मुलांच्या तुलनेत मुलींची उंची (Girls height) वाढणे लवकर बंद होते. यामागे काही कारणं असू शकतात. मुलींच्या शरिरात होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलावामुळे त्यांची उंची १४-१५ वर्षापर्यंत वाढणे कमी होते. तर नक्की असे का होते आणि कोणत्या कारणांमुळे होते याबद्दल जाणून घेऊयातच. पण खरंच मुलींना मासिक पाळी सुरु झाल्यानंतर खरंच असे होते का हे सुद्धा पाहूयात.
मुलींची उंची वाढणे कधी थांबते?
लहानपणातच मुलींची उंची लवकर वाढते आणि जसे त्या प्युबर्टी (किशोरवय) पोहतात तेव्हा त्यांची उंची अधिक असते. पण १४-१५ व्या वर्षात त्यांना मासिक पाळी येणे सुरु होते आणि त्यानंतर मुलींची उंची वेगाने वाढणे थांबते. गरजेचे नाही की, जर तुमच्या मुलीची किंवा एखाद्या मुलीची उंची ही कमी आहे तर तुम्ही उत्तम बाल रोग तज्ञांना जाऊन भेटावे किंवा त्यांच्या उंची संदर्भात चर्चा करावी.
प्युबर्टीमध्ये उंची वाढण्यावर कसा परिणाम होतो?
मासिक पाळी सुरु झाल्यानंतर एक किंवा दोन वर्षांआधी मुलींच्या उंचीमध्ये अधिक वाढ झालेली दिसते. बहुतांश मुलींना ८-१३ व्या वयातच प्युबर्टी सुरु होते आणि १०-१४ व्या वयादरम्यान त्यांची वेगाने उंची वाढू लागते. पहिल्या मासिक पाळीच्या एक किंवा दोन वर्षानंतर त्यांची उंची केवळ १-२ इंचच वाढते. या दरम्यान त्या आपल्या अडल्ट हाइट पर्यंत पोहचतात. बहुतांश मुली १४-१५ वर्षातच आपल्या अडल्ट हाइट पर्यंत पोहचतात. असे असू शकते की, काही मुली कमी वयातच आपल्या अडल्ट हाइट पर्यंत पोहचतात. पण हे अशा गोष्टीवर निर्भर करते की, तुमच्या मुलीला मासिक पाळी कधी सुरु झाली. जर मुलीला वयाच्या १५ व्या वर्षात मासिक पाळी येणे सुरु झाले नसेल तर डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

स्तनांचा आकार वाढणे आणि प्युबर्टी दरम्यान काय आहे संबंध?
स्तनांचा आकार वाढणे हे काहीवेळेस प्युबर्टीचे संकेत असतात. कोणत्याही मुलीची मासिक पाळी सुरु झाल्यानंतर २ वर्षांआधी स्तनांचा आकार वाढू लागतो. काही मुलींमध्ये मासिक पाळी सुरु झाल्यानंतर स्तनांचा आकार वाढलेला दिसतो. तर काहींमध्ये मासिक पाळी सुरु झाल्यानंतर तीन-चार वर्ष तरी स्तनांचा विकास सुरु होत नाही.
हे देखील वाचा- मासिक पाळी आल्यानंतर व्यायाम करावा का?
उंची वाढण्यात जेनेटिक्सची काय भुमिका असते?
मुलांची उंची ही खासकरुन आई-वडिलांच्या उंचीवर अवलंबून असते. बहुतांश वेळा असे पाहिले जाते की, आई-वडिलांची उंची अधिक असेल तर मुलं सुद्धा त्याच उंचीत थोड्याफार प्रमाणात वाढते. पण जेव्हा तुम्ही उंची कमी असल्याच्या कारणामुळे डॉक्टरांकडे जाते तेव्हा प्रथम डॉक्टर सुद्धा पालकांना त्यांच्या उंचीबद्दल विचारतात.(Girls height)
कोणत्या कारणांमुळे उंची वाढण्यास होतो उशिर?
कुपोषण ते अशी काही औषध आहेत ज्यांचा परिणाम उंची वाढण्यावर होतो. काही मुलींना विविध प्रकारचे आजार असतात. जसे की, ग्रोथ हार्मोनमध्ये समस्या, गाठी किंवा कॅन्सरच्या कारणामुळे उंची वाढण्यास उशिर होऊ शकतो. उंची उशिरा वाढण्यामध्ये जीन्सची सुद्धा फार महत्वाची भुमिका असते.