Home » Gaurav Tiwari : भूतं पकडण्याचा नाद आणि नंतर रहस्यमयी मृत्यू !

Gaurav Tiwari : भूतं पकडण्याचा नाद आणि नंतर रहस्यमयी मृत्यू !

by Team Gajawaja
0 comment
Gaurav Tiwari
Share

तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदातरी घोस्ट हंटर हा प्रकार ऐकलाच असेल. घोस्ट हंटर म्हणजे ४-५ जणांचा ग्रुप असतो आणि ते कसल्यातरी मशीन्स घेऊन रात्री अंधारात फिरत असतात. का तर भूतं शोधायला… अशाच भुताळलेल्या लोकांपैकी एक होता गौरव तिवारी.  इंडियन घोस्ट हंटर किंवा Paranormal Investigator तुम्ही म्हणून शकता असं सांगितलं जात की त्याने तब्बल ५ हजार ठिकाणी अशा घोस्ट हंटिंगचे कारनामे केले होते. ते झी टीव्ही वरचे काही हॉरर शो होते, फिअर फाईल्स, नंतर सोनी वरचं भूत आया… MTV गर्ल्स नाईट आउट, हे त्यानेच तयार केलेले होते. त्याचं सगळं चांगलं चाललं होतं. २०१६ ला लग्न झालं… पण त्याच वर्षी त्याच्यासोबत असं काही घडलं ज्याची मिस्ट्री अजूनही सुटलेली नाही. त्याचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला. पण त्याने सुसाईड केलं होतं की खरंच त्याला भुतानेच मारलं होतं.  चला तर जाणून घेऊ गौरव तिवारीसोबत काय घडलं होतं. (Gaurav Tiwari)

तर गौरव तिवारी हा Curious माणूस. त्यानेच इंडियन Paranormal सोसायटी तयार केली होती. याच्या माध्यमातून निगेटिव्ह एनर्जी ज्यांना आपण भूतं म्हणतो, त्याचा शोध घेण्याची काम चालतात. आता भूत पकडतात म्हणजे नेमकं काय करतात. तर एखादी फेमस झपाटलेली जागा असेल. तर यांची टीम त्याठिकाणी जाते. त्यांच्याकडे काही मशीन्स असतात. यामध्ये गीगर काउंटर, Electromagnetic Field Detector, इन्फ्रारेड कॅमेरे आणि सेन्सिटिव्ह मायक्रोफोन वगैरे असत आणि याच्या माध्यमातून ते भूत पकडतात. गौरव तिवारी पण अशीच काम करायचा आणि भारतात अनेक जागा Haunted सांगितल्या जातात. त्याठिकाणी तो गेला होता. त्याने दाखवलं सुद्धा की भूत बित जसं दाखवलं जात तसं नसतं. तर त्यांला तुम्ही निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक उर्जा म्हणून शकता. (Top Stories)

Gaurav Tiwari

तुम्ही राजस्थानचं भानगड तर ऐकलच असेल. ते आशियातलं सर्वात झपाटलेलं ठिकाण म्हटलं जातं. पण हा भाई त्या भानगडने एकटाच रात्री राहिलाय. आल्यानंतर बोलतो कसलं भूत-बित नाहीये इथे… असे अनेक कारनामे त्याने करून दाखवले होते. सगळ ठीक चालू होतं. नंतर २०१६च्या जानेवारीत त्याचं लग्न झालं. सगळ सुरळीत सुरु होतं. लग्न होऊन सात महिने उलटले होते. ७ जुलैला गौरव रात्री ११ दरम्यान आपल्या laptop वर काम करत बसला होता. दिल्लीच्या एका haunted प्लेसबद्दल त्याचं रिसर्च चाललं होतं. घरी पत्नी आणि त्याचे आई-बाबासुद्धा होते. थोड्या वेळाने उठून तो बाथरूममध्ये गेला आणि १० मिनिटांनी अचानक बाथरूममधून जोरात काहीतरी पडण्याचा आवाज आला.(Gaurav Tiwari)

घरातले सर्वच पहायला गेले, तर गौरव बेशुद्ध पडला होता. त्यांनी लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. पण तो आधीच दगावला होता. म्हणजे थोड्या वेळापूर्वी सगळं ठीक होतं, पण अचानक आता गौरव हयातच नव्हता. सगळीकडे बातमी अशी पसरली की, त्याने आत्महत्या केली आहे. पण ती आत्महत्या मुळीच नव्हती. पाहायला गेलं तर त्याला कसलीही तंगी नव्हती, अंगावर कसलं कर्ज नव्हतं, Family Matter नव्हते, डिप्रेशन नव्हतं. मग हा माणूस आत्महत्या का करेल ? इन्वेस्टीगेशन सुरु झालं आणि सर्वांना Doubt आला त्याच्या पत्नीवर… पत्नीला पोलिसांनी विचारपूस केली. कन्क्लूजन नाही निघालं. पण तीन एक अशी गोष्ट सांगितली जे ऐकून सगळेच चाट पडले…(Top Stories)

============

हे देखील वाचा : Arunachal Pradesh : AFSPA नक्की काय आहे? जो सरकारने अरुणाचलमध्ये लागू केला, घ्या जाणून

============

ती म्हणाली की, गौरव मरण्याच्या जवळपास आठवडाभरापूर्वी माझ्याकडे आला होता आणि म्हणाला की मला अशा काही निगेटिव्ह एनर्जी, पावर्स आहेत, आत्मा आहेत, ज्या मला जीवे मारायला बघत आहेत. पोलिसांना हे खोट वाटलं. पण बायकोने असं काही केलंय, याचाही पोलिसांना पुरावा सापडला नाही. आत्महत्या केल्याचाही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. मग गौरवचा मृत्यू झालाच कसा ? याचा सुगावा अजूनही लागला नाही. मग संशयाची सुई एकाच गोष्टीकडे जाते, ते म्हणजे निगेटिव्ह पावर्स… पण त्यांना कसं शोधणार? काही Paranormal Investigators च्या मते कधी कधी आपण या एनर्जीसच्या जगात जास्त वावरतो तेव्हा या एनर्जी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात Attract होतात आणि यातल्या निगेटिव्ह एनर्जी आपल्यासाठी खूप हार्मफुल असतात. आणि कदाचित गौरवचा मृत्यू यामुळेच झाला असावा, पण कनक्लुजन निघालं नाही, तर आपणसुद्धा त्यावर काहीच बोलू शकत नाही. म्हणजे जो माणूस नेहमी जगातले रहस्य शोधत राहिला, त्याचाच मृत्यू रहस्यमयी पद्धतीने झाला. पोलिसांना हाती काहीच लागलं नाही आणि त्यांनी ही आत्महत्या असल्याचच घोषित केलं. आजही गौरवच्या अशा प्रकारच्या मृत्यूबाबत बोललं जातं पण गाडी तिथेच येऊन अडते की गौरवचा मृत्यू नेमका कसा झाला ?


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.