Home » मालदीवला जाण्यापेक्षा लक्षद्विपला जाणे अधिक सुकर

मालदीवला जाण्यापेक्षा लक्षद्विपला जाणे अधिक सुकर

by Team Gajawaja
0 comment
Maldives
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 आणि 3 जानेवारीला लक्षद्वीपच्या दौ-यावर होते.  या दौ-यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्विपच्या समुद्रकिनाऱ्यावर अप्रतिम असे फोटोशूट केले.  शिवाय लक्षद्विपचे समुद्र किनारे म्हणजे शांतता आणि सौदर्याचे धनी असल्याचे ट्विट केले.  पंतप्रधानांची ही छायाचित्र सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाली.  लक्षद्वीपला पर्यटनासाठी सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली आहे.  पंतप्रधानांच्या एका दौ-यानं ही माहिती समोर आली.  त्यासोबत जे भारतीय पर्यटनासाठी मालदीवला (Maldives) पसंती देतात, त्यांना लक्षद्विपच्या समुद्रकिना-यांची ओळख झाली. 

मात्र यासर्वांबरोबरच गेल्या काही महिन्यापासून चीनबरोबर जवळीक साधून भारताला दूर करणा-या मालदीवला (Maldives) पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष समज दिली.  पंतप्रधानांच्या या लक्षद्विप दौ-यामुळे मालदीवमध्ये अपेक्षेप्रमाणे परिणाम झाला.  मालदीवच्या सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवच्या मंत्री मरियम शिउना आणि नेते जाहिद रमीझ यांनी भारतीयांची खिल्ली उडवली.  लक्षद्वीपमध्ये मालदीवएवढ्या सुविधा भारत कधीही देऊ शकत नाही, अशी शेखीही मिरवून झाली.  या सर्वांचा परिणाम म्हणजे, सध्या चालू असलेला #BoycottMaldives हा सोशल मीडियावरील ट्रेंड.  या ट्रेंडमुळे संपूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असणा-या मालदीवला (Maldives) जबरदस्त चपराक बसली आहे.  मालदीवला जे पर्यटक जातात, त्यापैकी जवळपास 80 टक्के पर्यटक भारतातील आहे.  मात्र आता मालदीव सरकारची भारत विरोधी भूमिका, आणि टिपण्णीमुळे भारतातील हजारो पर्यटकांनी मालदीवचे बुकींग रद्द केले.  या सर्व प्रकारामुळे मालदीव सरकारनं एक पाऊल मागे टाकत आपल्याच मंत्र्याच्या विधानावर, हे मत त्या मंत्र्याचे वैयक्तीत असून सरकारचे नाही, असे स्पष्टीकरण दिले.  एकूण पंतप्रधान मोदी यांच्या दौ-यामुळे मालदिवचे (Maldives) नवनियुक्त सरकार मात्र ठिकाणावर आल्याचे म्हटले पाहिजे.  

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीपचा दौरा लक्षणीय ठरला आहे.  कारण या भेटीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्विपमधील पर्यटन वाढीसाठी भरीव योजना जाहीर केल्या.  सोबत त्यांच्या फोटोमुळे लक्षद्विपला जाणा-या पर्यटकांची संख्या वाढत आहे.  या सर्वात महत्त्वाचे म्हणजे, समुद्रकिना-यासाठी ओळखल्या जाणा-या मालदीवला (Maldives) जाण्यापेक्षा आपल्याच देशाचा अविभाज्य भाग असलेल्या लक्षद्विपला जाणे अधिक सुकर असल्याची माहिती पर्यटकांना मिळाली आहे. 

या सर्वांमुळे पर्यटनावर अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या मालदीवला जबरदस्त फटका बसला आहे.  मालदीवमध्ये डॉ. मोहम्मद मुइज्जू यांचे सरकार आल्यापासून त्यांनी भारतविरोधी भूमिका जाहीर केली आहे.  भारतातील सैनिकही मालदीवमध्ये होते.  डॉ. मुइज्जू यांनी त्यांची पाठवणी केली.  तसेच उघडपणे चीनला पाठिंबा व्यक्त करत भारतविरोधी वक्तव्ये केली.  या सर्वांवर भारत शांत होता.  मात्र पंतप्रधानांनी लक्षद्विप दौरा करुन मालदीवला आपली जागा दाखवून दिली आहे.  मालदीवमध्ये जे पर्यटक जातात, ते बहुतांशी भारतीय आहेत. 

भारतावर अर्थव्यवस्था अवलूंन असणा-या या देशानं भारतालाच विरोध करत चीनशी मैत्री केली.  मात्र आता भारतानं घेतलेल्या भूमिकेमुळे या मालदीवला (Maldives) डोक्याला हात मारण्याची वेळ आली आहे.  त्यातच मालदीव सरकारची मंत्री असलेल्या  मरियम शिउना यांनी सोशल मीडियावर भारताचे  पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरले.  मालदीवसोबत कोणीही स्पर्धा करु शकत नाही.  पर्यटकांना जेवढ्या सुविधा मालदीव देत आहे, तेवढ्या भारत देऊ शकत नाही.  असे ट्विट केल्यावर या वक्तव्याचा भारतातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 

तसेच बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड ही सुरु झाला.  या सर्वांमुळे मालदीवला जाणा-या पर्यटकांनी आपली बुकींग रद्द करण्याचा सपाटा लावला आहे.  अर्थातच मालदीवला भारताच्या मैत्रीची उशीरा का होईना जाणीव झाली, आणि त्यांनी शियना यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले आहे. तसेच अशी अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास शासनाचे संबंधित अधिकारी मागेपुढे पाहणार नाहीत, असेही जाहीर केले.

============

हे देखील वाचा : न्युझीलॅंडच्या तरुण खासदाराने भर संसदेत केलेल्या ‘हाका डान्स’ बद्दल तुम्हाला माहितेय का?

============

मात्र भारतातील अनेक पर्यटकांनी मालदीवला (Maldives) जाणारी तिकीटे रद्द केली असून त्याची छायाचित्रे सोशल मिडियावर शेअर केली आहेत.  याशिवाय क्रिकेटर आकाश चोप्रा, अभिनेता सलमान खान, अभिनेता अक्षय कुमार यांनीही या बॉयकॉट मालदीव ट्रेंडला पाठिंबा दिला आहे. याबरोबर अनेक युट्यूबरनीही मालदीवला लक्ष करीत भारतीय पर्यटकांनी या देशासाठी किती आर्थिक फायदा करुन दिला आहे, याची जाण करुन दिली आहे.  

एकूण काय जो देश चीनच्या सोबत गेला तो डुबला अशी सध्या परिस्थिती आहे.  श्रीलंका, पाकिस्तान या आपल्या शेजा-यांना आर्थिक तोट्यात लोटून आता चीन मालदीवच्या मागे लागला.  तेथील नवीन सरकारही चीनला दोस्त मानू लागले आणि भारताला विऱोध करत घेतलेल्या भूमिकेमुळे तोंडघाशी पडले.  

सई बने.  

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.