दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरु झाली आहे. दिव्यांच्या रोषणाईनं सर्व परिसर सजू लागला आहे. अशातच सर्वांना ओढ लागते, ती लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची. या दिवशी सायंकाळी प्रत्येक घरात माता लक्ष्मीचे पूजन करण्यात येते. मात्र भारतात असे एक मंदिर आहे, जिथे या दिवशाची पूजा करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते. हे मंदिर माता महालक्ष्मीचे सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जाते. कारण या मंदिराला करण्यासाठी तब्बल १५००० किलो सोनं वापरण्यात आलं आहे. यावरुन या मंदिराची महती आणि लोकप्रियता किती आहे, याची कल्पना येते. या मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यास संपत्ती आणि समृद्धीची आशीर्वाद मिळते अशी मान्यता आहे. हे मंदिर आहे, तामिळनाडू राज्यामध्ये. येथील तिरुपुरम आध्यात्मिक उद्यानात असलेले हे श्री लक्ष्मी नारायणी सुवर्ण मंदिर संकुल, अद्वितीय आहे. एका ता-याच्या आकारात हे मंदिर उभारण्यात आले आहे. (Tamil Nadu)
या मंदिराची रचना आणि त्यातील सोन्याची सजावट शिवाय, माता महालक्ष्मीची प्रसन्न मुर्ती बघण्यासाठी वर्षाचे सर्व दिवस येथे गर्दी असते. मात्र दिवाळीतील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी येथे भाविक मोठ्या संख्येनं येतात, आणि माता लक्ष्मीची आशीर्वाद घेतात. दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचे पूजन हे सर्वात लक्षणीय असते. अशा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सोन्याच्या मंदिरामध्ये जाण्याची संधी मिळाली तर, अर्थात असे माता लक्ष्मीचे सोन्याचे मंदिर भारतात आहे, याची फारशी कुणाला माहिती नाही. दक्षिण भारतात, १५,००० किलो सोन्यापासून बनवलेले मंदिर, देवी लक्ष्मीला समर्पित आहे. दिवाळीच्या दिवसात या मंदिरात विशेष पूजा केली जाते. येथे देवी लक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरून भाविक येतात. (Social News)
तामिळनाडूतील वेल्लोर येथील तिरुमलैकोडी येथील हिरव्यागार टेकड्यांच्या पायथ्याशी हे सुर्वण मंदिर आहे. हे सुवर्ण मंदिर तिरुपतीपासून १२० किमी, चेन्नईपासून १४५ किमी, पाँडिचेरीपासून १६० किमी आणि बेंगळुरूपासून २०० किमी अंतरावर आहे. श्रीपुरम महालक्ष्मी मंदिर अद्वितीय आहे. या मंदिराच्या सजावटीसाठी १५,००० किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. वेल्लोर येथील धर्मादाय ट्रस्ट, श्री नारायणी पीडम यांनी बांधले आहे. या ट्रस्टच्या प्रमुख श्री शक्ती अम्मा आहेत. त्यांना ‘नारायणी अम्मा’ म्हणूनही ओळखले जाते. देशात आणि विदेशात नारायणी अम्मा यांचे करोडो अनुयायी आहेत. मंदिरात श्री लक्ष्मी नारायणीची स्थापना कऱण्यात आली आहे. या मंदिराचे बांधकाम २००१ मध्ये सुरु झाले, तेव्हा मोठा होम, विधी कऱण्यात आला. मंदिरात देवी लक्ष्मीमातेची प्राण-प्रतिष्ठा २४ ऑगस्ट २००७ रोजी आली. यावेळीही मोठा उत्सव येथे साजरा करण्यात आला. भारतासह विदेशातूनही या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. (Tamil Nadu)
श्रीपुरम महालक्ष्मी मंदिर हे शंभर एकर एवढ्या प्रशस्त जागेत बांधण्यात आले आहे. एका स्टारच्या आकारात असलेल्या या मंदिराची वास्तुकला दक्षिणेकडील संस्कृतीचे सुंदर प्रतिबिंब दाखवते. मंदिराच्या परिसरात श्रीपुरम आध्यात्मिक उद्यान देखील बांधण्यात आले आहे. या श्रीपुरम महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामावर ३०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील अर्ध मंडप शुद्ध सोन्याने मढवलेले आहेत, मंदिरात देवी श्री लक्ष्मी नारायणी विराजमान आहे. श्रीपुरम महालक्ष्मी मंदिरातील दिवाळी उत्सव हा सर्वात विशेष असतो. दिवाळीच्या सर्व दिवसात या मंदिरात विशेष सजावट आणि पूजा आयोजित केली जाते. मंदिरातील माता लक्ष्मीची मूर्ती सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्यात येते. मातेचे हे भव्य, सोन्याने मढवलेले रूप पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक मंदिरात गर्दी करतात. (Social News)
========
Narak Chaturdashi : मृत्यूनंतर एखादी व्यक्ती नरकात का जाते?
========
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि यज्ञ आयोजित केला जातो. लाखो भाविक या सर्व धार्मिक सोहळ्यात सहभागी होतात. या मंदिराच्या आवारात एक मोठा तलावही आहे. यात देशभरातील सर्व पवित्र नद्यांचे पाणी आहे. या तलावातील पाणी इच्छा पूर्ण करणारे, म्हणून देखील ओळखले जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये या तलावाचीही विशेष सजावट कऱण्यात येते. विशेषतः रात्री या श्रीपुरम महालक्ष्मी मंदिराला आणि तलावाला बघण्य़ासाठी मोठी गर्दी होते. मंदिराची सोन्याची चमक आणि आवारात लावलेल्या हजारो दिव्यांचा प्रकाश यामुळे हा सर्वच परिसर भाविकांना मंत्रमुग्ध करतो. (Tamil Nadu)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics