Google Service : गुगलकडून युजर्सच्या सुरक्षिततेसाठी खास प्लॅन तयार केला आहे. गुगलच्या नव्या प्लॅननुासार लाखो युआरएल बंद केल्या जाणार आहेत. खरंतर, गुगलकडून goog.gl युआरएल बंद करण्यात येणार आहे. कंपनीकडून ही युआरएल शॉर्ट केली जाणारी सुविधा बंद केली जाणार आहे. यासाठी डेडलाइनही ठरवण्यात आली आहे. गुगलकडून येत्या 25 ऑगस्टपासून सुविधा बंद करणार आहे.
गुगलनुसार, येत्या 25 ऑगस्टनंतर goo.gl युआरआलमध्ये 404 असे दिसून येणार आहे. म्हणजेच सर्व लिंक 25 ऑगस्टनंतर काम करणे बंद करणार आहेत. गुगलच्या या निर्णयामुळे लाखोच्या संख्येने उपलब्ध असलेल्या शॉर्ट युआरआएल बंद केल्या जाणार आहेत.
कंपनीने दिली सुचना
गुगलच्या मते, 23 ऑगस्टपर्यंत युजर्सला अॅलर्ट पाठवले जाणार आहेत. एखाद्या युजरने goo.gl लिंकवर क्लिक केल्यास त्याला सुविधा बंद होणार असल्याचे नोटिफिकेशन पाठवले जाणार आहे. गुगल आधी हे नोटीफिकेशन मर्यादित लोकांनाच पाठवणार आहे. पण तारीख जवळ आल्यानंतर सर्व युजर्सल नोटिफिकेशन पाठवले जाणार आहे. (Google Service)
कशी बंद झाली सुविधा
ही सुविधा बंद करण्याची घोषणा वर्ष 2028 मध्ये झाली होती. यानंतर वर्ष 2019 मध्ये लिंक शॉर्ट करण्याची सुविधा बंद केली. आता लिंक कायमची बंद होणार आहे. याआधीही गुगलकडून गुगल प्लस, हँगआउट्स सुविधा बंद केली होती.