Home » जगात २०२२ मध्ये कोणत्या खास घटना घडल्या?

जगात २०२२ मध्ये कोणत्या खास घटना घडल्या?

by Team Gajawaja
0 comment
Goodbye 2022
Share

२०२२ वर्ष संपण्यासाठी आजचा शेवटचा दिवस. वर्ष २०२२ संपण्यासाठी आणि नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच २०२२ मध्ये काही घटना घडल्या आहेत ज्या संपूर्ण जगाने पाहिले आहे. या घटना युरोपाव्यतिरिक्त एशिया आणि दक्षिण अमेरिकेत दिसून आल्या. मात्र येणारे वर्ष आणखी काही वेगळे असेल असे प्रत्येक जण मानून चालला आहे. त्यामुळे २०२२ मध्ये कोणत्या घटना घडल्या आहेत त्याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Goodbye 2022)

ग्लोबल प्लॅटफॉर्मवर यंदाच्या वर्षात सर्वाधिक मोठी घटना फेब्रुवारी मध्ये रशिया-युक्रेन युद्ध झाले. या हल्ल्यात दोन्ही देशांच्या नागरिकांचा मृत्यू झाला. युद्ध अद्याप ही सुरु आहे. मात्र ते कधी संपेल याचा अंदाज लावला जात नाही आहे. दुसऱ्या महायुद्धआनंतर या यु्द्धात युरोपातील सर्वाधिक मोठे शरणार्थी संकट दिसून आले. ज्यामध्ये ८० लाख लोक विस्थापित झाले होते. या युद्धाचे मुळ युक्रेनच्या नाटोचा सहभाग होण्याचा निर्णय होता. ज्यावर रशियाने कठोर विरोध दर्शवला होता. युद्धाच्या कारणास्तव संपूर्ण जगात महागाई, खाद्य संकट आणि आर्थिक मंदी सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तसेच २०२२ मध्ये चीन जवळील स्थित ताइवान सुद्धा चर्चेत राहिला. चीनच्या सातत्याने ताइवानच्या दाव्यादरम्यान अमेरिकन संसदेचे स्पीकर नॅन्सी पेलोसीसह एक अमेरिकन प्रतिमंडळ जेव्हा ताइवानला पोहचले तेव्हा अमेरिका चीन मधील संबंध पुन्हा एकदा तणावाचे झाल्याचे दिसून आले. या यात्रेपूर्वी चीनने अमेरिकेला अशी पावले उचलण्यासंदर्भात इशारा दिला होता. तेव्हापासून वर्षाच्या अखेरपर्यंत चीन आणि ताइवान मध्ये क्षेत्रात सैन्याच्या हालचाली अधिक वेगवान झाल्या.

इराण आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा वाद हा फार जुना नाही. इराण मधअये कट्टर पंथीयांचे शासन आहे. मात्र या वर्षात जगाने इराण मधील महिलांनी विरोध करण्यास सुरुवात केल्याचे पाहिले. त्यांनी हिजाबच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते. सुरुवात सप्टेंबरला २२ वर्षाची माहसा अमीनीच्या अटकेने झाली होती. कारण तिने आपले केस व्यवस्थित झाकले नव्हते. तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मृत्यू झाला. त्यानंतर शेकडो महिला रस्त्यांवर आंदोलनासाठी उतरल्या.(Goodbye 2022)

हे देखील वाचा- जानेवारी नव्हे तर मार्च महिन्यापासून नवं वर्षाची व्हायची सुरुवात, रोमन कॅलेंडरचा असा आहे इतिहास

त्याचसोबत २०२२ मधअये दक्षिण अमेरिकेच्या राजकरणात मोठे बदल झाल्याचे दिसून आले. आजपासून पाच वर्षांपूर्वी महाद्वीपच्या राजकरणात दक्षिणपंथी राजनेत्यांचे वर्चस्व होते. तेव्हापासून वारे हळूहळू बदलू लागले. तेव्हा मेक्सिको, नंतर अर्जेंटीना आणि फिरबोलिवियानंतर पेरु आमि चीली मध्ये वामपंथी विचारधाराचे समर्थक सत्तेत आले. हे चलन वर्ष २०२२ मध्ये सुरु राहिले आणि एक मोठ्या बदलावाच्या रुपात वामपंथी समर्थित दल होन्डुरस, कोलंबिया आणि ब्राजीलमधअये सत्तेवर ताबा मिळवण्यास यशस्वी झाले. हे पूर्ण दक्षिण अमेरिकेत एका बड्या बदलावाच्या रुपात पाहिले जात आहे.

या व्यतिरिक्त जर एखाद्या देशात सर्वाधिक मोठा बदल झाला असेल तर ब्रिटेन मधील आहे. कारण ब्रिटेन मधील लोकांना एक मोठा धक्का बसला होता. कारण महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. त्यांच्या गादीवर त्यांच्या नंतर त्यांचा पुत्र किंग्स चार्ल्स तृतीय यांना बसण्याची संधी मिळाली. मात्र या व्यतिरिक्त इंग्लंडचे पंतप्रधान मंत्र्यांचे निवास ही अशांत राहिल्याचे दिसून आले. पहिले पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या राजीनाम्यानंतर लिज ट्रज यांनी सत्ता सांभाळली. मात्र ४५ दिवसाच्या आतमध्येच त्यांना खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर भारतवंशी ऋषी सुनक हे ब्रिटेनचे पंतप्रधान झाले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.