फॅशन विश्वात रेड कार्पेट संस्कृती रुजवणारे, इटलीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर ज्योर्जियो अरमानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. डॉक्टर असलेले ज्योर्जियो सैन्यात गेले. तिथे सैन्य अधिकारी त्यांच्या कपड्यांच्या फॅशनचे कौतुक करत असत, त्यातूनच प्रेरणा घेऊन ज्योर्जियो फॅशन विश्वास आले. तेव्हा पॅरीस ही फॅशनची पंढरी म्हणून ओळखली जात होती. मात्र ज्यॉर्जियो अरमानी यांनी अशी काही जादू केली की मिलान शहराला हा मान मिळाला. अगदी साधारण भांडवलापासून सुरु केलेला व्यवसाय अरमानी या प्रख्यात ब्रँडसह विस्तारीत गेला. फॅशनला अब्जावधी डॉलर्सच्या व्यवसायात रूपांतरित करणा-या ज्योर्जियो अरमानी यांचे सगळे जीवन अनोखेच होते. (Giorgio Armani)
10 अब्ज डॉलर्सचे फॅशन साम्राज्य मागे सोडून गेलेल्या ज्योर्जियो यांनी या फॅशन दुनियेत येण्यासाठी सुरुवातीला डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये नोकरी केली. आता त्यांचा अरमानी ब्रँड हा जगभरातील फॅशन क्षेत्रात सर्वात मानाचा समजला जातो. रेडी टू वेअर ही संकल्पना पहिल्यांदा रुजू करणा-या ज्योर्जियो अरमानी यांचा फॅशन इंडस्ट्रीत कोहीनूर हिरा म्हणून गौरव होत असे. त्यांच्या निधनानं या विश्वाला जबर धक्का बसला आहे. इटलीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर ज्योर्जियो अरमानी यांचे निधन झाल्यामुळे फॅशन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अरमानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत फॅशनला एका नवीन उंचीवर नेले. पुरुष आणि महिलांच्या कपड्यांच्या डिझाइनमध्ये क्रांती घडवून आणली. त्यांच्या ‘अरमानी सूट’ आणि ‘पॉवर सूट’ ने फॅशन जगात एक वेगळी छाप सोडली आहे. (Latest Internatonal News)
फॅशनमध्ये रेड कार्पेट ही संकल्पना ज्योर्जियो यांच्यामुळेच आली. कॉर्पोरेट बोर्डरूमपासून ते रेड कार्पेटपर्यंत, अरमानी यांनी जागतिक स्तरावर आपली छाप सोडली. शॉन पेन, अँनी हॅथवे, जॉर्ज क्लूनी, सोफिया लॉरेन, ब्रॅड पिट आणि व्हिक्टोरिया बेकहॅम सारख्या हॉलिवूड कलाकारांना त्यांनी ओळख मिळवून दिली. 11 जुलै 1934 रोजी दक्षिण मिलानमधील पिआसेंझा या छोट्या शहरात जन्मलेल्या ज्योर्जियो अरमानी यांनी सुरुवातीला डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. मात्र डॉक्टर झाल्यावर ते त्याकाळची परिस्थिती पाहून सैन्यात भरती झाले. तिथे त्यांच्या कपड्यांवर वरिष्ठ अधिकारी कायम खुश असायचे. ज्योर्जियो तू कपडे तयार कर, त्यात तू 100 टक्के फिट आहेस, असे कायम शेरे त्यांना सैन्य अधिका-यांकडून मिळायचे. (Giorgio Armani)
त्यामुळे ज्योर्जियो यांनी सैन्यातील नोकरीला रामराम ठोकून चक्क मिलानमधील रिनासेंटे डिपार्टमेंट स्टोअरमध्ये विंडो डेकोरेटर म्हणून अर्धवेळ नोकरी केली. उरलेल्या वेळात फॅशन संदर्भात अभ्यास सुरु केला. एकीकडे प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि फॅन जगतातील अभ्यास यामुळे ज्योर्जियो यांनी लवकरच आपला व्यवसाय चालू केला. 1975 मध्ये, ज्योर्जियो अरमानी आणि त्यांचे साथीदार सर्जियो गॅलिओटी यांनी त्यांची फोक्सवॅगन गाडी विकून 10000 डॉलर्स उभारले. त्यातून त्यांनी त्यांचा स्वतःचा रेडी-टू-वेअर मेन्सवेअर ब्रँड तयार केला. त्यानंतर वर्षानंतर त्याच ब्रँडखाली महिलांचे देखिल कपडे ज्योर्जियो तयार करु लागले. तेव्हा रेडी टू वेअर ही संकल्पनाच नव्हती. त्यामुळे ज्योर्जियो यांच्या या कपड्यांनी फॅशन जगतात क्रांती केली. (Latest Internatonal News)
ज्योर्जियो यांनी लिनलेस स्पोर्ट्स जॅकेटने सुरुवात केली. ज्योर्जियो यांनी कपड्यांच्या विश्वात नवे प्रयोग करायला सुरुवात केली. जॅकेटमध्ये नवे प्रकार तयार केले. लवकरच हॉलिवूड ते वॉल स्ट्रीटपर्यंत ज्योर्जियो अरमानी हे नाव प्रसिद्ध झाले. हॉलिवडू स्टार रिचर्ड गेरेने एका चित्रपटात ज्योर्जियो यांनी डिझाईन केलेला सूट घातला होता. यानंतर, ते इतके लोकप्रिय झाले की अरमानीला किंग जॉर्जियो असेही म्हटले जाऊ लागले. 1980 च्या दशकात त्यांनी डिझाइन केलेले महिलांसाठीचे पॅन्टसूटने एक्झिक्युटिव्ह वर्कवेअरची व्याख्या बदलली. सॉफ्ट टेलरिंग आणि म्यूट टोनद्वारे फॅशनच्या क्षेत्रात ज्योर्जियो यांनी आणली. त्यांनी मुलांना मुलींचे कपडे घालायला आणि मुलींना मुलांचे कपडे घालायला लावून फॅशन सेन्सचा चेहरा बदलला. याशिवाय, त्यांनी कपड्यांमध्ये न्यूट्रल रंग वापरले. 1970 आणि 1980 च्या दशकात, चमकदार रंग खूप पसंत केले जात होते. त्याऐवजी, अरमानीने राखाडी, बेज आणि पांढऱ्या रंगांवर लक्ष केंद्रित करून सूट डिझाइन केले. यामुळे न्यूट्रल टोन फॅशनमध्ये मुख्य प्रवाहात आले. (Giorgio Armani)
=======
America : पीटर नवारो…भारताचा खलनायक !
=======
साध्या जॅकेट किंवा ब्लेझरसह कॅज्युअल लूक कसा कॅरी करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. या पद्धतीमुळे तरुण पिढी त्यांच्या फॅशनकडे अधिक आकर्षित झाली. आज अरमानी ब्रँडचे केवळ स्टायलिश पोशाखच नाही तर परफ्यूम, घड्याळे, चष्मा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि गृहसजावट या क्षेत्रावरही वर्चस्व आहे. अरमानीचा वार्षिक व्यवसाय 2 अब्ज डॉलर्सचा आहे. अरमानीचे साम्राज्य जगातील 46 देशांमध्ये आहे. 600 हून अधिक स्टोअर्स, सात औद्योगिक केंद्र, 9000 हून अधिक महिला कर्मचा-यांची टीम या अरमानी ब्रँडमध्ये आहे. ज्योर्जियो अरमानी यांना मिलान फॅशन वीकमध्ये त्यांच्या ब्रँडच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त मोठा कार्यक्रम करायचा होता. मात्र त्यांची ही इच्छा अधुरी राहिली. (Latest Internatonal News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics