Home » पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

by Team Gajawaja
0 comment
Prime Minister Narendra Modi
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 74 वा वाढदिवस साजरा होत आहे. पंतप्रधान मोदी यांना यादिवशी जगभरातून भेटवस्तू आणि शुभेच्छा मिळत आहेत. मात्र पंतप्रधान मोदी आपल्या वाढदिवसानिमित्त देशवासीयांना एक अनोखी भेट देणार आहेत. ही भेट म्हणजे, पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू सर्वसामान्य नागरिकांना खरेदी करता येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांना अनेक भेटवस्तू मिळाळ्या आहेत. या वस्तूंची किंमत 600 पासून ते काही लाखांपर्यंत आहे. अशा भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून आलेली रक्कम गंगा नदिच्या स्वच्छता मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू ज्यांना खरेदी करायच्या आहेत, त्यांना पंतप्रधान कार्यालयाच्या ऑनलाईन सुविधेमध्ये नाव नोंदवण्याची सुविधा खुली करण्यात आली आहे. (Prime Minister Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 74 वर्षांचे होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतांना त्यांच्याकडून चाहत्यांसाठीही एक भेट देण्यात येणार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करता येणार आहेत. पंतप्रधान देशात आणि विदेशात दौ-यावर असतांना त्यांना हजारो भेटवस्तू मिळतात. या भेटवस्तू या खास असतात. त्या ज्या देशाकडून वा प्रांताकडून मिळाल्या असतात, त्यावर त्यांच्या संस्कृतीची छाप पडलेली दिसते. अशाच भेटवस्तू तमाम भारतवासीयांना खरेदी करता येणार आहे. या शेकडो भेटवस्तूंच्या लिलावाची प्रक्रिया 17 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या भेटवस्तूंची किंमत 600 रुपयांपासून सुमारे 9 लाख रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंचा समावेश आहे. यामध्ये राम मंदिराची प्रतिकृती, चांदीची वीणा, पॅरालिम्पिक पदक विजेत्यांचे बूट यासह पंतप्रधानांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचाही समावेश आहे. या लिलावासाठी ठेवल्या जाणाऱ्या या वस्तूंची एकूण मूळ किंमत सुमारे दीड कोटी रुपये असणार आहे. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यासंदर्भात सगळे नियोजन पहात आहेत. या भेटवस्तूंचे प्रदर्शन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये मांडण्यात आले आहे. (Prime Minister Narendra Modi)

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू लिलावाद्वारे लोकांना परत केल्या जातात. या लिलावातून मिळालेले पैसे ‘गंगा स्वच्छता’ मोहिमेसाठी वापरले जातात. अशाप्रकारे भेटवस्तूंचा लिलाव सहाव्यांदा होत असून त्यातून जमा झालेल्या पैशांतून अशाचप्रकारे गंगा स्वच्छता निधीमध्ये जमा करण्यात आले आहेत. आता होणा-या लिलावामध्ये एकूण 600 वस्तूंचा समावेश असेल. या वस्तूंची आधारभूत किंमत सर्वात जास्त ठेवण्यात आली आहे. त्यात पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेते नित्या श्री सिवन आणि सुकांत कदम यांचे बॅडमिंटन रॅकेट, रौप्यपदक विजेता योगेश खातुनियाचे पदक यांचा समावेश आहे. याची मूळ किंमत सुमारे 5.50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. (Prime Minister Narendra Modi)

पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेते अजित सिंग, सिमरन शर्मा आणि रौप्य पदक विजेता निषाद कुमार यांनी भेट दिलेल्या शूज व्यतिरिक्त, रौप्य पदक विजेता शरद कुमार यांनी स्वाक्षरी केलेल्या टोपीची मूळ किंमत सुमारे 2.86 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या लिलावातील प्रमुख भेटवस्तू ही राममंदिराची प्रतिकृती आहे. त्याची किंमत 5.50 लाख आहे. शिवाय 3.30 लाख रुपयांची मोराची मूर्ती, 2.76 लाख रुपयांची राम दरबारची मूर्ती आणि 1.65 लाख रुपयांची चांदीची वीणा या वस्तूंचा समावेश आहे. या शिवाय या लिलावामध्ये कापूस अंगवस्त्रम, टोपी आणि शाल यांचाही समावेश आहे. त्यांची किंमत 600 रुपये आहे. हा लिलाव 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरू होईल आणि 2 ऑक्टोबरला संपेल. यासाठी पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट पहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Prime Minister Narendra Modi)

==============

हे देखील वाचा : जाणून घ्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आहेत कोण?

===============

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर त्यांचा पंतप्रधान दौरा सुरू झाला. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा पहिला लिलाव करण्यात आला. तेव्हा 1500 हून अधिक भेटवस्तू लिलावत ठेवल्या गेल्या. याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दरवर्षी पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचे लिलाव होऊ लागले. 2018 नंतर 2019 मध्ये 2500 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला. 2020 मध्ये कोरोना काळात हा लिलाव झाला नाही. 2021 मध्ये देखील 2500 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव झाला. या सर्व लिलावातून जमा झालेली रक्कम गंगा स्वच्छता मोहिमेसाठी जमा कऱण्यात येत आहे. (Prime Minister Narendra Modi)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.