Home » Genome Sequencing म्हणजे काय?

Genome Sequencing म्हणजे काय?

by Team Gajawaja
0 comment
Genome Sequencing
Share

चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन बीएफ.७ हा भारतात सुद्धा पोहचला आहे. यामुळे केंद्र सरकारने आणखी काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. विमानतळावर रँडम सॅम्पलिंगचा सुद्धा वेग वाढवण्यात आला आहे. संक्रमित आढळलेल्या लोकांचे नमूने जीनोम सिक्वेंसिंगच्या तपासासाठी लॅबमध्ये पाठवले जात आहेत. अशातच तुम्हाला प्रश्न पडला असेल जीनोम सिक्वेंन्सींग म्हणजे नक्की काय?याच्या माध्यमातून कशा पद्धतीने काय समजते? (Genome Sequencing)

जीनोम सिक्वेंसिंग म्हणजे काय?
चीनमधील कोरोनाचा नवा वेरियंट भारतात आल्याने त्याची ५ प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर जीनोम सिक्वेंसिंगचे काम अधिक वाढले आहे. या चाचणीच्या माध्यमातून लोकांना कोणत्या वायरसमुळे संक्रमण झाले आहे हे कळून येते. जीनोम सिक्वेंसिंगच्या मदतीने वायरस संबंधित सर्व माहिती जसे त्यांचे वेरियंट, सब-वेरियंट आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल कळू शकते. जीनोम सिक्वेंसिंगच्या मदतीने व्यक्तीच्या व्यक्तिगत जीनोम बद्दल माहिती मिळवली जाऊ शकते.

Genome Sequencing
Genome Sequencing

कशा पद्धतीने तपासणी केली जाते?
खरंतर आपल्या कोशिकांमध्ये जेनेटिक मटॅरियल म्हणजेच अनुवांशिक पदार्थ असतो. त्याला DNA किंवा RNA असे म्हटले जाते. त्यांनाच जीनोम असे ही म्हटले जाते. त्याच प्रमाणे कोणत्याही वायरसचा एक डीएनए असतो. जीनची ठरवलेली जागा आणि दोन जीन दरम्यानचे अंतर आणि त्यांच्या आंतरिक हिस्स्याच्या व्यवहार आणि त्याचे अंतर समजण्यासाठी काही पद्धतीने जीनोम मॅपिंग किंवा जीनोम सिक्वेंसिंग केली जाते. जीनोम सिक्वेंसिंगमध्ये डीएनए किंवा आरएनए मध्ये असलेले न्युक्लियोटाइडच्या लयबद्ध क्रमामुळे कळले जाते. त्या अंतर्गत असलेले चार तत्व म्हणजेच एडानिन (A), गुआनिन (G), साइटोनिस (C) आणि थायमिन (T) च्या सीरिजबद्दल कळू शकते.(Genome Sequencing )

भारतात याच्या तपासासाठी काय आहे व्यवस्था?
भारतात कोरोना संदर्भात याची जीनोम सिक्वेंसिंगेचे काम इंडियन सार्स कोव २ जीनोमिक्स कंसोर्टियम म्हणजेच INSACOG आहे. दरम्यान, भारतात मध्ये INSACOG अंतर्गत देशभरात ५२ शासकीय लॅब आहेत. या लॅबमध्येच जीनोम सिक्वेंसिंग केली जाते. तर ७ राज्यांमध्ये खासगी लॅब सुद्धा त्यासाठी आहेत.

हे देखील वाचा- चीन मध्ये आढळलेला BF7 किती धोकादायक, काय आहेत लक्षणं? भारतात ही आढळली प्रकरणे

भारत या चाचणीसाठी तयार आहे?
जीनोम सिक्वेंसीग एक जटील प्रक्रिया आहे. याच्या चाचणीत तज्ञांची गरज असे. संपूर्ण प्रक्रियेसाठी वेळ ही लागतो. भारतातील शासकीय लॅब एका महिन्यात फक्त ६० हजार सॅम्पलची चाचणी करतात. अशातच भारताची लोकसंख्या पाहता हा आकडा फार कमी आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.