बुद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी नेहमीच लोकांना अहिंसा आणि करुणेची शिकवण दिली. गौतम बुद्धांचे अनमोल विचारांनी अनेकांचे आयुष्य बदलले आहे. हेच कारण आहे की, बुद्धांचे विचार हे सुखी जीवनाचे सुत्र असल्याचे म्हटले जाते. गौतम बुद्धांनी लोकांना दु:खाचे सत्य जगातील सर्वांना दाखवून देतात. प्रत्येक व्यक्तीला सुखी आणि संपन्न व्हायचे आहे. परंतु गौतम बुद्धांचे असे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे निसर्ग आणि ऋतूत बदल होतो त्याच प्रमाणे मनुष्याच्या आयुष्यात सुद्धा सुख-दु:ख येत राहतात. (Gautam Buddha thoughts)
समाजात कोणीही किती धनवान असो. पण असा कोणताही व्यक्ती नसेल ज्याच्या आयुष्यात दु:ख नाही. त्यामुळे एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की, आयुष्यात ना सुख हे स्थिर आहे ना दु:ख. जर तु्म्ही एका काळासाठी आनंदाचा अनुभव घेता तर दु:ख ही तुमच्या वाट्याला येणार आहे. पण लक्षात ठेवा एक ना एक दिवस दु:ख ही कायमची निघून गेली नाही तरीही त्यात मार्ग काढून सुखी कसे रहायचे हे तुम्हाला कळू शकते.
गौतम बुद्ध असे म्हणतात की, दु:खाचे कारण काहीही असो. परंतु दु:खाचे पालनकर्ता हा मनुष्य स्वत: आहे. दु: ख वाढवण्यामागे ही मनुष्यच असतो. जर तुम्ही एखाद्या समस्येत असाल तर त्याचा अधिक प्रभाव तुमच्यावर पडू देऊ नका. परिस्थिती कशी ही असो स्वत:ला धैर्यवान करा. यामुळे तुम्हाला दु:खातून सुटका जरुर मिळेल. जाणून घेऊयात गौतम बुद्धांचे विचार दु:ख दूर करण्याबद्दल काय सांगतात याच बद्दल अधिक.
-दु:ख समजून घ्या
गौतम बु्द्धांनुसार, प्रत्येक व्यक्ती लहान-मोठ्या गोष्टीवरुन दु:खी होतो. परंतु दु:खी राहत असाल तर त्याचे कारण ही समजून घेतले पाहिदे. यासाठी तुम्ही तुमच्या दु:खांची कारणं समजून घ्या. जर तुम्ही विचार न करता, न समजून घेता त्याचा प्रभाव तुमच्यावर अधिक होऊ देत असाल तर समस्या अधिक वाढल्या जातील. यामुळे तुम्हाला नेहमीच तुमच्यासमोर दु:खाचा डोंगर दिसेल. त्यामुळे दु:खापासून दूर रहायचे असेल तर जो पर्यंत तुम्ही स्वत: ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत तो पर्यंत दु:ख आपल्यापासून दूर जाणार नाही. (Gautam Buddha thoughts)
-तीव्र इच्छा हेच दु:खाचे कारण
बुद्धांनुसार दु:खाचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे तृष्णा. एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असणे किंवा असमाधानी असणे हेच दु:खाचे कारण आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या गरजेपेक्षा अधिक कोणत्याही गोष्टीची इच्छा करु नये. कोणाकडून ही अधिक अपेक्षा करु नये. जर तुम्ही तुमच्या इच्छांवर कंट्रोल कराययला शिकलात तरच दु:ख दूर होऊ शकते.
हेही वाचा- कंबोडियातील प्राचीन भारतीय मंदिरांचा इतिहास
-दु:ख असे दूर होईल
गौतम बुद्ध असे म्हणतात की, आयुष्यात जसे दु:ख असते तसेच आनंदाचे दिवस ही येतात.जसे आजचा दिवस वाईट तर उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल. जगात अशी कोणतीच समस्या नाही ज्यासाठी त्यावर उपाय नाही.तुम्ही तर वरील काही गोष्टी समजून घेतल्या तरच दु:ख दूर होऊ शकते.