देशात बहुतांश लहान लहान नद्या वाहत असतात. या नद्यांमुळेच त्याच्या किनाऱ्याला वसलेल्या गावांना पाणी मिळते. नद्यांचे पाणी लोकांना आयुष्य जगण्यासाठी अत्यंत जरुरीचे आहे. मात्र काही जण नद्यांमध्ये आढळणारे मासे पकडून ते विक्री करतात. अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह करतातच. परंतु दुष्काळाच्यावेळी पाण्याअभावी फार हाल होतात हे सुद्धा आपण पाहिले. पण तुम्हाला माहिती आहे का, देशात अशी एक नदी आहे तेथे मासे नव्हे तर त्यामधून सोनं बाहेर काढले जाते. (Golden River)
नदीतून सोनं बाहेर काढले जाते हे एकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. खरंतर ही नदी झारखंड येथे वाहते. या नदीचे नाव स्वर्ण रेखा असे आहे. या नदीच्या किनाऱ्यालगत राहणारी लोक नदीच्या पाण्यातून सोनं बाहेर काढून त्याची विक्री करतात. याच माध्यमातून त्यांना पैसे कमावता येतात.

या नदीत सोनं काढण्यासाठी लोक सकाळीच येतात आणि ते खुप शोधाशोध करुन बाहेर काढले जाते. यामध्ये काही पिढ्यांपासून लोक सोन काढण्याचे काम करत आहेत. ऐवढेच नव्हे तर नदीतून सोनं काढण्यासाठी पुरुष, महिला यांच्याव्यतिरिक्त मुलं सुद्धा कामाला लागलेली असतात.
झारखंड मधील या स्वर्ण रेखा नदीची सुरुवात रांची पासून जवळजवळ १६ किमी दूर झाली आहे. ती पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथून सुद्धा वाहते. स्वर्ण रेखा नदी बंगालच्या खाडीला जाऊन मिळते. तर लोक या नदीच्या किनारी जाऊन रेतीतून सोन बाहेर काढतात. काही लोक तर दीर्घकाळ हेच काम करत आले आहेत. या नदीत सोने कोठून येते याची काहीही माहिती नाही. दरम्यान, वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की नदीमध्ये सोन्याचे कण हे करकरी नदीतून येतात. करकरी नदीत सोन्याचे कण असल्यानेच ते स्वर्ण रेखा नदीत येत असल्याचे मानले जाते. (Golden River)
हे देखील वाचा- भारतातील ‘हे’ आहे गुपित बेट, जो कोणी गेला त्याबद्दल आली आहे अशी बातमी
ऐवढे सगळे झाल्यानंतर सुद्धा कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र काही रिपोर्ट्समध्ये ऐवढे लिहिले गेले आहे की, स्वर्ण रेखा नदी शेकडो गावांतून जाते. झारखंड मधील स्थानिक आदिवासी या नदीत सकाळी जातात. तर तमाड आणि सारंडा सारख्या परिसरात राहणारे आदिवासी सुद्धा सोनं काढण्याचे काम करतात.