लग्नसोहळे असो किंवा अन्य एखादा मोठा पारिवारिक कार्यक्र अथवा खास सण. भारतातील बहुतांश लोक शुभ दिवस, सणावेळी सोन्याचे दागिने जरुर खरेदी करतात. एखाद्याला भेट देणे तर स्वत:साठी सुद्धा दागिने बहुतांश खरेदी करतात. मात्र बहुतांश लोकांना सोनं खरेदी करताना ही चिंता सारखी वाटत असते की, खरेदी करत असलेलं सोनं खरं आहे की खोटं? तसेच सोन्यात भेसळ तर केलेली नाही ना? अशा सर्व चिंता दूर करण्यासाठी सरकारने येत्या १ एप्रिल पासून सोन खरेदी आणि विक्री संदर्भातील नियमात मोठे बदल केले आहेत. (Gold Hallmark)
अशातच ३१ मार्चनंतर केवळ ६ अंकाच्या अल्फान्युमेरिक संख्येसह हॉलमार्क येणारे दागिनेच विक्री केले जाणार आहेत. म्हणजेच ग्राहकांना पूर्ण शाश्वती मिळेल आणि कोणतीही चिंता मनात न ठेवता ते दागिन्यांची खरेदी करतील.
१ एप्रिलपासून संपूर्ण देशात लागू
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सरकारने देशातील २५६ जिल्ह्यात २६ जून २०२१ पासून अनिवार्य हॉलमार्क अंतर्गत कवर केले आहे. त्यानंतर १ जून २०२२ पासून आणि ३२ आणखी जिल्ह्यांना ते अनिवार्य केले. म्हणजेच आता पर्यंत एकूण २८८ जिल्ह्यांना हॉलमार्क अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु आता १ एप्रिल पासून संपूर्ण देशात हॉलमार्क लागू केले जाणार आहे.
आता केवळ ६ अंकी हॉलमार्क येणार कामी
दरम्यान, आता पर्यंत चार अंकांसह सहा अंकांसाठी HUID चा वापर केला जात आहे. म्हणजेच २ वेगळ्या प्रकारच्या हॉलमार्कमुळे लोक गोंधळत होती. त्यामुळेच सरकार हा निर्णय घेत ४ अंकी हॉलमार्क पूर्णपणे बंद करण्याचा विचार केला आहे. तर ६ अंकांचा हॉलमार्कचाच वापर केला जाणार आहे.
हॉलमार्कमुळे कळते सोन्याची शुद्धता
खरंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांकामुळे शुद्धतेची ओळखल होते. हा एक ६ अंकांचाअल्फान्युमेरिक कोड असतो. ज्यामध्ये संख्या आणि अक्षर असतात. जो ज्वेलर्सकडून दिला जातो. या कोडच्या माध्यमातून ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांबद्दल संपूर्ण माहिती मिळणे सोप्पे होते. तसेच फसवणूकीची प्रकरणे ही फार कमी होतात. (Gold Hallmark)
हे देखील वाचा- महामार्ग आणि एक्सप्रेस वे वर १ एप्रिल पासून टोलचे दर वाढण्याची शक्यता
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता पहा
जर तुम्हाला सोन्याची शुद्धता ओळखायची असेल तर त्यासाठी सरकारकडून एक अॅप तयार केले आहे. बीआयएस केअर अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेचा तपास केला जाऊ शकतो. येथे केवळ तुम्हाला सोन्याची शुद्धताच नव्हे तर तपास ही करु शकता. या व्यतिरिक्त तुम्ही तक्रार ही करु शकता.