जगभरात आर्थिक मंदी सुरु असल्याने विविध कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहेत. खासकरुन टेक आणि ई-कॉमर्स कंपन्यांवर त्याचा फार मोठा परिणाम झाला आहे. अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटरनंतर सर्च इंजिन गुगल मध्ये सुद्धा नोकरीवरुन कर्मचाऱ्यांना एक्झिट दाखवण्यास सुरुवात झाली आहे. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंकने १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी गुगलचे भारतीय वंशाचे सीईो सुंदर पिचाई यांनी एक स्टाफ मेमोच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली आहे. तसेच ते अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांची माफी सुद्धा मागितली आहे. तर पाहूयात नक्की का गुगलमध्ये कर्मचाऱ्यांना का कामावरुन काढून टाकले जात असल्याबद्दल अधिक. (Google Layoffs)
-स्टाफ मेमो मध्ये पिचाई यांनी काय म्हटले
Reuters च्या रिपोर्ट्सनुसारस कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या स्टाफ मेमो मध्ये अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी १२ हजार नोकरदारांना काढणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये पिचाई यांनी या बद्दलच्य निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेतली असून माफी ही मागितली आहे. पिचाई यांनी असे म्हटले की, खुप मेहनतीने काम करणाऱ्या काही टॅलेंन्टेड लोकांना सुद्धा गुडबाय म्हणावे लागणार आहे.
-आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर वाढता जोर
गुगल सध्या आपल्या प्लॅटफॉरमवर अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर अधिक जोर देत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलने जेनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस संदर्भाताली काही सॉफ्टवेअरमध्ये खुप मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळेच मॅनपॉवरची त्यांची निर्भरता कमी झाली आहे. या कारणास्तव अधिक मॅनपॉवरला बाहेरचा मार्ग दाखवला जात आहे. पिचाई यांनी स्टाफ मेमो मध्ये सुद्धा AI च्या सुरुवाती गुंतवणूकी व्यतिरिक्त गुगल प्रोडक्ट्स आणि सर्विसच्या मुल्याच्या आधारावर कंपनीसमोर असलेल्या संधींसाठी आश्वस्त होण्याबद्दल सांगितले आहे.
-कंपनीला आर्थिक बोझा कमी करायचा का?
पिचाई यांनी मेमो मध्ये स्पष्ट लिहिले आहे की, गुगलने गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वात मोठ्या स्तरावर यश मिळवले आहे. याची समानता करम्यासाठी आपण ज्या वास्तविक स्थितीचा सामना करत आहोत ते त्यापेक्षा अगली उलट इकोनॉमिक रियल्टीसाठी लोकांना कंपनीने घेतले होते. पिचाई यांनी लिहिले की, कंपनी समोर मोठ्या संधीचा फायदा घेण्यासाठी काही आव्हानात्मक निर्णय ही घ्यावे लागले आहेत. यामुळे कंपनीने सर्व क्षेत्र आणि सर्व प्रोडक्ट्सवर बारकाईने रिव्हू केले आहे.
-अमेरिकेत काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘ही’ सुविधा देणार कंपनी
-पिचाई यांनी मेमो मध्ये मान्य केले की, ट्रांजेक्शन सोप्पे नसणार आहे. त्यामुळे एखाद्या नव्या कंपनीत नोकरी मिळेपर्यंत कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला जाणार आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना पुढील सुविधा कंपनी देणार:
-कर्मचाऱ्यांना नोटीस पीरिडचे संपूर्ण पेमेंट करणार
-गुगलमध्ये एक सेवरेंस पॅकेज दिले जाईल, ज्यामध्ये १६ आठवड्याच्या वेतनासह गुगलमध्ये घालवलेल्या अतिरिक्त वर्षासाी दोन आठवड्यांचे वेतन अधिक होईल. त्याचसोबत कमीत कमी १६ आठवड्याचा GSU सुद्धा मिळणार.
-वर्ष २०२२ मधील सर्व प्रकारचे बोनस दिले जाली. तसेच शिल्लक सुट्ट्या ही मिळणार आहेत
-६ महिन्यापर्यंत हेल्थ केअर, जॉब प्लेसमेंट सर्विसेज आणि इमिग्रेशन सपोर्ट ही मिळणार
-अमेरिकेबाहेर कर्मचाऱ्यांना स्थानिक नियमानुसार सपोर्ट केला जाईल (Google Layoffs)
हे देखील वाचा- इंस्टाग्राम पोस्ट करताना लिहिलेल्या माहितीचा फॉर्मेट ‘या’ सोप्प्या पद्धतीने बदला
-वर्क फ्रॉम होम ऑप्शन निवडा
पिचाई यांनी असे म्हटले की, कर्मचाऱ्यांकडे खुप काही प्रश्न असतील की, आम्ही पुढे कसे जाणार? याचे उत्तर देण्यासाठी प्रत्येक सोमवारी कंपनी मुख्यालयाच्या टाउन हॉल मध्ये आयोजन केले जाणार आहे. तो पर्यंत तुम्ही वाईट बातमी पचवण्यासाठी स्वत:ला तयार करा. जर तुम्ही आपले कामकाज आज सुरु केले असेल तर आज आरामात वर्क फ्रॉम होम करा.
-गुगलच्या कामकाजावर किती होणार प्रभाव
एकत्रित १२ हजार लोकांना हटवल्यानंतर गुगलचे कामकाज किती प्रभाव पडणार हा सुद्धा प्रश्न उपस्थितीत राहतो. पिचाई यांनी आपल्या मेमो मध्ये अशा प्रकराचे संकेत दिले आहेत की, गुगल येणाऱ्या दिसात अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर विश्वास ठेवणार आहे. यामुळे कंपनीत नोकर भरती ते कॉर्पोरेट वर्किंग आणि इंजिनिअरिंत ते प्रोडक्ट्सच्या टीमवर ही प्रभाव पडणार आहे.