महिलांना मेकअप करणे फार आवडते. त्यामुळे आपला चेहरा अधिक सुंदर कसा दिसेल त्यासाठी त्या विविध ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. खासकरुन आपले डोळे हे मेकअप केल्यानंतर अधिक बोलके दिसावेत म्हणून त्यांना मस्करा, आयलाइनर किंवा काजळ लावतात. मात्र आजकाल मार्केटमध्ये विविध ब्रँन्डचे आणि विविध पद्धतीचे आयलाइनर उपलब्ध आहेत. अशातच प्रत्येक आयलाइनर लावण्याची एक वेगळी पद्धत सुद्धा असते.(Gel Eyeliner)
जर तुम्हाला सॉफ्ट लूक कॅरी करायचा असेल तर तुम्ही पेंन्सिल आयलाइनर लावू शकता. मात्र डोळ्यांना इंटेस लूक द्यायचा असेलतर जेल आयलाइनरचा वापर करु शकता. जेल आयलाइनर लावल्याने तुमचे डोळे अधिक सुंदर दिसतात. परंतु बहुतांश महिलांना जेल आयलाइनर नक्की कसे लावायचे हे कळत नाही. त्यामुळे त्यांना हवा तसा लूक काहीवेळा मिळत नाही. असो तर आपण आज जेल आयलाइनर लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

-सर्वात प्रथम ब्रश स्वच्छ करा
जेल आयलाइनर लावण्यासाठी एक ब्रश दिला जातो. परंतु ब्रशवर थेट लाइनर लावणे योग्य मानले जात नाही. खराब झालेल्या ब्रशने जेल आयलाइनर लावल्याने तुमचे नुकसान ही होऊ शकते. अशातच त्याला असलेली घाण तुमच्या डोळ्यांवर येते आणि तुमचा लूक बिघडू शकतो. त्यामुळे नेहमीच ब्रश सर्वात प्रथम स्वच्छ करुन घ्या.
-जेल आयलाइनरची बॉटल उघडी ठेवू नका
काही महिला जेव्हा जेल आयलाइनर लावतात तेव्हा त्या काही वेळ त्याची बॉटल तशीच उघडी ठेवतात. मात्र असे करण्यापासून दूर रहा. खरंतर जेव्हा जेल आयलाइनर दीर्घकाळ उघडे राहते तेव्हा ते लगेच खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कधी कधी नवं जेल आयलाइनर खरेदी करावे लागते. त्यामुळेच जेल आयलाइनरची बॉटल ही उघडी ठेवू नका. तुमच्या रुमच्या तापमानानुसार ती योग्य ठिकाणी ठेवून द्या.
हे देखील वाचा- अधिक घाम येत असल्याने चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येसाठी ‘या’ टीप्स फॉलो करा
-योग्य प्रकारे ब्रशवर लाइनर लावा
ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि हे तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवावे लागते. खरंतर महिला या योग्य प्रकारे ब्रशवर जेल लाइनर घेत नसल्याने त्यांना परफेक्ट लूक मिळत नाही. बहुतांश महिला ब्रश हा एकदम सरळ ठेवून तो जेल लाइनरमध्ये बुडवतात आणि त्यानंतर आपल्या डोळ्यांवर ते लाइनर अप्लाय करतात. परंतु ब्रशवर अशाप्रकारे लाइनर घेऊ नये. प्रयत्न करा की, ब्रशचा थोडा तिरका पडकता येतो आहे का. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लाइनर लावता तेव्हा लाइनरचा स्ट्रोक अगदी परफेक्ट येतो.(Gel Eyeliner)
-वापरल्यानंतर ब्रश स्वच्छ करा
बहुतांश महिला ही गोष्ट करणे विसरुन जातात पण ही महत्वाची आहे. नेहमीच वापर केल्यानंतर ब्रश स्वच्छ करा. अन्यथा ब्रशवर बॅक्टेरिया जमा झाल्यास धोका वाढू शकतो. या व्यतिरिक्त ब्रश स्वच्छ न करता ठेवल्यास त्याचे ब्रिसल्स हे कडक होतात. त्यामुळे योग्य प्रकारे लाइनर लागले जात नाही.