भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात विविध पोशाख, संस्कृती, भाषा, इतर अनेक समुदाय आणि त्यांच्या स्वतःच्या चालीरीती आहेत. अशा अनेक प्रथा आहेत, ज्यांच्याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटते. या समुदायांमध्ये सामान्य जगामध्ये ज्या गोष्टी सामान्य आहेत, त्यावर बंदी आहे. एवढेच नाही, तर हे समुदाय आपल्या प्रथा जिवंत ठेवण्यासाठी वाटेल ते करतात. (Reverse Clock)
भारतातील असेच एक गाव आहे, जिथे घड्याळ विरुद्ध दिशेने चालते. इतकेच नाही, तर येथे राहणारे समाज या घड्याळाचे पालन करतात आणि लग्नाच्या वेळी हे लोक उलटे फेरेही घेतात. विश्वास बसत नसेल, पण तरीही ही वस्तुस्थिती आहे. (Reverse Clock)
जिथे घड्याळ उलट दिशेने फिरते, हे विचित्र ठिकाण भारतातील छत्तीसगडमध्ये आहे. हा समाज ज्या गावात राहतो, तेथे घड्याळाचे काटे विरुद्ध दिशेने फिरतात. म्हणजे इथे १२ वाजल्यानंतर ११ वाजतात, १ नाही. (Reverse Clock)
उजवीकडून डावीकडे चालते येथील घड्याळ
जगातील सर्व घड्याळे डावीकडून उजवीकडे चालतात. बारा वाजल्यानंतर सर्व घड्याळात एक, नंतर दोन आणि नंतर तीन वाजतात. पण भारतातील छत्तीसगडमध्ये एक गाव आहे, जिथे घड्याळे उजवीकडून डावीकडे चालतात. म्हणजेच, १२ नंतर ११ आणि नंतर १० आणि नंतर ९ वाजतात. (Reverse Clock)
जेव्हापासून या गावात घड्याळ आले आहे, तेव्हापासून सगळी घड्याळं याच पद्धतीने विरुद्ध दिशेने चालतात. या गावाचे नाव कोरबा आहे. येथे राहणारे आदिवासी हे शक्तीपीठाशी संबंधित गोंड आदिवासी समाजाचे आहेत. ते नेहमी घड्याळ उलट दिशेने वापरतात.
दे देखील वाचा: अनोखी प्रथा! ‘या’ गावात विधवेच्या वेशात दिला जातो नवरीला निरोप
‘या’ कारणामुळे उलटे चालते घड्याळ
या आदिवासींना असे वाटते की, त्यांचे घड्याळ बरोबर चालते आणि जगातील इतर घड्याळे चुकीची चालतात. पृथ्वी उजवीकडून डावीकडे फिरते, असे समाजाचे म्हणणे आहे. तसेच चंद्रापासून ते सूर्य आणि तारेही याच दिशेने फिरतात. यामुळेच ही लोक या दिशेने घड्याळ ठेवतात. (Reverse Clock)
गोंडवाना टाईम
या समुदायातील लोक केवळ त्यांचे घड्याळ योग्य मानत नाहीत, तर त्यांनी त्यांच्या घड्याळाला एक विशेष नाव देखील दिले आहे. हे नाव त्यांच्या समाजाच्या नावाशी जोडलेले आहे. त्यांनी घड्याळाला ‘गोंडवाना टाइम’ असे नाव दिले आहे.
३० समुदाय चालतात या घड्याळानुसार
गोंडवाना टाईमनुसार चालणारा एकच समुदाय नाही, तर एकूण ३० समुदाय या उलट्या घड्याळानुसार चालतात. निसर्गाचे चक्र ज्या दिशेने फिरते, त्याच दिशेने त्यांचे घड्याळ चालते असे हे आदिवासी सांगतात. तसेच, आदिवासी समाजातील हे लोक महुआ, परसा आणि इतर झाडांची पूजा करतात. (Reverse Clock)