टेक्नॉलॉजी सेक्टर मध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी बदल होत असतो. यामध्ये बहुतांश लोकांना समाधान प्राप्त व्हावे त्या दृष्टीने काम केले जाते. जेणेकरुन कमी समस्यांचा सामना करावा लागेल. अशातच काही आर्टिफिशियल इंटेजिलिजेंसचे आहे. एआय आपल्यासाठी आर्थिक दृष्टीने फार महत्वाचे आहे. तर यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जाण्याची सुद्धा शक्यता आहे. जर तुम्हाला एआयमुळे नोकरी जाण्याची भीती सतत वाटत असेल तर कोणत्या सेक्टरला याचा सर्वाधिक धोका आहे हे पाहूयात. (Google AI)
आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञान विविध प्रकारच्या डेटा सेटचे विश्लेषण करुन तुम्हाला तुमच्या प्रश्नांची अधिक वेगाने उत्तर देण्यास सक्षम असते. याचा वापर काही सेक्टरमध्ये सुरु झाला आहे. तज्ञांच्या मते, एआयच्या कारणास्तव नोकरी जाण्याचा सर्वाधिक धोका शिक्षण आणि टेलिमार्केटिंग संबंधित लोकांना आहे. याबद्दल जगभरात सातत्याने शोध आणि अभ्यास केला जात आहे. नुकत्याच एका रिसर्च रिपोर्टच्या मते, हे तंत्रज्ञान अधिकाधिक वापरल्या येणाऱ्या वर्षांमध्ये मोठ्या लोकसंख्येसमोर पोट कसे भरायचे असा प्रश्न उपस्थितीत राहू शकतो.
रिसर्चच्या एका टीमने आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करणारे १० अॅपच्या भाषेच्या मॉडलिंगनंतर त्यामध्ये ५० पेक्षा अधिक मानवीय क्षमतांना जोडले. त्यानंतर निष्कर्ष काढला गेला की, हे तंत्रज्ञान व्यक्तीसाठी किती संकट उभं करु शकते. सध्या चॅट जीपीटी लोकांच्या समोर मोठे संकट म्हणून उभे आहे. हे अॅप ईमेल लिहिण्यासह तुमचा सीवी पाठवणे आणि रियल टाइम व्हिडिओ गेम, इमेज जनरेशेन, रीडिंग कॅप्यासिटी व्यतिरिक्त ट्रांन्सलेशन सुद्धा करु शकते. स्पष्ट आहे की, जर या अॅपमध्ये भाषा मॉडेलिंग करुन क्षमता वाढवल्यास तर मोठ्या लोकसंख्येला याचा फटका बसू शकतो. (Google AI)
संशोधकांच्या मते, आर्टिफिशयल इंटेलिजेंसच्या अधिक वापरामुळे अधिक धोका शिक्षण क्षेत्राला बसणार आहे. त्यानंतर ज्युडिशरीला सुद्धा याचा फटका बसू शकतो. तर जेनेटिक काउंसिलर्स, फाइनेंशियल एग्जामिनर्स आणि कंसल्टेंट, टेलीमार्केटिंग सेक्टर, बजेट अॅनालिस्ट, अकाउंटेट, ऑडिटर्स मॅनेजमेंट अॅनालिस्ट यांना सुद्धा धोका उद्भवू शकतो. क्लिनिकल काउंसिलर्स आणि परजेसिंग एजेंट्सला ही एआयचा वापर केला गेल्यास आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागू शकते. या व्यतिरिक्त काही दुसऱ्या सेक्टर्समध्ये सुद्धा यामुळे मोठ्या प्रमाणात नोकरी जाण्याची अधिक शक्यता आहे. सध्या असे काही अॅप आहेत जे मुलांना शिकवण्यास होमवर्क पूर्ण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
हे देखील वाचा- अज्ञात क्रमांकांवरुन फोन येतात? ब्लॉक करण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर वापरा
टोरांटो युनिव्हर्सिटी मध्ये असोसिएट केविन आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित एक कार्यक्रम चालवतात. त्यांच्या मते चॅट जीपीटी एमबीए डिग्री असणाऱ्या व्यक्तीपेक्षा उत्तम उत्तर देण्यास सक्षम आहे. ते असे म्हणतात की, बहुतांश कंपन्यांच्या ग्राहकांशी बातचीत करण्यासाठी चॅटबॉटचा वापर सुरु केला गेला आहे. अशातच एआयच्या माध्यमातून टेलीमार्केटिंग सेक्टर संबंधित लोकांना मोठा धोका आहे.