आंध्र प्रदेशातील गरीब परिवारात जन्माला आलेले जीएन साईबाबा (GN Saibaba) यांचे माओवाद्यांसोबत संबंध असल्याच्या आरोपाखाली त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मे २०१४ मध्ये त्यांच्यासह अन्य १५ लोकांना अटक करण्यात आली होती. २०१७ मध्ये त्यांना युएपीए म्हणजेच बेकायदेशीर गतविधी अधिनियमाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. त्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. ते नागपूरातील तुरुंगात बंद होते. नुकत्याच बॉम्बे हायकोर्टाच्या नागपुर खंडपीठाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे.
जीएन साईबाबा हे शारिरीक रुपात ९० टक्के अक्षम आहेत. त्यांना लहान वयातच लकवा मारला होता. तेव्हा त्यांचे वय अवघे ५ वर्ष होते. २००३ मध्ये दिल्लीला येण्यापूर्वी त्यांच्याकडे व्हिलचेअर खरेदी करण्याचे सुद्धा पैसे नव्हते. ते सुरुवातीपासूनच आदिवासी आणि त्यांच्यासाठी आवाज उठवायचे. सुरुवाती पासूनच ते अभ्यासात खुप हुशार होते. २०१४ मध्ये अटक होण्यापूर्वी ते दिल्लीतील युनिव्हर्सिटीच्या रामलाल महाविद्यालयात इंग्रजीचे प्रोफेसर होते.
कोचिंग क्लास मध्ये झाले प्रेम
जीएन साईबाबा सुरुवातीपासूनच आदिवासांच्या हितासाठी लढत होते. १९९० पासूनच त्यांनी आरक्षणाची मोहिम सुरु केली होती. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. त्यांची बायकोशी ओळख ही एका कोचिंग क्लासमध्ये झाली होती. दोघांमध्ये प्रेम झाले आणि पुढे जाऊन त्यांनी लग्न केले.
दोन लाख किमीचा प्रवास
जीएन, आदिवासी आणि दलितांसाठी काम करत राहिले. ते अखिल भारतीय पीपुल्स रेजिस्टंस फोरमशी जोडलेले आहेत. एआयपीआरएफच्या एका कार्यकर्त्याच्या आधारावर त्यांनी कश्मीर आणि नॉर्थ-ईस्ट मध्ये मुक्ति आंदोलनाला समर्थन देत दलित-आदिवासी अधिकाऱ्यांसाठी खुप काम केले. या बद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी आणि प्रचारासाठी त्यांनी दोन लाख किमीहून अधिक प्रवास केला.
माओवाद्यांशी संबंध असल्याने अटक
साईबाबा यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याते आरोप लावण्यात आले होते. त्यांच्यावर माओवाद्यांसाठी काम करत असल्याचा सुद्धा आरोप होता. क्रांतिकारी डेमोक्रेटिक फ्रंटशी त्यांचा संबंध जोडला होता. जो माओवाद्यांचा गट असल्याचे सांगण्यात आले होते. जीएनवर याच गटाचे सदस्य असल्याचा आरोप होता. दरम्यान, त्यांनी नेहमीच या गटाशी संबंध असण्यासह माओवाद्यांची साथ दिल्याच्या आरोपांवर नेहमीच फेटाळून लावले. सप्टेंबर २००९ मध्ये काँग्रेसच्या सरकारने माओवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन हंटची सुरुवात केली होती. याच ऑपरेशन अंतर्गत प्रो जीए साईबाबा यांना अटक करण्यात आली होती.
कसाब प्रमाणेच अंड्याच्या सेलमध्ये होते बंद
प्रो जीएन साईबाबा (GN Saibaba) यांना नागपुर सेंट्रल तुरुंगात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. तो देशातील सर्वाधिक खतरनाक तुरुंगांमपैकी एक ओळखला जातो. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाब याला सुद्धा याच अंडा सेलमध्ये कैद करण्यात आले होते. साईबाबा काही महिन्यांपर्यंत तुरुंगात राहिले. १४ महिन्यात ४ वेळा त्यांनी जामिन याचिका दाखल केली होती ती सुद्धा फेटाळून लावण्यात आली होती. जून २०१५ मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन दिला होता. ते आतापर्यंत जामिनावर होते. १४ ऑक्टोंबरला अखेर त्यांना युएपीए प्रकरणातून मुक्त केले आहे.
हे देखील वाचा- न्युयॉर्कमध्ये चाकूहल्ला झालेले सलमान रुश्दी कोण आहेत?
दिल्ली युनिव्हर्सिटीतील नोकरीवरुन टर्मिनेशन
जीएन साईबाबा यांना २००३ मध्ये इंग्रजीच्या प्रोफेसरच्या आधारावर डीयू म्हणून घेतले होते. मात्र जेव्हा २०१४ मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयाखाली त्यांना अटक केली तेव्हा त्यांना युनिव्हर्सिटीने निलंबित केले. त्यानंतर त्यांच्या परिवाराला केवळ अर्धा पगार दिला जात होता. अखेर त्यांना ३१ मार्च २०२१ मध्ये रामलाला कॉलेजच्या प्राध्यापकांनी तत्काळ रुपात त्यांना टर्मिनेट केले.