दुबईत भारताच्या तुलनेत सोनं स्वस्त आहे. यामागील कारण म्हणजे इंपोर्ट ड्युटी. भारतात जेथे सोन्याची आयात केल्यानंतर तुम्हाला शुल्क द्यावा लागतो. तर दुबईत सोन्यावर कोणताही आयात शुक्ल आकारला जात नाही. १९ सप्टेंबर २०२२ मध्ये दुबई २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचे दर ४२५२ रुपये होता. तर भारतातील मुंबईत १ ग्रॅम सोन्यासाठी ४६५६ रुपये दर होता. अशा प्रकारे १० ग्रॅम सोनं जर दुबईतून खरेदी केल्यास तर त्याला भारताच्या तुलनेत जवळजवळ ४ हजार रुपये कमी द्यावे लागतील.(Gold buying from Dubai)
मनीकंट्रोलच्या एका रिपोर्ट्सनुसार, रेटमध्ये फरक असल्याच्या कारणास्तव बहुतांश लोक दुबईत राहणाऱ्या किंवा आपल्या ओळखीच्या लोकांना दुबईतून सोन्याचे दागिने आणण्यास सांगतात. मात्र तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की, दुबईतून सोनं मागवलात तर तुमचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. दुबईत मेकिंग चार्ज अधिक असतो, कस्टम ड्युटी लागते आणि दोन्ही देशांच्या चलनात असणारा फरक अशा काही कारणामुळ दुबईहून खरेदी केलेले सोने तुमच्या खिशावर अधिक भार टाकू शकतात.
दुबईत दागिन्यांच्या मागणीत वाढ
दुबईत राहणाऱ्या एनआरआय अकील कुरियन यांनी असे म्हटले की, सणाच्या काळात मोठ्या संख्येने दुबईत राहणारी लोक भारतात जातात. त्यांना नातेवाईक सांगतात की, तेथून सोनं घेऊन या. दुबईत भारतीय दागिन्यांची उत्तम मागणी आहे. याच कारणास्तव भारतातील सर्व प्रमुख ज्वेलर्स ब्रँन्ड्सचे दुबईत ही दुकान आहे. दुबईतील मीना बाजार, गोल्ड सूक आणि बनिया स्ट्रिट मध्ये दागिन्यांची खुप दुकाने आहेत. दुबईतील मीना बाजारातील एका सेल्समनने असे सांगितले की, भारतीय पासपोर्ट धारकांद्वारे येथे ज्वेलरी खरेदीत गेल्या तिमाहीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अधिक पैसे मोजावे लागतात
दुबईतील ज्वेलर्सचे स्टोर चालवणारे पोपली ग्रुप ऑफ ज्वेलर्सचे डायरेक्टर राजीव पोपली यांनी असे म्हटले की, भारतात दागिने बनवण्यासाठी जो चार्ज लावला जातो तो ७ टक्के आहे. मात्र दुबईत तोच चार्ज २५ टक्के आहे. या व्यतिरिक्त दुबईतील चलन दिरहमची किंमत सुद्धा भारतीय रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भारतीयांना दुबईत सोने खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. पोपली यांनी पुढे असे ही सांगितले की, अधिक मेकिंग चार्ज, करेंसी कन्वर्जन फी आणि अन्य काही शुल्क यांच्या कारणामुळे दुबईत भारतीय जर दागिने खरेदी करत असतील तर त्यांना कोणताच फायदा होत नाही. भले ही भारताच्या तुलनेच दुबईतील सोन्याच्या किंमती कमी असतात.(Gold buying from Dubai)
हे देखील वाचा- कोणत्या शहरात राहतात जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती?
हे आहे संपूर्ण गणित
भारतात २२ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्याची किंमत ४६५६ रुपये आहे. तर दुबईत हेच ४२५० रुपये १९ सप्टेंबरला होता. त्या हिशोबाने २० ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची किंमत भारतात ९३,१९० रुपये असेल. दुबईत ८५,०४० रुपये द्यावे लागतील. भारतात त्यावर ३ टक्के जीएसटी लावला जातो आणि त्यानंतरची एकूण किंमत ९५,९१४ रुपये होते. मात्र दुबईत वेट रिफंड झाल्यानंतर ही अतिरिक्त पैसे लागत नाहीत.