Home » जी-मेलमध्ये तांत्रिक अडचण

जी-मेलमध्ये तांत्रिक अडचण

by Correspondent
0 comment
Share

गुगलची (Google) ई-मेल सेवा ‘Gmail’ ने गुरुवारी सकाळी अचानक काम करणं बंद केलं, ज्यामुळे यूजर्स फारच त्रस्त झाले होते. यासंदर्भात मोठ्या संख्येने जीमेल यूजर्सने आपली तक्रार गुगलकडे नोंदवली आहे. यूजर्सचं म्हणणं आहे की, ना ते एखादा मेल (Email) पाठवू शकत आहेत किंवा एखाद्या मेलवर फाइल अटॅच करु शकत. काही यूजर्संना तर गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक्स सारख्या सेवांमध्येही अडचणी येत असल्याचं समजतं आहे. ही समस्या केवळ भारतातच नव्हे तर जपान, ऑस्ट्रेलियासह जगातील इतर देशांमध्येही येत असल्याचं समजतं आहे. लोक यूजर्स याबाबत ट्वीटरवरुन सतत तक्रारी करत आहेत.



जीमेल ट्विटर ट्रेंडिंगमध्ये!

Google अॅप्लिकेशन स्टेटस पेजने पुष्टी केली की त्यांना जीमेल आणि गुगल ड्राईव्ह संबंधी तक्रारी आल्या आहेत. यूजर्सने या मुद्दावर बोलण्यासाठी ट्विटर आणि त्यांच्या स्वत:च्या वेबसाइटची मदत घेतली आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, जगातील कोट्यावधी यूजर्संना गुगलच्या सेवा, विशेषत: जीमेलचा वापर करताना अडचण येत आहे. या विषयावर भाष्य करताना गुगलने असं म्हटलं आहे की, ‘आम्ही जीमेलमधील समस्येच्या अहवालाची चौकशी करीत आहोत. आम्ही लवकरच याबाबत अधिक माहिती देऊ.’

यापूर्वीही आली होती अडचण!

ही काही पहिलीच वेळ नाही की, जेव्हा यूजर्सला अशाप्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. याआधी जुलै महिन्यात देखील अनेक यूजर्स लॉग इनच करु शकत नव्हते. पण काही वेळेनंतर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. दरम्यान, आज झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर एका यूजरने म्हटलं की, ‘मला जीमेल सुरु करताना अडचण येत आहे. नेमकं काय चुकीचं घडतं आहे? मी मागील एक तासाभरापासून ई-मेल करु शकलेलो नाही. पण मला हे समजत नाही की, नेमकी अडचण काय आहे? याबाबत मला कुणी काही सांगेल का?


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.