शिवाय आगामी वर्षात जगभरात मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होणार आहेत. सायबर हल्ल्यांचा धोकाही वाढणार आहे. हॅकर्स पॉवर ग्रीड्स आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्ससारख्या ठिकाणी हल्ले करतील. यामुळे अनेक देशांच्या सुरक्षेलाही धोका होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याबरोबरच जी युद्ध सुरु आहेत, तिथे कुठलातरी मोठा देश जैविक शस्त्रांचा वापर करेल असा दावाही बाबा वेंगा यांनी केला आहे. त्याचबरोबर 2024 हे वर्ष युरोपसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दहशतवादी मोठ्याप्रमाणात युरोपमध्ये अराजकता पसरवणार असल्याचा अंदाजही बाबा वेंगा यांनी व्यक्त केला आहे. (Baba Venga)
==============
हे देखील वाचा : एप्सम सॉल्टचे सेवन करण्याचे फायदे
==============
मात्र वैद्यकीय क्षेत्रासाठी बाबा वेंगा (Baba Venga) यांनी आशादायक भविष्यवाणी व्यक्त केली आहे. यांच्यानुसार अल्झायमरसह असाध्य आजारांवर नवीन उपचार उपलब्ध होणार आहेत. शिवाय 2024 मध्ये कॅन्सर सारख्या रोगावर मात करता येईल, असेही भविष्य बाबा वेंगा यांनी व्यक्त केले आहे. आता बाबा वेंगा यांच्या या भविष्यवाणीची सर्वत्र चर्चा आहे. पुतीन यांची हत्या आणि युरोपमध्ये वाढणारा हिंसाचार याबाबत अधिक चिंता व्यक्त होत आहे.
सई बने