Home » Uttar Pradesh : महाकुंभमधून देवी लक्ष्मीचे वरदान मिळणार

Uttar Pradesh : महाकुंभमधून देवी लक्ष्मीचे वरदान मिळणार

by Team Gajawaja
0 comment
Uttar Pradesh
Share

उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 चे शानदार स्वरुप बघून अवघ्या जगाल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुंभनगर जिल्हा सहा हजार हेक्टरमध्ये बसवण्यात आला असून महाकुंभ 4000 हेक्टर क्षेत्रात होत आहे. या महाकुंभसाठी येणा-या भाविकांना 1900 एवढे हेक्टर क्षेत्र फक्त पार्किंगसाठी देण्यात आले आहे. या महाकुंभमध्ये भाविकांसाठी अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या महाकुंभसाठी 40 करोड भाविक येणार आहेत. या भाविकांना मोफत प्रसाद व्यवस्था देण्यासाठी येथे आलेल्या आखाड्यांमध्ये भव्य असे प्रसादगृह उभारण्यात आले आहेत. एकूण प्रयागराज महाकुंभ म्हणजे, अद्भूत, अद्वितीय असणार आहे. या सर्व सुविधांसाठी उत्तरप्रदेश सरकारनं आपली तिजोरी खाली केली असा आरोप होत असला तरी या महाकुंभमधून उत्तरप्रदेश सरकारला मिळणा-या महसूलाचे आकडे ऐकले तरी डोळे पांढरे होणार आहेत. हा महाकुंभ योगी सरकाराल देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादासारखा ठरणार आहे. कारण या महाकुंभमधून 2 ट्रिलियन रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. (Uttar Pradesh)

प्रयागराज महाकुंभ 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. 13 जानेवारी रोजी भल्या पहाटे मंत्रघोषात आखाड्यांचे शाही स्नान होणार आहे. यापासून या धार्मिक पर्वाची सुरुवात होईल. पुढचे 45 दिवस ही कुंभनगरी अशाच साधू, संतांनी गजबजलेली रहाणार आहे. येथे दिवसाला लाखो होम हवन होतील. तसेच कल्पव्रतासारखे कठिण व्रत करणारे लाखो भक्त या नगरीमध्ये दाखल होतील. याशिवाय भारतातील मान्यवर कथावाचक या कुंभनगरीमध्ये आले असून त्यांच्या कथा प्रवचनाला लाखो भक्तांचा जनसमुदाय उपस्थित रहाणार आहे. या सर्व भक्तांच्या सुख सुविधांसाठी उत्तरप्रदेश सरकारनं व्यवस्था केली आहे. शिवाय या सर्व भक्तांची आणि साधूंच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात ठेवण्यात आले आहे. (Social News)

या महाकुंभमेळ्यात करोडो भाविक येणार आहेत. त्यातील अनेक व्हीआयपी असणार आहेत. अनेक देशांचे राजदूत या महाकुंभमध्ये येत आहेत. या सर्वांच्या सुरक्षेसाठी हायटेक यंत्रणा उभारण्यात आली आहे. या सर्वांवर उत्तरप्रदेश सरकार करोडो रुपये खर्च करीत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या तिजोरीवर त्याचा भार पडत असल्याची ओरड काहींनी केली असली तरी ती चुकीची असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी यांनी दिली आहे. महाकुंभसाठी 40 करोड भाविक येणार आहेत, त्यांच्या माध्यमातून राज्याला 2 ट्रिलियन रुपयांपर्यंत आर्थिक लाभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी यांनी दिली आहे. महाकुंभसाठी येणारे भाविक फक्त प्रयागराजमध्ये मुक्कामी असतील असे नाही, तर हे भाविक संपूर्ण उत्तरप्रदेशमध्य फिरणार आहेत. त्यात अयोध्या, वाराणसी, मथुरा, वृंदावन यांचा समावेश आहेत. या भागातील हॉटेलही फुल झाल्यामुळे महाकुंभ काळात राज्यातील इतरही देवस्थानांमध्ये मोठी गर्दी असेल हे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. 2024 पर्यंत 16 कोटींहून अधिक भाविकांनी काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी वाराणसीला भेट दिली आहे तर 13.55 कोटींहून अधिक भाविकांनी अयोध्येला भेट दिली आहे. यातून उत्तरप्रदेश सरकारला मोठा आर्थिक हातभार झाला आहे. (Uttar Pradesh)

महाकुंभातूनही सरकारच्या महसूलात मोठी वाढ होणार आहे. महाकुंभमध्ये अनेक स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. प्रयागराजमधील प्रत्येक घरातील एक व्यक्ती या महाकुंभच्या आयोजनात गुंतली आहे. याशिवाय प्रयागराजमधील घरांमध्येही तिर्थकरुंच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. यातून स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. महाकुंभमध्ये मोठ्या प्रमाणात भोजन करण्यात येते. यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात धान्य मागवण्यात आले आहे. तसेच भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. या सर्व कामात येथील स्थानिक महिलांची मदत घेण्यात येत आहे. (Social News)

===============

हे देखील वाचा : Maha Khumbh Mela: महाकुंभमध्ये कल्पवास करणार या अब्जाधीशाची पत्नी !

America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?

===============

महाकुंभमध्ये भाविकांना रहाण्यासाठी 1.6 लाख तंबू उभारण्यात आले आहेत. ही सर्व व्यवस्था ठेवण्यासाठीही स्थानिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कुंभमध्ये डिजिटल व्यवस्थेसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे. त्यांनाही येथे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. याशिवाय संपूर्ण प्रयागराज शहराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. यात हजारो झाडे लावण्यात आली आहे. तसेच या शहराच्या स्वच्छतेसाठी तीन पाळ्यांमध्ये सफाई कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्येही प्रयागराज आणि परिसरातील रहिवाश्यांना संधी देण्यात आली आहे. एकूण महाकुंभ 2025 मधून उत्तरप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाले आहेत. (Uttar Pradesh)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.