Home » या धरणाचे पृथ्वीलाही ओझे !

या धरणाचे पृथ्वीलाही ओझे !

by Team Gajawaja
0 comment
Gezhouba Dam
Share

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याच्या उपयोगापेक्षा त्या गोष्टीचे अस्तित्वच धोकादायक होऊन जातं. तशीच गोष्ट चीनमधील एका धरणाची झाली आहे. जगात सर्वोत्तम गोष्टी या चीनमध्येच असल्या पाहिजेत या अट्टहासापोटी चीननं एक अतिभव्य धरण उभं केलं आहे. थ्री गॉर्जेस धरण असे त्याचे नाव आहे. या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी केला असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या धरणाचे फायदे होण्यापेक्षा त्यामुळे पर्यावरणाची अधिक हानीच होत आहे. जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बिरुद मिळवणारे थ्री गॉर्जेस धरण हे चीनसाठीच आता धोक्याची घंटा ठरले आहे.

जगातील सर्वात भव्य गोष्टी आपल्याकडे हव्यात या हव्यासापोटी चीन आपल्या देशात विकासकामे करत आहेत. मात्र त्यातून जे निष्पन्न होतं ते धोकादायक आहे. असेच आहे ते थ्री गॉर्जेस धरण. जगातील हे सर्वात मोठे धरण चीनने बांधले आहे. थ्री गॉर्जेस धरण २०३ किलोमीटर लांब, ११५ मीटर रुंद आणि १८५ मीटर उंच आहे. चीनच्या यांगत्से नदीवर उभारलेल्या या धरणावर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या धरणाची अनेक वैशिष्टे आहे. हे भव्य धरण पूर्ण करण्यासाठी जवळपास १८ वर्ष लागली. यावर उभारलेल्या जलविद्युत प्रकल्पाची व्याप्तीही तेवढीच मोठी आणि भव्य आहे. चीनसह जगभरातील बारा देशांनाही येथून विद्युत पुरवठा होऊ शकतो. (Gezhouba Dam)

चीननं या धराणासाठी मोठा खर्च केला आहे. साधारण अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झालेल्या या धरणाचे काम १९९४ मध्ये सुरु झाले. धरण २०१२ मध्ये पूर्ण झाले. मात्र यादरम्यान चीनमधील अनेक संघटनांनी या धरणाला विरोध केला होता. एकतर या धरणामुळे अवाढव्य खर्च चीनच्या खजिन्यावर पडला होता. या धरणाची गरज काय, हा प्रश्न विचारण्यात आला होता. याशिवय धरण ज्या भागात उभारले आहे, तेथील वनसंपदा पूर्णपणे नष्ट झाली. यामुळे अनेक सामाजिक संस्थांनी या धरणाला विरोध केला. मात्र चीन सरकारच्या दडपशाहीपुढे या संघटनांचे काहीही चालले नाही. (Gezhouba Dam)

या थ्री गॉर्जेस धरणामध्ये एवढे स्टील वापरण्यात आले आहे की, तेवढ्या स्टीलमध्ये ५ ते ६ आयफेल टॉवर्स उभारले जाऊ शकतात. जवळपास ६३ हजार टन स्टीलचा वापर या थ्री गॉर्जेस धरणामध्ये करण्यात आला आहे. आता हे धरण पूर्ण भरल्यावर मात्र त्यातील विध्वंसक रुप जगासमोर आले आहे.
या धरणाच्या क्षमतेमुळे शास्त्रज्ञ चिंतीत झाले आहेत. कारण या धरणाच्या ओझ्यामुळे चक्क पृथ्वीवरच अतिरिक्त भार वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

==================

हे देखील वाचा : ब्रिटनजवळ इस्लामिक राज्य !

================

कारण या धरणाच्या ओझ्यामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावल्याचा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या धरणात इतके पाणी जमा झाले आहे की, पृथ्वीच्या जडत्वावर त्याचा परिणाम झाला आहे. पृथ्वीचे परिभ्रमण कमी झाल्यामुळे, एका दिवसाची वेळ ०.०६ मायक्रोसेकंदने वाढली आहे. म्हणजेच दिवस आता थोडा मोठा झाला आहे. या धरणामुळे होणारे परिणाम इथपर्यंतच नाहीत तर थ्री ब्रिज धरणाच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवही आपापल्या ठिकाणाहून २ सेंटीमीटरने सरकले असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय पृथ्वी इतर ध्रुवावर थोडीशी सपाट झाल्याचे निदर्शनास आले आहे. (Gezhouba Dam)

आता या थ्री गॉर्जेस धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होण्याचा धोकाही वाढला आहे. शिवाय या भागात कधीही मोठा विनाशकारी भूकंप येऊ शकतो, असा अंदाज आहे. या धरणामुळे यांगत्झी नदीवर येणा-या पुराला आणि त्यामुळे होणा-या नुकसानाला आळा घातल्याचा चीनचा दावा आहे. असे असले तरी आता धरणामुळे त्याहून अधिक धोका निर्माण झाला आहे. या धरणावर चीनमध्ये अनेक साहित्य लिहिण्यात आले आहे. त्यात धरणाला विरोध करणा-यांचाही समावेश होता. या धरणावार सर्वाधिक कविता झाल्या आहेत. मात्र धरणाच्या विधोरात लिहिणा-यांना चीन सरकारनं तुरुंगात टाकले. त्यात अनेक मान्यवर अभियंत्यांचा समावेश होता. या धरणामुळे चीनमधील मोठी वनसंपदा नष्ट झाली आहे. तसेच अनेक गावांना विस्थापित करण्यात आले. आता हे धरण पूर्णभरल्यामुळे त्याचा धोकाच आसपास असलेल्यांना अधिक वाटत आहे. या धरणामुळे भुकंपाचा धोका वाढल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरणही आहे. (Gezhouba Dam)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.