विकसित भारतामध्ये जगातील मान्यवर कंपन्यांसाठी पायाभूत सुविधा देणारी नगरी म्हणून सध्या गुजरातची गिफ्ट सिटी चर्चेत आहे. तीन हजारहून अधिक एकरवर तयार होणारी ही गिफ्ट सिटी, सिंगापूर, न्ययॉर्क, हॉंगकॉंग, दुबई सारख्या प्रसिद्ध व्यापार शहरांनाही मागे टाकेल इतकी व्यापक आहे. गिफ्ट सिटी म्हणजे, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री असतांना या गिफ्टसिटीची पायाभरणी कऱण्यात आली. भारतात जागतिक स्तरावर नेतृत्व करणारे एखादे शहर असावे, असे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी बघितले, त्याच स्वप्नाला प्रत्यक्षात उभारणारी ही गिफ्ट सिटी अनेकार्थानं अद्भूत अशीच आहे. गुजरात राज्यातील गांधीनगर जिल्ह्यात, अहमदाबाद आणि गांधीनगर दरम्यान, साबरमती नदीच्या काठावर या गिफ्ट सिटीची निर्मिती करण्यात येत आहे. ही गिफ्ट सिटी म्हणजे, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे. (Gujarat)
स्मार्ट सिटी म्हणजे वास्तवात काय असते, हे बघायचे असेल तर या गिफ्ट सिटीला नक्की भेट द्यायला हवी. कारण ही भारतातील पहिली कार्यरत स्मार्ट सिटी आहे. यामध्ये कच-याचे विघटन जसे होते, तसेच येथील कुठल्याही इमारतीमधील घरांमध्ये किंवा कार्यालयामध्ये वैयक्तिक एसी बसवण्यात आलेले नाहीत. चोवीस तास विद्युत पुरवठा करणारी ही पर्यावरण पूरक असी सिटी आहे. शिवाय यातील सुविधा या जागतिक दर्जाच्या आहेत. ही गिफ्ट सिटी मेट्रोने जोडण्यात आली असून येथे असलेल्या जागतिक दर्जाच्या कंपनी कार्यालयासाठी हॅलिपॅडचीही सुविधा आहे. गुजरातच्या अहमदाबाद आणि गांधीनगर दरम्यान तयार होणारी गिफ्ट सिटी ही अनेक आंतराष्ट्रीय शहरांना स्पर्धा देणारी ठरणार आहे. भारताच्या वाढत्या वित्त आणि तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी एक स्मार्ट शहर बनण्याचे उद्दिष्ट ही गिफ्ट सिटी बनवण्यामागे आहे. भारतातील पहिली कार्यरत ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आणि जागतिक माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणूनही या गिफ्ट सिटीकडे बघितले जात आहे. या शहराला संपूर्ण देशाबरोबर अधिक सुलभपणे जोडण्यात येणार आहे. येथूनच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरही जवळ असल्यामुळे मुंबईहूनही ही गिफ्ट सिटी काही तासात गाठता येणार आहे. (Marathi News)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असतांना या गिफ्टसाठी योजना तयार केली. भारतात येणा-या जागतिक पातळीवर कंपन्या एका छताखाली असाव्यात, तसेच त्यांना मिळणा-या सुविधा या जागतिक दर्जाच्या असाव्यात हा दृष्टीकोण ही गिफ्ट सिटी तयार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी समोर ठेवला होता. आता त्यानुसारच हे भव्य शहर उभं रहात आहे. जगातील, सिंगापूर, हॉंगकॉंग, न्यू यॉर्क या शहरांना स्पर्धा देणारं हे शहर पूर्ण तयार होण्यासाठी आणखी पाच वर्षाचा कालावधी जाणार आहे. आत्ता या गिफ्ट सिटीचे काम 30 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र आत्ताही या शहराचा थाट बघण्यासाठी गुजरात आणि अन्य राज्यातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि अभ्यासकही येत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे, ही गिफ्ट सिटी हा वास्तूशास्त्राचा अद्भूत नमुना ठरणार आहेत. (Gujarat)
गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार या गिफ्ट सिटीचा आत्तापासून उल्लेख होऊ लागला आहे. येथे तयार झालेल्या प्रत्येक इमारतीची रचनाही पर्यावरण पूरक करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, कचरा निर्मुलनाची येथील पद्धती ही भारतातील पहिलीच आधुनिक पद्धती आहे. सध्या या गिफ्ट सिटीमध्ये 31 बँका, 30 विमा आणि पुनर्विमा कंपन्या, 55 फिनटेक संस्था आणि 140 हून अधिक कंपन्यांनी आपली कार्यालये सुरु केली आहेत. त्यामध्ये तब्बल 25 हजार नोक-या निर्माण झाला असून गिफ्ट सिटी पूर्णपणे कार्यरत झाल्यावर हा आकडा काही लाखांच्या पुढे जाणार आहे. सध्या एकूण 3400 एकर परिसरात ही गिफ्ट सिटी पसरली आहे. भविष्यात त्यात आणखीही भूभागाचा समावेश कऱण्यात आला आहे. (Marathi News)
=============
हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..
Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?
=============
2007 पासून या सिटीचे काम सुरु करण्यात आले आहे. आता या गिफ्टसिटीमध्ये गुगल, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनली आदी जागतिक कंपन्यांकडून आधीच लक्षणीय गुंतवणूक करण्यात आली आहे. गिफ्टसिटीमधील 70 टक्के भाग हा व्यापारी भागासाठी वापऱण्यात येणार असून 20 टक्के भूभागावर निवासाची व्यवस्था आहे. शिवाय 10 टक्के भूभाग हा शाळा, महाविद्यालये, समाजसेवी उपक्रम, हॉस्पिटल आदीसाठी वापरण्यात येत आहे. गिफ्ट सिटीमधील पायाभूत सुविधा हा भविष्यातील अभ्यासाचा विषय होणार आहेत. या गिफ्टसिटीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आणि महाविद्यालयेही असून आता जगभरातील मान्यवर विद्यापीठांच्या शाखाही येथे सुरु होणार आहेत. याशिवाय हॉस्पीटल आणि अन्यही आरोग्य सुविधा येथे असणार आहेत. वॉक टू ऑफीस या धर्तीवर या सर्व गिफ्ट सिटीची रचना आहे. आता या गिफ्टसिटीचे काम 30 टक्के पूर्ण झाले आहे. जागतिक दर्जाचे हे शहर एकदा तरी नक्कीच बघावे असेच आहे. (Gujarat)
सई बने