देशभरात भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यातील 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ येथील या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे महत्त्व वेगवेगळे आहे. या एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा उल्लेख कऱण्यात येतो. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ गावात असलेले हे ज्योतिर्लिंग जागृत म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय सुरक्षित स्थळ म्हणूनही या मंदिराची नोंद करण्यात आली आहे. (Grishneshwar Temple)
काळ्या दगडातील हे मंदिर अप्रतिम कलाकृतीचा नमुना म्हणूनही ओळखले जाते. विशेषतः या मंदिरात निपुत्रिकांची गर्दी असते. येथे भगवान शंकर निपुत्रिकांना संततीचा आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. वर्षभर या मंदिरात भाविकांचा ओघ चालू असतो. पण श्रावण महिन्यात तर या मंदिरात भक्तांचा मोठा मेळा भरतो. श्रावण महिन्यात भगवान घृष्णेश्वराच्या नामाचा आणि कीर्तनाचा सोहळा या मंदिर परिसरात रंगतो. शिवपुराण, स्कंद पुराण, रामायण आणि महाभारतात घृष्णेश्वर मंदिर आणि त्याच्या महात्म्याच्या उल्लेख आहे. महाराष्ट्रात भगवान शंकराची 5 ज्योतिर्लिंग आहेत. त्यातील पाचवे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील बरैल गावात आहे. हे मंदिर घुश्मेश्वर महादेव या नावानेही ओळखले जाते. भगवान शंकराच्या नावानं प्रसिद्ध झालेल्या मंदिरापैकी हे एकमेव मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजिंठा अलोरा लेण्यांपासून जवळ असलेल्या या मंदिराचे स्थापत्यशास्त्रही अनोखे आहे. (Marathi News)
हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या या मंदिराला अनेकवेळा मुघल आक्रांदाचा फटका बसला आहे. 13 व्या आणि 14 व्या दिल्लीमधील शासकांनी या घृष्णेश्वर मंदिराची रचना नष्ट केली. मात्र मऱाठी शासकांनी कायम या मंदिराची पुन्हा बांधणी केली. 16 व्या शतकात मालोजी भोसले, म्हणजे, छत्रपत्री शिवाजी महाराजांचे आजोबा यांनी या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला. त्यानंतर 1729 मध्ये इंदूरच्या राणी गौतमबाई होळकर यांच्या सुचनेनुसार या मंदिराला पुन्हा भव्य रुप देण्यात आले. घृष्णेश्वर मंदिराबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. मात्र या मंदिराचे नाव कसे पडले याची कथा सांगितली जाते, त्यानुसार, सुधर्म नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुधा हे जोडपं देवगिरी पर्वतावर राहत होतं. या जोडप्याला मुल नव्हतं. त्यामुळे सुधाने तिच्या पतीला आपल्या धाकट्या बहिणीबरोबर विवाह करण्याची विनंती केली. (Grishneshwar Temple)
सुधाची लहान बहिण घुश्मा ही भगवान शंकराची अनन्य भक्त होती. ती दररोज भगवान शंकराची 101 मातीची शिवलिंगे बनवायची आणि त्यांची पूजा करायची. सुधर्मनं घुश्माबरोबर विवाह केल्यावरही घुश्माचे हे व्रत कायम चालू होते. लग्नानंतर वर्षभरात घुश्माने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मात्र आपल्या धाकट्या बहिणीला मुल झाल्यामुळे सुधा, घुश्माचा द्वेष करु लागली. एके दिवशी तिने तिच्या मुलाला तलावात फेकून दिले. घुश्मा दररोज याच तलावाच्या काठावर बसून 101 शिवलिंग तयार करत असे. त्यांची पूजा केल्यावर ती या शिवलिंगांचे पुन्हा याच तलावात विसर्जनही करत असे. तिच्या मुलाचा मृत्यू झाला त्या दिवशीही घुश्मा दुःख बाजूला ठेऊन भगवान शंकराची आराधना करु लागली. तिनं 101 शिवलिंगाचे विसर्जन केल्यावर तिला तिच्या मुलाचा आवाज ऐकू आला. तलावातून तिला तिचा मुलगा येताना दिसला. सोबत तिला साक्षात महादेवानं दर्शनही दिलं. महादेवानं घुश्माला आशीर्वाद देत, सुधाला मारण्यासाठी त्रिशूळ उचलला. (Marathi News)
========
हे देखील वाचा :
Nagpanchami : नागपंचमीच्या दिवशी ‘हे’ उपाय करा आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवा
Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत
=========
मात्र घुश्मानं आपल्या बहिणीला क्षमा करण्याची विनंती केली. या विनंतीमुळे महादेव घुश्मावर खुश झाले. त्यांनी तिला वरदान मागण्यास सांगितले. यावेळी घुश्मानं तिच्यासह तमाम शिवभक्तांना भगवान महादेवाची रोज पुजा करता यावी म्हणून ज्योतिर्लिंगाच्या रुपात तलावाच्या काठावरच भगवान शंकरांनी रहावे अशी विनंती केली. तेव्हापासून या तलावाच्या काठावर शिवलिंगाच्या रुपात भगवान शंकर रहात असल्याची कथा आहे. शिवाय घुश्माच्या नावानेच मंदिराचे नाव, घुश्मेश्वर महादेव मंदिर असे झाले. घुश्माला तिचा मुलगा परत मिळाला, तेव्हापासून या मंदिरामध्ये निपुत्रिक, मुलाचे वरदान मागण्यासाठी जातात. आणि भगवान शंकराच्या आशीर्वादानं त्यांचे वरदान पूर्णही होते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 44,000 चौरस फूट क्षेत्रात काळ्या दगडापासून बांधलेले आहे. या मंदिरातील शिल्पे आणि सुंदर नक्षीकाम बघण्यासाठीही अनेक भाविक येथे येतात. श्रावण महिन्यासाठी या मंदिरावर मोठी सजावट करण्यात येत आहे. (Grishneshwar Temple)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics