Home » मुलीच्या लग्नाचे टेंन्शन असल्यास ‘या’ शासकीय योजनेत करा गुंतवणूक, मिळेल उत्तम परतावा

मुलीच्या लग्नाचे टेंन्शन असल्यास ‘या’ शासकीय योजनेत करा गुंतवणूक, मिळेल उत्तम परतावा

by Team Gajawaja
0 comment
Marriage 53 times in life
Share

मुलीचे लग्न करायचे म्हटले की, घरातील मंडळींना पैशांसंदर्भात विचार पडतो. आपण लग्नासाठी पुरेसे पैसे देऊ का की नाही असे विविध प्रश्न खासकरुन वडिलांना पडतात. मात्र तुम्ही काळजी करु नका. कारण शासनाच्या अशा काही योजना आहेत ज्या फक्त मुलींच्या उत्तम भवितव्यासाठी सुरु करण्यात आल्या आहेत. याचा फायदा सर्व मुलींच्या पालकांना घेता येतो. फक्त अशी कोणती शासकीय योजना आहे आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा हे तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत. त्यामुळे मुलीच्या लग्नाची चिंता सोडा आणि शासनाच्या पुढील योजनेत गुंतवणूक करा. या योजनेत तुम्हाला उत्तम परतावा सुद्धा मिळतो.(Govt schemes for girl)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासकरुन मुलींसाठी त्यांचे भविष्य उत्तम होण्याच्या उद्देशाने 22 जानेवारी 2015 पासून सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) सुरु केली आहे. ही एक साधी सरळ बचत योजना असून त्या अंतर्गत 7 टक्क्यांहून अधिक व्याजदरावर परतावा मिळतो. जर तुमची मुलगी अल्पवयीन असेल आणि त्याचवेळी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर याचा अधिक फायदा होईल. कारण यामधून मिळणारा पैसा तुम्ही तिच्या शिक्षण ते लग्नापर्यंतच्या गोष्टींसाठी हमखास वापरु शकता.

सुकन्या समृद्धी योजनेत किती असतो व्याजदर?
या योजनेत तुम्ही खाते सुरु केले असेल तर 7.6 टक्क्यांनी वार्षिक व्याज दिले जाते. व्याजाची गणना महिन्याच्या पाचव्या दिवसाचा शेवट आणि महिन्या अखेर दरम्यान झालेल्या सर्वाधिक कमी दरावर केली जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाला खात्यात व्याज जमा केले जाते. सुकन्या समृद्धि योजनेवर मिळणारे व्याज आयकर अधिनियमच्या अंतर्गत टॅक्स फ्री असते.

Govt schemes for girl
Govt schemes for girl

सुकन्या समृद्धी योजनेत कोणला खाते सुरु करता येते?
सुकन्या समृद्धी योजनेत खाते सुरु करण्यासाठी 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावावर तिच्या पालकांकडून ते सुरु करता येते. देशातीक कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत एका मुलीच्या नावे एकच खाते सुरु करता येते. एका परिवारात अधिकाधिक दोन मुलींच्या नावे सुद्धा खाते सुरु करता येते. दरम्यान, जुळी/तीन मुलींचा जन्म झाल्यास दोन पेक्षा अधिक खाते सुरु करण्याची परवानगी असते.(Govt schemes for girl)

हे देखील वाचा- नोकरी करताना पैशांची बचत कशी करावी?

-खात्यात पैसे भरण्यासंदर्भातील नियम
सुकन्या समृद्धी योजनेत कमीत कमी 250 रुपये जमा करुन खाते सुरु करता येते. एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये अधिकाधिक 1.50 लाख रुपये जमा करता येतात. हे पैसे किती ही हप्तांमध्ये किंवा एकाच जमा करता येऊ शकते. यामध्ये जमा करण्यात येणारी रक्कम ही आयकर अधिनियमच्या कलम 80 सी अंतर्गत कपात करण्यायोग्य असते.

-अन्य महत्वाची बाब
सुकन्या समृद्धी योजनेत खाते सुरु करण्यासाठी लाभार्थीचा जन्म दाखला आणि पालकांचा पत्त्याचे कागदपत्र आणि आयडी प्रुफची गरज असते. हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सुरु केले जाऊ शकते. योजनेचा कालावधी हा मुलीचे वय 21 वर्ष होईपर्यंत किंवा 18 वर्षानंतर तिच्या लग्नाच्या वेळेपर्यंत असू शकतो. या दोन्ही स्थितीत योजनेतील संपूर्ण पैसे काढले जाऊ शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.