Gold Buying on Dhanteras : दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. या दिवशी घराघरांत नवनवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे, विशेषतः सोने, चांदी आणि धान्य खरेदी केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने घेण्यामागे केवळ परंपरा नाही, तर एक पौराणिक आणि वैज्ञानिक कारण दडलेलं आहे. चला जाणून घेऊया या दिवसाचं धार्मिक महत्त्व आणि सोने खरेदीचा खरा अर्थ.
धनत्रयोदशी म्हणजे काय?
धनत्रयोदशी हा शब्द धन आणि त्रयोदशी या दोन शब्दांनी बनलेला आहे. त्रयोदशी म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातील तेरावा दिवस आणि धन म्हणजे संपत्ती. या दिवशी धन्वंतरि देवता समुद्रमंथनातून प्रकट झाले होते ते वैद्यकशास्त्राचे जनक म्हणून मानले जातात म्हणूनच या दिवशी आरोग्य, आयुष्य आणि संपत्ती मिळावी म्हणून धन्वंतरि देवतांची पूजा केली जाते. धनत्रयोदशी हा दिवस लक्ष्मीपूजन आणि आरोग्य पूजनाचं प्रतीक मानला जातो. या दिवशी नवं सोने किंवा चांदी घेतल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो आणि आयुष्यात समृद्धी येते, असा विश्वास आहे. (Gold Buying on Dhanteras)
सोने खरेदीची परंपरा का शुभ मानली जाते?
पौराणिक कथेनुसार, या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरि आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रकट झाले. धन्वंतरि यांच्या हाती अमृताने भरलेला कलश होता, तर लक्ष्मी देवी ही संपत्ती आणि सौभाग्याची प्रतीक मानली गेली. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करणं म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वागत करणं आणि आपल्या घरात तिचं स्थायिक होणं असा अर्थ घेतला जातो तसेच, आपल्या संस्कृतीत सोने हे शुभ, पवित्र आणि स्थिर संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. सोने घेतल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य वाढतं’

Dhantrayodashi
वैज्ञानिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून
धनत्रयोदशी हा काळ पिकांच्या हंगामानंतरचा असतो. या काळात शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हातात पैसा असतो. त्यामुळे नव्या वस्तूंची खरेदी करून अर्थव्यवस्था चालना देण्याचा हा काळ मानला जातो. म्हणूनच या दिवशी सोने खरेदी करणे केवळ धार्मिकच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे. याशिवाय सोनं हे धातू उर्जेचं प्रतीक आहे सोनं शरीरातील ऊर्जा वाढवतं, मन प्रसन्न ठेवतं आणि आत्मविश्वास वाढवतो, असं आयुर्वेदात सांगितलं जातं. म्हणूनच पूर्वी लोक सोन्याच्या अंगठ्या किंवा चेन घालणं आरोग्यासाठीही उत्तम मानत असत.
=================
हे देखील वाचा :
Samudra Manthan : दिवाळीचा संबंध समुद्रमंथनाशी कसा जोडला गेला आहे? जाणून घ्या पौराणिक रहस्य
Diwali : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला का आहे एवढे महत्व?
=================
धनत्रयोदशीचे इतर धार्मिक महत्त्व
या दिवशी लोक दिवे लावून यमदेवतेची पूजा देखील करतात. कारण या दिवशी दीपदान केल्यास अकाल मृत्यू टळतो, असं मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीचा दिवस आरोग्य, संपत्ती आणि दीर्घायुष्य यांसाठी अत्यंत शुभ असतो सोने खरेदीशिवाय काहीजण तांब्याचे भांडे, धान्य, झाडं, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर नवीन वस्तू घेतात. यामागे मुख्य उद्देश एकच घरात समृद्धी आणि शुभतेचं आगमन व्हावं हा आहे. धनत्रयोदशी हा केवळ खरेदीचा दिवस नाही, तर आरोग्य, धन आणि आनंदाचं प्रतीक आहे. या दिवशी घेतलेलं सोनं हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणूनच प्रत्येक वर्षी लोक या दिवशी थोडंफार सोने, चांदी किंवा नवीन वस्तू घेतात कारण ते केवळ वैभवाचं नव्हे तर सुदैव आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. म्हणून या धनत्रयोदशीला, थोडंसं सोनं घ्या, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सोन्यासारखं मन आणि आरोग्य जपा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
