भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) ने नुकत्याच ग्लोबल टेक कंपनी गुगलला (Google) १३३७.७६ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. अॅन्ड्रॉइड मोबाईल डिवाइस इकोसिस्टिमध्ये काही बाजारात आपल्या मोनोपोलिचा चुकीचा वापर करण्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सीसीआयचे प्रमुख यांनी इंटरनेट कंपनीला सांगितले आहे की, अयोग्य हालचाली थांबवणे आणि बंद करण्याचे निर्देशन दिले आहेत.
कामकाज करण्याची पद्धत बदलण्याचे आदेश
आयोगाने एका पत्रकार परिषदेत असे म्हटले की, गुगलने एका निर्धारित वेळ-मर्यादेत आपल्या कामकाजात बदल करावा. सीसीआयने आपल्या विधानात असे म्हटले की, काही दिग्गज टेक कंपन्यांनी नॉन-ओएस वेब स्पेसिफिक वेब ब्राउजर मार्केटमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी अॅप स्टोर मार्केटमध्ये आपल्या उपस्थितीचा चुकीचा वापर केला आहे.
यापूर्वी सीसीआयने याच महिन्यात न्यूज संदर्भात मोनोपोलीच्या कथित नियमांसंदर्भात इंटरनेट कंनी गुगलच्या विरोधात आणखी एक विस्तृत तपासाचे आदेश दिले होते. सीसीआयने ८ ऑक्टोंबरला जाहीर केलेल्या या आदेशात असे म्हटले होते की, या संबंधित नियमाचा तपास हा डीजीकडून दिला जाणार आहे. सीसीआच्या नुसार, हे प्रकरण गुगलच्या विरोधात सुरु असलेल्या दोन अन्य मालकांशी जोडले जाणार आहे आणि यामधील आरोप हे बहुतांश सारखेच आहेत.
हे देखील वाचा- सीरप तयार करणाऱ्या ‘या’ कंपनीने सॉफ्ट ड्रिंकच्या जगात असा रचला इतिहास
सातत्याने कंपनी संदर्भात उपस्थितीत होतायत प्रश्न
गुगलच्या (Google) विरोधात हा आदेश खरंतर न्यूज ब्रॉडकास्टर्स अॅन्ड डिजिटल असोसिएशनकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर आला आहे. असोसिएशने आरोप लावला होता की, सर्च इंजिनमध्ये आपण जे सर्च करतो त्यात वेबलिंकला प्राथमिकता देण्यासाठी त्यांच्या सदस्यांना गुगलला आपली न्यूज संदर्भातील सामग्री देण्यासाठी भाग पाडले जाते.
दरम्यान, गुगलवर सातत्याने गेल्या काही काळापासून प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. भारताव्यतिरिक्त युरोप, अमेरिका आणि दक्षिण कोरियात सुद्धा कंपनीला आरोपांचा सामना करावा लागत आहे. युरोपात त्यांच्यावर असा आरोप लावण्यात आला आहे की, कंपनी सर्चमध्ये गुगल शॉपिंगला अधिक प्रोत्साहन देत आहे. तर आपल्या अॅपला प्राथमिकता देणे आणि ऑनलाईन अॅड मध्ये स्पर्धा संपवण्याचा आरो आहे. तर अमेरिकेत कंपनीवर सर्चमध्ये खास उत्तरे आणि गुगल प सर्विसला प्राथमिकता देत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणांमध्ये कंपनीला अरब डॉलरचा दंड सुनावण्यात आला आहे.