इटलीची कमान लवकरच एका महिला पंतप्रधानांच्या हाती जाण्याची शक्यता आहे. रविवारी झालेल्या इटलीतील सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान झाले. सुरुवातील एक्झिट पोलचे आकडे असे सांगत होते की, ब्रदर्स ऑफ इटली पार्टीच्या नेतृत्वात गठबंधनाचा विजय होऊ शकतो. मात्र असे झाल्यास इटलीतील जियोर्जिया मेलोनींच्या (Giorgia Meloni) रुपात देशातील पहिल्या महिला पंतप्रधान मिळू शकतात. इटलीच्या निवडणूकीचे निकाल लवकरच जाहीर केले जाऊ शकतात. अशातच जाणून घेऊयात अखेर कोण आहेत जियोर्जिया मेलोनी.
कोण आहेत जियोर्जिया मेलोनी
४५ वर्षीय जियोर्जिया मेलोनी या पत्रकार होत्या. सध्या त्या पॉलिटकल ब्रदर्स ऑफ इटलीच्या प्रमुख आहेत. मेलोनी यांचा जन्म रोम मध्ये झाला होता. सुरुवातीपासूनच त्या राजकरणात सक्रीय होत्या. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. त्यांचा नवरा हा एक पत्रकार आहे. मेलोनी यांच्या नेतृत्वात इटलीमध्ये ब्रदर्श ऑफ इटली पार्टीची लोकप्रियता अधिक वाढली आहे. मेलोनी यांनी या निवडणूकीत ईश्वर, देश आणि परिवाराच्या घोषणा देण्यासह आपल्या पक्षाचा सुद्धा प्रचार केला. रिपोर्ट्सनुसार, जर इटलीत जियोर्जिया मेलोनी यांचे सरकार आल्यास दुसऱ्या महायुद्धानंतर असे पहिल्यांदाच होणार आहे की, जेव्हा अति उजव्या विचारसरणीचे सरकार बनेल.

युरोपीय संघापासून वेगळा होईल इटली
जियोर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) या पंतप्रधान होणार असल्याच्या अंदाजासह ही गोष्ट सुद्धा समोर येत आहे की, आता इटली युरोपीय संघाचा हिस्सा राहणार नाही. असे म्हटले जात आहे, जर जियोर्जिया पंतप्रधान झाल्यास त्या युरोपीय संघापासून वेगळ्या होतील. जियोर्जिया निर्वासितांच्या समस्येबद्दल खुप बोलल्या आहेत आणि याचे कारण युरोपीय संघच असल्याचे मानतात. खासकरुन पुरुष निर्वासितांसंदर्भात त्यांनी बहुतांशवेळा विरोध ही दर्शवला होता.तर जियोर्जिया सत्तेत आल्यानंतर त्यांचा प्रयत्न असा असेल की, इटलीतील जन्मदर वाढवण्यास प्रोत्साहन देणे. या व्यतिरिक्त निर्वासितांना रोखण्यासाठी नौसेनिक नाकाबंदी सुद्धा लागू केली जाऊ शकते. मेलोनी यांना इटलीतील प्रकरणांमध्ये युरोपीय संघाची भुमिका मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे देखील वाचा- चीनमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी कारवाई, माजी मंत्र्यांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा
भारतावर काय होणार परिणाम?
काही मीडिया रिपोर्ट्स आणि तज्ञांच्या प्रतिक्रिया असे सांगत आहेत की, जियोर्जिया इटलीच्या पंतप्रधान झाल्यास त्याचा भारताला सुद्धा फायदा होणार आहे. यामागे कारण असे की, दोन्ही देशांच्या सत्ताधारी पक्षांची एकसारखीच विचारसरणी आहे. भारतात भाजप आणि इटलीतील ब्रदर्स ऑफ इटली गठबंधन हे दोन्ही पक्ष उजव्या विचारांचे आहेत. अशातच भारताला याचा फायदा होऊ शकतो.