Home » Google चे नवे मोबाइल अॅप भारतात लाँच, सर्च करण्याचा बदलणार अनुभव

Google चे नवे मोबाइल अॅप भारतात लाँच, सर्च करण्याचा बदलणार अनुभव

गुगल जेमिनी अॅप अखेर भारतात दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर लाँच करण्यात आले आहे. हे एक आर्टिफिशिअल इंटेलिजेंसवर काम करणारे अॅप आहे. यामुळे सर्चिंग करण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणारा ठरणार आहे.

by Team Gajawaja
0 comment
Google Vacancy | KFacts
Share

Google New App : गुगलकडून एक नवे मोबाइल अॅप Gemini AI भारतात लाँच करण्यात आले आहे. हे अॅप नऊ भारतीय भाषांमध्ये वापरता येणार आहे. म्हणजेच युजर्सला देशातील प्रसिद्ध भाषा जसे की, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलुगु आणि उर्दूमध्ये ऑनलाइन पद्धतीने काहीही सर्च करता येणार आहे.

गुगलने आपल्या बार्ड एआय चॅटबॉटला फेब्रुवारी महिन्यात री-ब्रँन्ड केले होते. यामुळे गुगल जेमिनी नावाने एक वेगळे अॅप लाँच केले होते. दरम्यान, भारतीय युजर्सला या मोबाइल अॅपसाठी वाट पहावी लागली होती.

सुंदर पिचाई यांच्याकडून घोषणा
गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतात जेमिनी अॅपच्या लाँचची घोषणा सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून केली होती. यावेळी सुंदर पिचाई यांनी म्हटले की, आम्ही भारतात जेमिनी मोबाइल अॅप लाँच करत असून नऊ भारतीय भाषांना सपोर्ट करणार आहे. यामध्ये काही अत्याधुनिक फीचर्सही दिले गेले आहेत. याशिवाय गुगल मेसेजिंगमध्ये जेमिन अॅपचा सपोर्ट दिला जाईल. (Google New App)

कोणाला करता येईल वापर?
अॅपचा वापर अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन युजरला करता येणार आहे. आयफोन युजरला गुगल अॅपमध्ये जेमिन अपडेट मिळणार आहे. जेमिनी अॅपला मेसेजिंग अॅप आणि गुगल मेसेज ऑन वेबसोबत इंटीग्रेट करता येणार आहे.


आणखी वाचा :
चॅटिंग करणे होणार सोपे, स्मार्ट वॉचमध्येही वापरता येणार WhatsApp
आयुष्मान कार्डच्या माध्यमातून रुग्णालयाचा मोफत उपचारासाठी नकार? करा या क्रमांकावर फोन

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.