भारतातील काही प्रसिद्ध कुस्तीपटू ही गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी जंतर मंतर ते संसदेपर्यंत रॅली काढली गेली होती. याच दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत त्या सर्वांना ताब्यात घेत एफआयआर दाखल केला. अशातच या कुस्तीपटूंनी आपले मेडल्स ही गंगेत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे असे म्हणणे आहे की, हे मेडल्स आम्ही देशासाठी जिंकलो आहोत. पण आमचाच सन्मान होत नाहीयं तर त्यांना ठेवून तरी काय फायदा? परंतु शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी त्या सर्वांना समजून तुम्ही गंगेत मेडल्स विसर्जित करु नका असे सांगितले. त्यानंतर कुस्तीपटूंनी सरकारला बृजभूषण शरण सिंह याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. (Gold medal in river)
खरंतर जेव्हा कुस्तीपटूंनी गंगेत आपले मेडल्स विसर्जन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा बहुतांश लोकांना प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली याची आठवण आली. त्याने अमेरिकेतील साम्राज्यवादी नीति आणि वर्णभेद असमानतेच्या कारणास्तव आपले मेडल नदीत विसर्जन केले होते.
३ वेळा हेवीवेट चॅम्पियनचा पुरस्कार जिंकलेल्या मोहम्मद अलीचा जन्म १७ जानेवारी ९४२ रोजी लुईसविले केन्टकीमध्ये झाला होता. १९६० मध्ये रोम ऑलम्पिंक मध्ये मोहम्मद अलीने गोल्ड मेडल जिंकले होते. त्याचवेळी अमेरिकेत वर्णभेदाचा मुद्दा फार चर्चेत होता. यामधून अली सुद्धा बचावले नाही. त्यांच्यासोबत झालेल्या घटनेने बहुतांशजणांना हादरवुन सोडले होते. त्यावेळी अली यांनी इस्लाम धर्माचा स्विकार केला होता. त्यांना सर्वसामान्यपणे कॅशियस क्ले नावाने ओळखले जायचे.
मेडल जिंकल्यानंतर मोहम्मद अलीला काही देशांच्या नागरिकत्वाची ऑफर मिळाली. त्याने मात्र असे सांगून नकार दिला की, त्यांना संयुक्त राज्य अमेरिकेचा नागरिक असल्याचा गर्व आहे. जेथे त्याने संघर्ष करत मेडल जिंकले होते. पण त्याला हे माहिती नव्हते की, मेडल जिंकल्यानंतर त्याला वर्णभेदाचा सामना करावा लागेल.
ही घटना त्यावेळची आहे जेव्हा त्याने मेडल जिंकून पुन्हा देशात परतल्यानंतर फार दिवस झाले नव्हते. तो आपल्या एका मित्रासोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. जेथे त्याच्यावर श्वेत लोकांनी वर्णावरुन विविध कमेंट्स केल्या. वाद ऐवढा वाढला गेला की, मारहाणाची स्थिती उद्भवली होती. या घटनेचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात करताना त्याने असे म्हटले की, नदीचे सौंदर्य पाहत शेक पिण्याचा आनंद घ्यायचा होता. पण ती जागा केवळ श्वेत लोकांसाठी आरक्षित होती.(Gold medal in river)
जेव्हा मोहम्मद अली आपल्या मित्रासोबत तेथे गेला तेव्हा तेथील एकाने त्यांना उठण्यास सांगितले. त्याने आपले त्याला मेडल ही दाखवले. तरीही त्याला तेथे बसण्यास परवानगी दिली नाही. हे सर्व पाहून श्वेत तरुणांनी त्याची मस्करी करत त्याच्यावर विविध कमेंट्स केल्या.
हेही वाचा- WWE मधील असा कुस्तीपटू ज्याने ७३ लीटर बियर प्यायला
या घटनेमुळे अली याला ऐवढे वाईट वाटले होते की, त्याने आपले गोल्ड मेडल ओहियो नदीत फेकले होते. त्याला आपल्या मेडलवर ऐवढे प्रेम होते की, झोपताना सुद्धा ते बाजूला ठेवायचा. पण वर्णभेदाच्या कारणास्तव त्याने इस्लाम धर्म स्विकारलाहोता. मीडिया रिपोर्ट्सनुसार मेडल फेकल्यानंतर वर्षभरातच ऑलम्पिंक सीमितिने त्याला स्मृति चिन्हाच्या आधारावर एक नवे मेडल दिले होते.