Home » इंग्लडमध्ये लेबर पक्षाची सत्ता !

इंग्लडमध्ये लेबर पक्षाची सत्ता !

by Team Gajawaja
0 comment
Geetapremi Shivani
Share

इंग्लडमध्ये नुकतीच निवडणूक झाली असून यात लेबर पक्षाला ६५० सदस्यांच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये ४१२ जागा मिळाल्या. या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दारूण पराभव झाला. कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ १२१ जागा मिळाल्या आहेत. आता इंग्लडमध्ये लेबर पक्षाची सत्ता आली असून किर स्टारमर हे पंतप्रधान झाले आहेत. आता या इंग्लडच्या हाऊस ऑफ कॉमन्सचा कारभार सुरु झाला असून यातील पहिलं काम म्हणजे, नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी.

या शपथविधीमध्ये एक तरुणीनं अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. ही तरुणी आहे, भारतीय वंशाच्या शिवानी राजा. शिवानी या तरुणीनं इंग्लडमधली लीसेस्टर पूर्व जागेवर कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तिच्या विरुद्ध उभ्या असलेल्या भारतीय उमेदवाराचा तिनं मोठ्या मतांच्या फरकानं पराभव केला आहे. (Geetapremi Shivani)

आता खासदार झालेल्या या शिवानीनं ब्रिटीश संसदेत शपथ घेतांना श्रीमद्भगवद्गीता सोबत घेतली होती. श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेऊन शिवानीनं आपल्या खासदार म्हणून कर्तव्यात कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही दिली. शिवानीच्या या कृतीमुळं तिचं कौतुक होत आहे.

ब्रिटनच्या संसदेत सध्या नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष लिंडसे हॉयल हे खासदारांना शपथ देत आहेत. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये ६५० सदस्य आहेत. ब्रिटीश संसदेवर निवडून आलेले खासदार एकतर पवित्र ग्रंथासह शपथ घेऊ शकतात किंवा धर्मनिरपेक्ष राहून शपथ घेऊ शकतात. “मी सर्वशक्तिमान देवाच्या नावाने शपथ घेतो की मी विश्वासू राहीन आणि महामहिम राजा चार्ल्स आणि त्याच्या वारसांशी कायद्यानुसार खरी निष्ठा ठेवीन, देव मला या प्रयत्नात मदत करेल.” अशी ही शपथ खासदारांना घ्यायची असते.

तर धर्मनिरपेक्ष खासदार “मी गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे आणि खरोखर घोषित करतो आणि प्रतिज्ञा करतो की मी महामहिम राजा चार्ल्स द ग्रेट आणि त्यांच्या वारसांप्रती कायद्यानुसार विश्वासू आणि खरी निष्ठा ठेवीन.” अशी शपथ घेतात. आपण कशी शपथ घ्यावी हा निर्णय त्या खासदारांचा वैयक्तिक असतो. याच ब्रिटीश संसदेत एकूण २९ भारतीय वंशाचे खासदार आहेत. त्यातील ३ खासदारांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याचा पर्याय निवडला आहे. त्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचाही समावेश आहे. त्यातील शिवानी राजा या तरुणीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Geetapremi Shivani)

शिवानी राजा यांनी लीसेस्टर पूर्व जागेवर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या कडून ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. त्यांनी लंडनचे माजी उपमहापौर राजेश अग्रवाल यांचा पराभव केला. शिवानी यांना १४५२६ मते मिळाली, तर राजेश अग्रवाल यांना १० हजार मते मिळाली आहेत. शिवानी राजा यांचा विजय झाला, तो मतदार संघही खास आहे. कारण २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप टी-२० सामन्यानंतर लेस्टर सिटीमध्ये भारतीय हिंदू समुदाय आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष झाला होता. त्यामुळे संवेदनशील मतदार संघ म्हणून शिवानीच्या मतदारसंघाची ओळख आहे.

====================

हे देखील वाचा : ब्रिटनमध्ये ‘४०० पार’ करणाऱ्या लेबर पार्टीचं भारत कनेक्शन

====================

२९ वर्षाची शिवानी राजा ही गुजराती कुटुंबातील आहे. तिच्या विजयानंतर या मतदारसंघातील मजूर पक्षाचे ३७ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. शिवानी राजाचे आई-वडील १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात केनिया  आणि भारतातून लीसेस्टरला आले. शिवानी राजाचा जन्म २१ जुलै १९९४ रोजी रुशी मीड, लीसेस्टर येथे झाला. राजा हे मूळचे गुजरातमधील. शिवानी यांचे शिक्षण हेरिक प्रायमरी स्कूल, सोर व्हॅली कॉलेज, विगस्टन आणि क्वीन एलिझाबेथ कॉलेजमध्ये झाले आहे. (Geetapremi Shivani)

शिवानीनं डी मॉन्टफोर्ट विद्यापीठातून कॉस्मेटिक सायन्समध्ये प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी मिळवली आहे. राजकारणात येण्यापूर्वी शिवानी सौदर्यस्पर्धांमध्येही सहभागी झाली होती. २०१७ मध्ये शिवानीनं मिस इंडिया यूके सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. तिथे त्यांनी उपांत्य फेरीत विजय मिळवला होता. शिवानी यांच्याव्यतिरिक्त अन्य २८ भारतीय वंशाचे खासदार हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पहिल्यांदाच २६३ महिलांनी निवडणूक जिंकली आहे. त्यातील कृष्णवर्णींयांचे प्रमाणही अधिक आहे.

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.