Ginger Juice Benefits : भारतीयांच्या घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या, मसाले आणि हर्ब्ससह काही गोष्टी अशा आहेत ज्याचा आरोग्याला मोठा फायदा होतो. जीरे, बडीशेप, मुलेठी, कढीपत्त, लसूण, आलं अशा काही गोष्टींमध्ये हेल्दी आरोग्याचे सीक्रेट दडले आहे. पण तुम्हाला माहितेय का, दररोज आल्याचा रस प्यायल्याने आरोग्याला काय फायदे होतात? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
आल्याच्या रसामुळे होणारे फायदे
-आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. दररोज आल्याचा ज्यूस प्यायल्यास शरिरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
-आल्याचा रस दररोज प्यायल्याने पचनासंबंधित समस्या दूर होतात. जर तुम्हाला अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास असल्यास दररोज दोन चमचे आल्याचा रस प्या.
-आल्यामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्मामुळे शरीराला येणारी सूज कमी होते.
-बदलत्या वातावरणात आजारी पडण्यापासून दूर राहण्यासाठी आल्याचा रस पिऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारली जाते.
-पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदनांपासून दूर राहण्यासाठी आल्याचा ज्यूस फार फायदेशीर ठरतो.
-वजन कमी करण्यास आल्याचा रस फायदेशीर ठरेल. याशिवाय हार्मोनल इंबॅलेन्सची स्थितीही दूर होईल.
-आल्यामुळे रक्तासंबंधित समस्या दूर होतात. (Ginger Juice Benefits)
कसा तयार कराल आल्यासा रस?
आल्याचा रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम आले बारीक कुटून घ्या. यानंतर त्याचा ज्यूस काढा. यामध्ये दोन चमचे पाणी मिक्स करुन दररोज सकाळी उपाशी पोटी प्या.