Home » गुगल मॅपमध्ये EV Charging स्टेशन शोधणे होणार सोपे, जाणून घ्या ट्रिक

गुगल मॅपमध्ये EV Charging स्टेशन शोधणे होणार सोपे, जाणून घ्या ट्रिक

तुमच्याकडेही इलेक्ट्रिक वाहन आहे का? तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण वाहनाची बॅटरी संपल्यास तुम्ही गुगल मॅपच्या माध्यमातून वाहन चार्जिंग स्टेशन शोधू शकता.

by Team Gajawaja
0 comment
Google Map tricks
Share

Google Map Tricks : सध्या बदलत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे पसंत करतात. पण इलेक्ट्रिक वाहनाचे काही फायदे असण्यासह तोटेही आहेत. पेट्रोल-डिझेलसाठी पुरेशा प्रमाणात पेट्रोल पंपांची सोय आहे. पण इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी स्टेशन शोधणे मोठा टास्क ठरू शकते.

इलेक्ट्रिक वाहनाचे पहिले नुकसान असे की, भारतात इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन नाहीत. अशातच रस्त्यात इलेक्ट्रिक वाहन बंद पडल्यास चिंता करण्याची गरज नाही. अशातच गुगल मॅपच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन कसे शोधायचे हे जाणून घेऊया…

गुगल मॅप करणार मदत
गुगल मॅपच्या मदतीने इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी स्टेशन कसे शोधावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

-पहिली स्टेप म्हणजे स्मार्टफोनमध्ये Google Map सुरु करा.
-गुगल मॅप सुरु करून उजव्या बाजूला तुमच्या प्रोफाइल पिक्चरखाली रेस्टॉरंट, पेट्रोल, हॉटेलसारखे काही पर्याय मिळतील. आता डाव्या बाजूला स्वाइप करा. स्वाइप केल्यानंतर More ऑप्शनवर क्लिक करा.
-आता थोड खाली स्क्रोल केल्यानंतर सर्विस सेक्शन दिसेल. येथे चार्जिंग स्टेशनच्या पर्यायावर क्लिक करा. (Google Map Tricks)

वरील काही स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन गुगल मॅपच्या माध्यमातून शोधून काढू शकता. याशिवाय चार्जिंग स्टेशन जवळ असेल तेथवर पर्यंतचा मार्गही गुगल मॅप दाखवला जाईल.


आणखी वाचा :
तुमचा मोबाइल क्रमांक बंद होणार? सरकारने अलर्ट जारी करत सांगितले सत्य
‘या’ बंदरावर नांगरण्यात आले प्रचंड मोठे जहाज

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.