Google Map Updates : गुगल मॅपकडून भारतात आपल्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. जे पुढील महिन्याच्या 1 ऑगस्टपासून लागू केले जाणार आहेत. कंपनीने भारतात आकारल्या जाणारे शुल्क 70 टक्क्यांनी कमी केले आहेत. याशिवाय आता गुगल मॅप आपल्या सुविधेच्या बदल्यात डॉलर एवजी भारतीय पैसे घेणार आहे. गुगल मॅपने अशावेळी आपल्या नियमांत बदल केले आहेत जेव्हा ओलाकडून त्यांचे स्वत:चे नेव्हिगेशन अॅप मार्केटमध्ये उतरवण्यात आले आहे.
सर्वसामान्य युजर्सवर काय परिणाम होणार
गुगलच्या नव्या नियमांमुळे सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्वसामान्य युजर्सला कोणत्याही प्रकारचा शुल्क मोजावा लागणार नाहीये. युजर्सला गुगल मॅपची सुविधा फ्री मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. पण जी कंपनी गुगल मॅपचा वापर करते त्यांना मात्र शुल्क मोजावे लागणार आहेत. याच शुल्कात काही प्रमाणात कपातही गुगलकडून करण्यात आली आहे.
याआधी भारतात गुगल मॅपच्या नॅव्हिगेशन सुविधेच्या बदल्यात 4-5 डॉलर मंथली फी घेतली जायची. पण नियमात बदल करुन ती कमी करत 0.38 टक्के ते 1.50 डॉलर करण्यात आली आहे. एका बाजूला गुगल आपल्या सुविधेसाठी पैसे आकारत आहे. तर दुसऱ्या बाजूला नवेनवे नेविगेशन मार्केटमध्ये आलेल्या ओला मॅप सुविधेला मोफत वापरण्यासाठी उपलब्ध करून देत आहेत. (Google Map Updates)
गुगलच्या नियमांवर टीका
ओलाची एआय कंपनी क्रुट्रिमने काही काळाआधी मेड फॉर इंडिया आणि प्राइस्ड फॉर इंडिया नावाने योजना सुरु केली आहे. यामध्ये ओला मॅप्ससाठी नवा रोडमॅप आणि प्रायसिंग स्ट्रेटेजी तयार करण्यात आली आहे. ही योजना थेटपणे गुगल मॅपला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी लिंक्डिनवर पोस्ट करत गुगलवर टीकाही केली होती.