सध्याच्या बदलत्या काळात वेगाने टेक्नॉलीजत नवेनवे बदल होत आहेत. ज्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर ही पडतो. जेव्हापासून डिजिटल पेमेंट नेटवर्कने शहरापासून ते गावात ही एन्ट्री केली तेव्हा एटीएमचा अधिकाधिक वापर केला जाऊ लागला. याच्या माध्यमातून आता बँकेत पैसे काढण्यासाठी रांग लावाली लागत नाही. पण आता एटीएमच्या माध्यमातून पैशांऐवजी सोनं काढता येणार आहे. याची सुरुवात हैदराबाद मधील एका कंपनीने सुरुवात केली आहे. तर जाणून घेऊयात या गोल्ड एटीएमसह ते कसे काम करते याबद्दल अधिक.(Gold ATM)
गोल्ड एटीएम कसे करते काम?
हैदराबाद मधील एक स्टार्टअप गोल्डसिक्का यांनी हे गोल्ड एटीएम लावले आहे. कंपनीने माहिती दिली की, यामध्ये कोणताही ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएमच्या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही वेळी गोल्ड कॉइन काढू शकतो. या एटीएममध्ये डेबिट, क्रेडिट, प्रीपेड आणि पोस्टपेट स्मार्ट कार्डचा स्विकार केला जाऊ शकतो.

गोल्डसिक्काचे पहिले एटीएम अशोका रघुपति चॅम्बर्स, बेगमपेट, हैदराबाद स्थित कंपनीच्या मुख्यालयात लावले आहे. कंपनीने असे सांगितले की, ते लवकरच अशा प्रकारचे एटीएम हे विमानतळावर ही लावले जातील.
किती सोन काढू शकतो?
गोल्डसिक्काच्या माध्यमातून सोनं काढण्याबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीच्या नुसार, तुम्ही एटीएम मध्ये ०.५ ते १०० ग्रॅम पर्यंतचे गोल्ड कॉइन असतील. हे सर्व कॉइन २४ कॅरेटचे असणार आहेत. एक एटीएममध्ये एकदा ५ किलो गोल्ड असतील ज्याची किंमत २-३ कोटी रुपयांदरम्यान असतील. खरंतर कस्टमर एकावेळेस एटीएम मधून किती सोनं काढू शकतो हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
हे देखील वाचा- तुमच्याकडे ITR ची कागदपत्र नसतील तरीही घेता येईल बँकेकडून कर्ज
सोन्याची किंमत
सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास ती लाइव्ह बाजाराच्या भावावर निर्भर असणार आहे. कस्टमर जेव्हा कधी एटीएमच्या माध्यमातून सोन काढण्याचा ऑप्शन निवडेल तेव्हा स्क्रिनवर टॅक्ससह निवडले गेलेले कॉइन्सची किंमत दिसेल. ज्यामुळे या गोल्ड कॉइनच्या किंमतीबद्दल अंदाज लावला जाईल. (Gold ATM)
एटीएमच्या माध्यमातून गोल्ड कॉइन न निघाल्यास हे करा
असे समजा तुम्ही एटीएमच्या माध्यमातून गोल्ड कॉइन काढण्याचा ऑप्शन निवडला आणि त्या दरम्यान तुमच्या अकाउंट मधून पैसे कापले गेले पण गोल्ड कॉइन आला नाही तर २४ तासात तुमच्या खात्यात पैसे येतील. त्याचसोबत कस्टमरला एखाद्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर कंपनीच्या हेल्पलाइनच्या क्रमांकावर फोन करुन मदत मागू शकता.