Home » गोकर्ण मधील धार्मिक महत्व असलेली ‘ही’ प्राचीन मंदिर

गोकर्ण मधील धार्मिक महत्व असलेली ‘ही’ प्राचीन मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Gokarna Temple
Share

कर्नाटकातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकर्णला निळाशार समुद्रतट तर लाभला आहेच. पण येथे असलेल्या प्राचीन मंदिरांना सुद्धा धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. याची प्रतिष्ठा येथील मंदिरांमुळेच वाढली आहे. लोककथांमधून कळते की, गोकर्ण भगवान शंकर आणि विष्णु यांचे शहर आहे. रावणाने आत्मलिंगम घेऊ नये आणि लंकेला शक्तिशाली होण्यापासून अडवण्यासाठी त्याला गोकर्णमध्ये फसवले गेले. तर जाणून घेऊयात गोकर्ण मधील धार्मिक महत्व असलेली अशी कोणती प्राचीन मंदिरे आहेत त्याबद्दल अधिक. (Gokarna Temple)

-महाबळेश्वर मंदिर
महाबळेश्वर मंदिरात ६ फूट लांब एक शिवलिंग आहे. त्याला आत्मलिंग रुपाने ओळखले जाते. या मंदिरात सफेद ग्रेनाइटचा उपयोग केला असून ते द्रविड वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यामध्ये १५ हजार वर्ष जुनी शंकराची मूर्ती स्थापन केली आहे. मंदिराचा उल्लेख महाभारत आणि रामायणतील हिंदू पौराणिक कथांमध्ये करण्यात आले आहे. तसेच याला काशी ऐवढेच महत्वपूर्ण मानले जाते. मंदिराची अशी परंपरा आहे की, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला कारवार समुद्रात डुबकी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर मंदिरासमोरच असलेल्या महागणपती मंदिरात दर्शन करुन महाबळेश्वर मंदिरात दर्शन करण्यासाठी जावे लागणार आहे. येथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची जिन्स, ट्राउजर किंवा शॉट्स घालण्याची परवानगी नाही. मंदिर पहाटे ६ वाजता उघडते ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असते.

-महागणपती मंदिर
हे मंदिर महाबळेश्वर मंदिराजवळच आहे. त्यामुळे गोकर्णला भेट देणाऱा प्रत्येक यात्रेकरु येथे भेट देतोच. भगवान शंकरच्या आशीर्वादाच्या कथेनुसार, महाबळेश्वराच्या मंदिरात जाण्यापूर्वी भगवान गणेशाच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यावा. मंदिराची वेळ ही सकाळी ६ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत आहे.

Gokarna Temple
Gokarna Temple

-भद्रकाली मंदिर
असे मानले जाते की, देवतानी, ब्रम्हा, विष्णू आणि शंकराच्या पवित्र त्रिमूर्तीने तिन्ही लोकांवर विजय मिळवणाऱ्या सर्वशक्तिमान राक्षस वेत्रासुरला हरवण्यासाठी दुर्ग नावाच्या एका महिला योद्ध्याची निर्मिती केली. गोकर्ण शहराचे संरक्षण करण्यासाठी तिला विविध देवतांनी उपहार देत आशीर्वाद आणि शक्तींसह भद्रकाली असे तिला नाव दिले गेले. हे मंदिर श्री शंकर नारायण मंदिरापासून काही अंतरावर आहे. येथे दररोज यात्रेकरुंची मोठी गर्दी दर्शनासाठी होते.. पहाटे ५ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेदरम्यान या मंदिरात दर्शन घेता येते.

-महालसा मंदिर
हे मंदिर १५० वर्षांपूर्वी श्री सिद्धिविनायकाच्या मुर्तीसह उभारण्यात आले होते. या मंदिराला श्री महालसा सिद्धिविनायक मंदिर म्हणून ही ओखळले जाते. महालसा मंदिर हे मुख्य बस स्थानकापासून १० किमी दूर आहे. गोकर्ण मधील हे अत्यंत सुंदर मंदिर असल्याने तुम्ही येथे नक्की भेट द्या. येथे विविध सण ही साजरे केले जातात आणि त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. येथे येण्याची सर्वाधिक वेळ म्हणजे गणेश चतुर्थी आणि श्रावण संकष्टी. या मंदिरात तुम्हाल पहाटे ६ ते रात्री ९ वाजल्यादरम्यान दर्शन घेता येईल.(Gokarna Temple)

हे देखील वाचा- ऐतिहासिक वारसा लाभलेला रायरीचा “वाघ दरवाजा”

-श्री सोमेश्वर मंदिर
चालुक्य राजांद्वारे विस्तारित असे आणखी एक गोकर्णतील हे शंकराचे मंदिर १४ व्या शतकात उभारण्यात आले. हे मंदिर बैंगलोर मधील सोमेश्वर मंदिरासारखेच आहे. एक विशाल बांधकाम आणि स्तंभ असण्यासह याच्या आतमध्ये गर्भागृह आणि कल्याण मंडप ही आहे. तसेच येथे हत्ती, शहराचा नकाशा सुद्धा कोरला गेला आहे. पहाटे ६ वाजल्यापासून ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत या ठिकाणी दर्शन घेता येते.

Gokarna Temple
Gokarna Temple

-श्री उमा महेश्वर मंदिर
श्री उमा महेश्वर मंदिर हे शतश्रृंगी पर्वताच्या टोकावर आहे. दोन्हीकडून गोकर्णमधील कुडले समुद्राचा तट आणि ओम समुद्र दिसतो. गोकर्ण मधील हे लोकप्रिय आकर्षण आहे. येथे भगवान शंकर आणि त्यांची पत्नी देवी पार्वती हिला समर्पित असलेले हे मंदिर आहे. मंदिरात पोहचण्यासाठी तुम्हाला तरीका डोंगराच्या टोकावर १५ मिनिटे पायी चालत जावे लागणार आहे.

-मल्लिकार्जुन मंदिर
गोकर्णमध्ये वेंकटरमण मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. अलंकृत स्तंभ यात्रेकरुंना या पवित्र गर्भगृहात घेऊन जातात. येथे कोणीही भगवान विष्णूची पूजा करु शकतो. मात्र मूळ रहिवाशांना मंदिरात प्रवेश नाही. परंतु मंदिराच्या बाहेरुन होणारे समारंभ पाहता येतात. हे मंदिर गोकर्णमधील सर्वाधिक भव्य मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात दर्शन घ्यायचे झाल्यास सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जाता येते.

तसेच गोकर्णला लाभलेले समुद्र आणि तेथे येणाऱ्या पर्यटकांमुळे ते नेहमीच गजबजलेले असते. या व्यतिरिक्त गोकर्ण मध्ये परदेशी पर्यटक ही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ट्रेकिंग आवडत असलेल्या लोकांसाठी गोकर्ण तर उत्तम पर्याय आहे. कारण तुम्हाला कुडले ते हाफ मून बीच पर्यंतचा जंगलातून ट्रेक करावा लागतो. या व्यतिरिक्त विभूती वॉटरफॉल, मुरडेश्वर या ठिकाणी सुद्धा तुम्ही नक्की भेट देऊ शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.