दिवाळीच्या पाच दिवसांमधील एक महत्त्वाचा सण म्हणजे गोवर्धन पूजा. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. अर्थात लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला किंवा पाडव्याला गोवर्धन पूजा केली जाते. याच पूजेला अन्नकूट असेही म्हटले जाते. गोवर्धन पूजा ही भगवान श्रीकृष्णाला समर्पित करण्यात आला आहे. यादिवशी अंगणात गोवर्धन पर्वत, श्रीकृष्ण आणि गायींची पूजा केली जाते. (Diwali Govardhan pooja)
यंदा गोवर्धन पूजा २२ ऑक्टोबर बुधवार रोजी संपन्न होत आहे. गोवर्धन पूजेच्या दिवशी अंगणात शेणाने गोवर्धन पर्वत साकारावा. त्यासोबत मातीची गाय किंवा वासरुही तयार करावे. पूजा विधीमध्ये आधी श्रीकृष्णाला दुधाने आंघोळ घालावी. यानंतर श्रीकृष्णाची पूजा करुन अन्नकूट अर्पण करावा. गोवर्धन पूजेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला ५६ नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. (Marathi News)
द्वापारयुगात भगवान विष्णूंनी कृष्ण रूपात जन्म घेतला. या अवतारात त्यांनी अनेक लीला केल्या. ते थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, गोकुळातील लोकं चांगल्या पावसासाठी इंद्राची पूजा करतात. ते पाहून श्रीकृष्णाने त्यांना गोकुळवासीयांना असे करण्यास मनाई केली आणि लोकांना सांगितले, ‘आपण इंद्राची पूजा करू नये, पाऊस पडणे हे इंद्रदेवाचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करावी. गावातील लोकांच्या उपजीविकेचा आधार गोवर्धन पर्वत आहे. या डोंगरावरील गवत आणि वनस्पती खाल्ल्यानंतर आपल्या गायी दूध देतात. दूध आपले जीवन चालवते. अशा प्रकारे गोवर्धन पर्वत आपल्यासाठी पूजनीय आहे. (Latest Marathi Headline)
श्रीकृष्णाच्या बोलण्यावरून गावातील लोकांनी देवराज इंद्राची पूजा करणे बंद केले आणि गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने गोकुळ प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू केला. पाऊस एवढा पडला की गावातील लोकांची घरे, शेते पाण्याखाली गेली. तेव्हा कृष्णाने सांगितले की या पावसापासून गोवर्धन पर्वतच आपले रक्षण करू शकेल. म्हणून आपण त्यांच्या पायाशी जायला हवे. तोच इंद्रदेवाच्या क्रोधापासून आपला बचाव करेल. कृष्णाने करंगळीणे संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्वांचे रक्षण केले. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत नियमितपणे ७ दिवसांपर्यंत उचलून धरला होता. या दिवसात त्यांनी काहीही खाल्ले किंवा प्यायले देखील नव्हते. (Top Marathi News)
श्रीकृष्णाला ५६ पदार्थच का दाखवतात नैवैद्य म्हणून?
श्रीकृष्ण जेव्हा यशोदामाता आणि नंदलाल यांच्याबरोबर गोकुळात होते, तेव्हा कृष्णाची आई त्यांना दिवसातून ८ वेळा स्वतःच्या हाताने जेवू घालायची. मात्र जेव्हा कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा सात दिवस श्रीकृष्ण तहान भूक सोडून गोवर्धन आपल्या करंगळीवर घेऊन उभे होते. जेव्हा पाऊस नमला आणि त्यांनी गोवर्धन पर्वत खाली ठेवला तेव्हा त्यांच्या आईने यशोदाने आणि सर्वच गोकुळवासियांनी विचार केला की, श्रीकृष्णाने सात दिवस काहीही न खाता-पिता पर्वत उचलून आपले रक्षण केले. तेव्हा कृष्णाची आई यशोदा आणि सर्व गोपिकांनी मिळून कृष्णासाठी प्रत्येक एका दिवसात ८ वेळा या हिशोबाने सात दिवसांचे मिळून ५६ प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले. या ५६ पदार्थांमध्ये कृष्णाच्या आवडीच्याच व्यंजनांचा समावेश केला गेला होता. (Marathi Trending News)
==========
Diwali : कार्तिक प्रतिपदेला साजऱ्या होणाऱ्या गोवर्धन पूजा आणि अन्नकूटचे महत्त्व काय?
==========
५६ भोगाचा प्रसाद
कडू, तिखट, तुरट, आम्ल, खारट आणि गोड. या सहा रसांपासून ५६ भोग तयार केले जातात. छोले, जिलेबी, दही, लोणी, मलई, मेसू, रसगुल्ला, पगी, महारैता,शिखरण, शरबत, बल्का (बत्ती), इक्षू, बटक, मोहन भोग, लावा, काशया, मधुर, टिका, माथरी, फेणी, पुरी, खजला, घेवर, मालपुआ, थुली, लोंगपुरी, खुर्मा, दलिया, परीखा, एका जातीची बडीशेप सह बिलसरू, लाडू, हिरव्या भाज्या, अधुना लोणचे, माठ, खीर, भात, सूप, चटणी, करी, दही करी, रबरी, पापड, गाईचे तूप, सेरा, लस्सी, सुवत, मोहन, सुपारी, वेलची, फळे, तांबूळ, कडू, आम्ल, तांबूळ, लसिका. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी ५६ नैवेद्य अर्पण केल्याने भक्तांना त्यांच्या घरात कधीही अन्न आणि संपत्तीची कमतरता भासणार नाही. यामुळे जीवनात शुभता येते आणि भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)