Home » सोन्याची गुफा, दरवाजा उघडल्यास मालामाल होईल भारत

सोन्याची गुफा, दरवाजा उघडल्यास मालामाल होईल भारत

by Team Gajawaja
0 comment
Gold cave
Share

भारताला एकेकाळी कधी सोन्याची चिमणी म्हणून बोलले जायचे. खरंतर मुघलांच्या शासन काळात त्यांनी ४०० वर्ष राज्य करुन सर्वकाही लुटून नेले. त्यानंतर इंग्रजांची सत्ता आली आणि ती २०० वर्ष टिकून राहिली. त्यांनी सुद्धा भरपूर लुटले. ६०० वर्ष गुलामी आणि संघर्ष झेलल्यानंतर सुद्धा आपला देश आज अमेरिका, ब्रिटेन आणि रशिया सारख्या देशांसोबत पावले टाकत आहे. इंग्रजांनी सुद्धा लुटून नेले तरीही भारत खुप काही गोष्टींमुळे समृद्ध आहे. इंगज्रांना ज्या ज्या ठिकाणी सोन्याच्या खजिन्याबद्दल कळले तेथे तेथे त्या लोकांनी जाऊन लुटले. परंतु तरीही बिहार मधील अशीच गुहा ती त्यांना लुटायची होती पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. ही गुहा म्हणजे नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे आहे.(Gold Cave)

राजगीर मधील या सोन्याच्या गुहेबद्दल आजही काही रहस्ये आहेत. असे म्हटले जाते की. सोन्याच्या गुहेचा दरवाजा उघडल्यास भारत हा मालामाल होऊ शकतो. देशाचे भाग्य बदलेल. त्याबद्दल असे म्हटले जाते की. येथे शेकडो वर्षांपासून सोन्याचा खजिना लपण्यात आला आहे जो आजही लोकांच्या नजरेपासून दूर आहे. येथेच इंग्रजांनी लुट करण्याचा विचार केला होता पण अयशस्वी ठरला.

राजा बिंबिसारचा खजिना
इतिहासकार असे सांगतात की, हर्यक वंशाचे संस्थापक बिंबिसार आणि त्यांच्या पत्नीने येथे सोने लपवले. शांति निकेतनमध्ये प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक डॉ. अनिल कुमार यांनी एका बातचीत मध्ये म्हटले होते की, या मध्ये हर्यक वंशाचा खजिना लपवून ठेवण्यात आला आहे. बिंबिसारच्या पत्नीनेच या सोन्याच्या गुहेची निर्मिती केली होती. देश-जगभरातील पर्यटक जेव्हा राजगीर मध्ये येतात तेव्हा ते या गुहेच्या ठिकाणी सुद्धा नक्की भेट देतात. परंतु यामागील कथा ही एक न उलगडलेले रहस्य आहे.

बिंबिसारला सोने-चांदी आणि आभुषणांची फार आवड होती. सोने आणि सोन्याची आभुषण हो फार जमा करायचा. बिंबिसारची एक राणी त्याची खुप काळजी घ्यायची. पण जेव्हा त्याचा मुलगा अजातशत्रु याने आपल्या वडिलांना बंदी करुन सम्राट झाला तेव्हा बिंबिसारच्या पत्नीने राजगीर मध्ये ही सोन्याची गुहा तयार केली आणि सर्व खजिना त्यामध्ये लपवला.

मोठ्या खडकांनी झाकलेली खोली
सोन्याच्या गुहेत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला १०x५ मीटरची एक खोली दिसते. त्याची उंची जवळजवळ १.५ मीटर आहे. या खजिन्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या सैनिकांसाठी ही खोली तयार करण्यात आली होता. या खोलीच्या दुसऱ्या बाजूला खजिन्याची खोली आहे. जी एक मोठ्या खडकाने झाकलेली आहे. आजवर की कोणीही उघडू शकला नाही. या खडकांवर शंख लिपिमध्ये काहीतरी लिहिले गेले आहे. असे म्हटले जाते की, तो ते वाचण्यास यशस्वी झाला तोच त्याचा दरवाजा खोलू शकतो. राजगीर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये काही गुफा आहेत. त्याबद्दल असे सांगितले जाते, जैन धर्मातील मुनींनी त्या तयार केल्या होत्या. या मधील काही गुफांचा बौद्ध धर्माशी सुद्धा संबंध येतो.

Gold cave
Gold cave

अजातशत्रू सम्राट झाला पण कधीच खजिना हाती लागला नाही
इतिहासकार सांगतात हर्यक वंशाचे संस्थापक आणि मगध सम्राट बिंबिसार याने राजगृहाची निर्मिती केली होती. ज्याला नंतर राजगीर नावाने लोक ओळखू लागले. ईसा पूर्व ५४३ मध्ये बिंबिसार जेव्हा १५ वर्षांचा होता तेव्हा ते राजगादीवर बसून आपली कमान सांभाळायचा. त्यांनी भरपूर सोने लपवण्यासाठी त्यांनी विभरगिरी पर्वताच्या पायथ्याशी दुहेरी गुहा बांधल्या होत्या. सोन भंडार लेणी त्यापैकीच एक.(Gold Cave)

बिंबिसारच्या मुलाने सत्तेसाठी वडिलांना बंदी केलेच. असे ही सांगितले जाते की, त्याने आपल्या वडिलांची हत्या सुद्धा नंतर केली किंवा बिंबिसारने आत्महत्या केली असावी. अजातशत्रु सम्राट तर झालाच पण त्याला गुहेतील गुप्त दरवाज्या पर्यंत कधीच पोहचता आले नाही. यामागील गुपित फक्त बिंबिसार यालाच माहिती होते.

हे देखील वाचा- ५५० वर्षांपूर्वीचा ममी, बसल्या जागीच भिक्षुने त्यागले होते प्राण

इंग्रजांनी सुद्धा बॉम्ब हल्ले केले पण प्रयत्न ठरले विफल
या गुहेतील सोन्याबद्दल इंग्रजांना सुद्धा कळले होते. असे सांगितले जाते की, तोफ गोळ्यांनी इंग्रजांनी ती गुहा उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात त्यांना यश आले नाही. त्या गुहेच्या खडकांवर आजही तोफ गोळ्यांचे निशाण दिसून येतात. इंग्रजांनी या मधील सोने लुटण्यचा खुप प्रयत्न केला. मात्र प्रत्येकवेळी अपयश येत असल्याने ते तेथून निघून गेले.

महाभारताच्या काळासंबंधित सुद्धा एक कथा
या गुहेसंदर्भातील अशी सुद्धा एक कथा आहे जी, महाभारताच्या काळातील आहे. वायु पुराणानुसार असे सांगितले जाते की, हर्यक वंशाच्या शासनकाळापासून २५०० वर्षांपूर्वी मगध येथे वृहदरथ यांचे शासन होते. ते शिवभर्त जरासंध यांचे पिता हते. त्यानंतर जरासंध यांनी गादी सांभाळली आणि चक्रवरी सम्राटाचे स्वप्न घेऊन त्यांनी १०० राज्यांना हरवण्यासाठी ते निघाले. ८० हून अधिक सम्राटांना त्यांनी हरविले आणि त्यांच्या संपत्तीवर आपला अधिकार मिळवला. ही सर्व संपत्ती त्यांनी विभारगिरी पर्वताच्या तलहटी गुफेत लपवली होती.(Gold Cave)

म्हणजेच वायू पुराणानुसार हे सोन्याचे भांडार सुद्धा त्याच गुहेशी संबंधित आहे. वायु पुराणानुसार, जरासंध त्याच्या ध्येयाच्या जवळ होता तेव्हा पांडवांनी त्याला युद्धासाठी आमंत्रित केले. हे युद्ध 13 दिवस चालले. भीमाने भगवान श्रीकृष्णाच्या चतुर युक्तीने जरासंधाचा वध केला. जरासंधाच्या वधाने त्याच्या लुटलेल्या खजिन्याचे रहस्यही गाडले गेले. इंग्रजांच्या राजवटीत या गुहेचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फसला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.